भाजप चे वरिष्ठ नेते आणि पूर्व केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांचा आज जन्म दिवस..मी ज्याच्या भाषणशैली नी लहानपणापासून प्रभावित झाले ,त्यांच्याविषयी आज लिहावं वाटलं.
अरूण जेटली न विषयी सांगायच झाल तर ,एक वकील, राजकीय नेता बनले म्हणणं म्हणजे सचिन तेंडूलकर क्रिकेटर नंतर कमेंटेटर
झाला म्हण्यासारखं आहे..जेटली नी कायदे क्षेत्रात उत्तम कामगिरी करत त्या क्षेत्रातला चमकता तारा बनले.राजकारण त्यांच्या स्वभावात होतं असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही.त्यांची कहानी पाकिस्तानमधून भारतात वसलेल्या एका परिवारातून सुरूवात होते.
अरूण जेटली यांचा जन्म 28 डिसेंबर 1952 ला महाराज कृष्ण जेटली आणि रत्नप्रभा जेटलीच्या पोटी पंजाबी ब्राम्हण कुंटुंबात झाला.त्याचे वडील ही वकील होते तर आई समाजसेविका. अरूण जी चं सुरवातीच शिक्षण सेंट झेव्हिंयर्स मधून व दिल्लीच्या श्री राम काँलेजमधून बी काँम केल.1977 मध्ये दिल्ली
विश्वविद्याातून लाँ ची डिग्री घेतली.त्यांच शालेय आणि काँलेज जीवन उत्तम व हुशार विद्यार्थी रूपात झालं.अनेक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाले.
अरूण जेटलीचा राजकीय जीवनाचा सफर दिल्ली विश्वविद्यालयातून चं चालू झाला होता.
सत्तर च्या दशकात इंदिरा गांधीचं सरकार होत.गुजरात पासून सरकार विरूध्द चालू झालेलं आंदोलन देशभर पसरलं होतं 1971 मध्ये RSS चे विद्यार्थी संघाचे नेता श्रीराम खन्ना यांना भेटल्यावर जेटली
भाजप विचारसरणी चा भाग झाले.1974 मध्ये डीयू छात्र संघटनेचे ते अध्यक्ष बनले.1975 पासून सक्रिय राजकारणात पदार्पण केलं.सत्तर च्या दशकात श्रीराम काँलेज (SRCC ) सारख्या
प्रतिष्ठित संस्थेच्या विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधित्व ते करत होते.
त्या वेळी कैंपस मध्ये राजनैतिक गुंडाचा आणि त्यांच्या अनुयायाचा पगडा होता.आयोध्या च्या बाबरी मस्जिद विंध्वसानंतर जो दंगा उसळा होता ,त्यावेळी हिंदी पट्ट्यामध्ये मंडऴ राजनीती जास्त चालू होती.25 जून 1975 आणिबाणीची घोषणा झाली .पोलिसांनी अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटक केली
तोपर्यंत एबीवीपी चा चमकता चेहरा जेटली झाले होते.पोलीस जेव्हा त्यांना अटक करण्यासाठी घरी आले .त्या वेळी तिथून निसटण्यात ते कामयाब ठरले पण लगेचच दुसर्या दिवशी 200 लोकांसहित त्यांनी स्वत:ला अटक करवून घेतली .आणीबाणी मुळे राजकीय प्रदर्शन बंद असताना ही अटक खूप मोठी बातमी ठरली .
19 महिने ते अंबाला आणि तिहार जेल मध्ये राहिले. हा काऴ त्याचा जीवनातला टर्निंग पाँईट ठरला.कारण हा काळ त्यांनी तुरूंगात अटल बिहारी वाजपेयी ,एल के आडवाणी,आणि नानाजी देशमुखान सोबत व्यतीत केला..जो त्यांच्या वर पुढच्या राजकीय प्रवासाची नांदी ठरला
तत्कालिन प्रतंप्रधान नरसिंहा राव आणि त्यांचे वित्तमंत्री मनमोहन सिंह अर्थव्यवस्थेची नवी script लिहीत होते.त्याच वेळी अटल बिहारी आणि एल के अडवाणीच्या छायेत अरूण जेटली हळू हळू भाजपच्या वरच्या फळीतील नेत्यानमध्ये आपली जागा बनवत होते.
2003 मध्ये भाजपने मध्य प्रदेश मधून काँग्रेस ची सत्ता संपुष्टात आणली.त्यानंतर या निवडनुकीमुळे जेटली चं अस्तित्व चुनाव प्रबंधक म्हणून नावारूपाला आलं सुप्रीम कोर्टाच्या दरवाज्यातून सुरू झालेला त्यांचा प्रवास शास्त्री भवनापर्यंत अगदी सगजगत्या सुरू झाला होता.
वाजपेयी सरकारमध्ये कनिष्ठ मंत्री बनले .सूचना आणि प्रसारण खात्याचा कारभार सांभाळला.परत 2000 मध्ये कायदा सुव्यवस्था खातं ही पाहिलं .जून 2009 मध्ये राज्यसभेतला विरोधी पक्ष नेता म्हणून (सं.प्र.गा.) संयुक्त प्रगतीशील गठबंधन म्हणजे मनमोहन सरकार विरूध्द अनेक भ्रष्टाचार घोटाळे
बाहेर काढले.आपल्या तीक्ष्ण भाषणांनी राज्यसभा गाजवली.ते.या सरकारला "पाँलिसी पँरालिस " सरकार म्हणून संबोधायचे.जेव्हा जेव्हा ते संसदेत बोलायला उठले ,प्रस्थापित सरकारला त्यांच बोलणं ध्यानपूर्वक ऐकावं लागलं कारण य़ुपीए सरकार त्यांना घाबरायची की त्यांनी आणलेले कायदे
जेटलीच्या नजरेतून सुटणार नाहीत.त्यातल्या उणीवा शोधून काढल्या जातील.पण नशीबाची अजब कहाणी होती की ऐवढी राजनैतिक कारकीर्द असून ही 2014 मध्ये कँप्टन अमरिंदर सिंह विरूध्द ते निवडणूक जिंकू शकले नाहीत..तरीही भाजप नं त्यांच्यावर विश्वास दाखवला .
आणि नरेंद्र मोदीचे सगऴ्यात विश्वासपात्र म्हणून दिल्लीच्या पाँवर इको सिस्टिम चा हिस्सा बनले. ही मैत्री ची बीज 2002 च्या गुजरात दंगली त रूजली होती. मोदी आणि जेटलीची मैत्री त्या काळात बहरली.गुजरात दंग्यानंतर वाजपेयीना, मोदी जी ना त्यांच्या पदावरून काढायचं होतं पण या निर्णयाच्या
विरोधात अडवाणी बरोबर जेटली ही ठामपणे उभे होते. 2014 मध्ये त्यांना वित्त आणि रक्षा मंत्रालय दिलं गेलं .दिल्लीच्या नाँर्थ आणि साऊथ ब्लाँक मध्ये त्यांचा वावर सुरू होता.
पण नियतीला वेगळं काहीतरी मान्य होतं.त्यांच स्वास्थ्य बिघडायला सुरवात झाली आधीची बायपास सर्जपी त्यानंतर किडणी चा त्रास. तरीही मोदी 1.0 मध्ये ते महत्तवपूर्ण खात्याचे मंत्री राहिले त्यांनी ती जबाबदारी ही योग्य रित्या निभावली .सोशल मिडीयावर त्यांऩी मोदी सरकारची बाजू
भक्कमरित्या मांडली .ज्या ज्या वेळी मोदी सरकारवर आरोप झाले त्या त्या वेळी जेटली मोदीच्या बचावात अग्रेसर राहिले.नोटबंदी असो राफेल मुद्दा असो .जानेवारी 2019 मध्ये साँफ्ट टिश्यू सारकोमा डायग्नोस झाला .या नंतर ते सक्रिय राजकारणातून बाजूला गेले.
2019 च्या निवडणूकीत ते शरीराने उपस्थित नव्हते.परंतु सोशल मिडायावर काँग्रेसविरूध्द आक्रमक राहिले .तरीही ते विरोधकांना आपल्या स्वभावाने .राजकारण आणि मैत्री वेगळी ठेऊन सन्माननीय व्यक्ती राहिले.दिल्लीच्या सिविल लाईन्सचा हा मुलगा जम्मू चा जावई सुध्दा होता.
कट्टर काँग्रेसी नेता गिरधारी लाल डोंगरा यांची मुलगी संगीता यांच्याशी त्यांनी विवाह केला होता..या विवाहाला भाजप चे वरिष्ठ नेते ही उपस्थित होते.राजकारणात असूनही त्यांनी कधी वकीली थांबवली नाही.क्रिकेटप्रेमी ही होते .दिल्ली क्रिकेट संघावर त्यांची मजबूत पकड होती.राष्ट्रीय क्रिकेट
संबंधी विषयामध्ये त्यांनी रस घेऊन कार्य ही केलं जेटली मिडीयाचे ही प्रिय होते..जानेवारी 2019 ला त्यांना टिश्यू कँन्सर झाल्यानंतर त्यांचं स्वास्थ्य खालावत गेलं.1 आँगस्ट ला त्यांना एम्स मध्ये भर्ती करण्यात आलं 24 आँगस्ट ला 12 वाजून 7 मिनींटानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
7आँगस्ट 2019 ला सुषमा स्वराज्य आणि 24 आँगस्ट ला जेटली चं जाणं भाजप साठी एक कधी ही न भरून निघणारी पोकळी बनवून गेले .A lawyer by profession.... A political giant, towering intellectual & legal luminary... "महफील भी रोयेगी, हर दिल भी रोयेगा ,
ङुबी जो मेरी कस्ती तो साहील भी रोयेगा ,
हम इतना प्यार बीखेर देगे इस दुनीया मे के,
मेरी मौत पे मेरा दुश्मन भी रोयेगा "…..
आज त्यांच्या जन्मदिनी अरूण जेटलींना माझा भावपूर्ण नमस्कार .🙏💐
You can follow @real_amruta.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.