होय,आम्ही काँग्रेसी!
मी काँग्रेस समर्थक आहे. अगदी जाहीरपणे आणि निःसंकोच... पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता वगैरे नसलो, तरी मला हाच पक्ष सर्वात जवळचा वाटतो. मी ज्या परिसरात वाढलो, राहतो, त्या भवतालात असं म्हटलं, की लोकं दचकतात. तुच्छता, तिरस्कार किंवा करुणा, सहानुभूतीच्या नजरेने पाहतात

पण मला त्याने फरक पडत नाही. त्यांचा मला रागही नाही.
कारण मुळात काँग्रेस ही विचारसरणी काय आहे, याचं आपल्या शिक्षित वर्गातलं आकलन भयंकर तोकडं आहे. सर्वसमावेशकता, त्यासाठी आवश्यक सामोपचार आणि यातून शक्य तेव्हढ्या अधिकाधिक लोकांचा अधिकाधिक भौतिक विकास, ही काँग्रेसची त्रिसूत्री आहे

. या प्रक्रियेत सतत आणि सर्वांचं हित साधत राहणं, हे काँग्रेसचं उद्दिष्टच नाही आणि किंबहुना तसं कधीच शक्य नसतं, याची काँग्रेसला पक्की जाणीव आहे. पण या सर्वसमावेशकतेमुळेच काँग्रेससोबत समतावादी विचारधारा आहे, दलित चळवळीतले कार्यकर्ते आहेत, खुल्या भांडवलशाहीला मानणारेही आहेत आणि
कामगार/शेतकरी चळवळीशी बांधिलकी ठेवलेलेही आहेत. परमेश्वराची भक्ती करणारेही आहेत आणि नास्तिकही आहेत. आणि याचमुळे काँग्रेसला याच विचारधारणीतले कोणी न कोणी शत्रूही मानतात, काँग्रेसने त्यांची फसवणूक केल्ये, असंही समजतात. अहिंसा, जन्माधिष्ठित प्रमाणिकरणाला नकार आणि सर्वांना संधी देत
संपत्तीच्या वाढीवर विश्वास, ही काँग्रेसी मूलतत्त्व आहेत आणि त्यात सगळेच जण कधी न कधी बसतात आणि कधी न कधी विरुद्ध जातात. काँग्रेसला त्याची अडचण नाही. कारण यातल्या कोणत्याही एकाच विचारसरणीचा हट्ट धरणं व्यावहारिक जगात अशक्य आहे, याची काँग्रेसीना पक्की जाणीव आहे. विचारसरणीचा माज
बाळगणारे बहुतेक जण ज्या जनतेशी बांधिलकी दाखवतात, त्याच जनतेकडून सतत नाकारले जातात, हे स्वच्छ दिसतं आहे.
आज काँग्रेसचे दिवस खराब आहेत. अनेक दशकं पाठिंबा दिलेली जनता आज नाराज आहे. हुकुमी निवडणूक जिंकणारा पक्ष आज अस्तित्त्वासाठी धडपडतोय. पक्षातले कोण, बाहेरचे कोण आणि आपले परके कोण
आज काँग्रेसचे दिवस खराब आहेत. अनेक दशकं पाठिंबा दिलेली जनता आज नाराज आहे. हुकुमी निवडणूक जिंकणारा पक्ष आज अस्तित्त्वासाठी धडपडतोय. पक्षातले कोण, बाहेरचे कोण आणि आपले परके कोण
याचा गोंधळ उडालाय. पण याने सच्चा काँग्रेसीची निष्ठा हलत नाही. काँग्रेस हा भारताचा आत्मा आहे आणि कितीही शरीरं बदलूनही तो शाबूत राहील, याची आम्हाला खात्री आहे.
ही १३५ वर्षं असंख्य उतारचढावाची होती, पुढचीही असतील. पण मूलभूत तत्त्व आणि धोरणं यावर जोपर्यंत विश्वास आहे, तोपर्यंत काँग्रेसी अमर आहे...!!
Ajit Anushashi
Ajit Anushashi