आजही एफआरपीचा कायदा अस्तित्वात आहे. कारण शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. नवी व्यवस्था तयार होत नाहीत तोपर्यंत जुनी व्यवस्था मोडून काढू नये या मताचे आम्ही आहोत. आज देशातील सर्व गोष्टींचे खाजगीकरण केले जात आहेत. ते धनवानांच्या हाती जात आहे.
ब्रिटिशांनी सर्व गोष्टी आपल्या हातात घेतल्या म्हणून तर आपण स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि स्वातंत्र्य मिळवलं. लोकांना संस्थांचा उपयोग व्हावा म्हणून तर स्व. इंदिरा गांधी यांनी राष्ट्रीयकरणाची भूमिका घेतली. पण आज सत्ताधारी या संस्था मोठ्या भांडवलदारांच्या हाती देत आहेत.
केंद्र सरकारला ग्रामीण भागातील पतसंस्था नकोत. सहकारी बँकांना परवानगी दिली जात नाही पण खाजगी संस्था उभ्या राहत आहेत.
सहकार मंत्री @Balasaheb_P_Ncp या कार्यक्रमात उपस्थित होते. आपण या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन ग्रामीण भागातील सहकार चळवळ बळकट करावी अशी विनंती त्यांना केली.
सहकार मंत्री @Balasaheb_P_Ncp या कार्यक्रमात उपस्थित होते. आपण या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन ग्रामीण भागातील सहकार चळवळ बळकट करावी अशी विनंती त्यांना केली.