मागील भागापासून पुढे:
इतर भागांची लिंक खाली दिली आहे.

मनुस्मृती आणि चातुर्वर्ण्य - भाग ४

मनुने वर्णावर्णातील स्त्री-पुरुषांच्या अनैतिक संबंधांचा कधी धिक्कार केला नाही, उलट त्यांच्या समागमातून उत्पन्न झालेल्या संततींसाठी जाती उत्पन्न करून, त्यांचे धंदे ठरवून देऊन
अनैतिक संबंध धर्म्य केले. ब्राम्हण पुरुषापासून वैश्य कन्येच्याठायी ' अम्बठ ' नामक पुत्र होतो व शुद्र कन्येच्या ठायी ' निषाद ' होतो. क्षत्रिय पुरुषापासून शुद्र कन्येच्या ठायी ' उग्र ' नामक पुत्र होतो. ब्राम्हण पुरुषापासून क्षत्रिय, वैश्य व शुद्र कन्येच्या ठायी होणारे पुत्र
क्षत्रिय पुरुषाला वैश्य आणि शुद्र कन्यापासून होणारे पुत्र आणि वैश्य पुरुषाला शुद्र कन्येपासून होणारे पुत्र मनुला धर्म्य आहेत. त्याचे म्हणणे इतकेच आहे की, त्या पुत्रांना सवर्णांहून निकृष्ट समजावे. हे अनुलोमासंबंधी झाले. प्रतीलोमासंबंधी लिहिताना मनु म्हणतो, ब्राम्हण स्त्रीला
क्षत्रियापासून होणारा पुत्र ' सुतपुत्र ' असतो. वैश्यापासून होणारा पुत्र ' मागध ' असतो. तर क्षत्रिय स्त्रीपासून होणारा पुत्र ' वैदेह ' असतो. शुद्र पुरुषापासून वैश्य स्त्रीला ' आयोगव ' पुत्र होतो. क्षत्रिय कन्येला ' क्षता ' नामक पुत्र होतो आणि शूद्रापासून ब्राम्हण कन्येला झालेला
पुत्र मनुष्यातील अधम ' चांडाळ ' पुत्र होतो. ( मनुस्मृती,१०.७ ते १२ ) मनुने ही यादी त्याकाळात अस्तित्वात असणाऱ्या सर्वच जातींना भिडवून वर्ण संकरातून होणार्या प्रजेची शेकडोत वर्गवारी करून त्यांना धंदे वाटप करून दिले आहेत. त्यांच्या वाट्याला नेमून दिलेल्या धंद्याची चर्चा पुढे येईलच.
या ठिकाणी मनूला नैतिकतेची किती चाड होती एवढाच विचार करायचा आहे. मनूने प्रतिपादन केलेली अनैतिक समाजव्यवस्था केवळ
पुरुषांच्या बदफैलीपणापुरती सीमित नव्हती तिचा व्याप त्यापेक्षा अधिक आहे. ' ब्राम्हणाने यज्ञादिकासाठी वैश्याचे धन बलात्काराने हरण करणे यातही काही दोष नाही.' ( मनु. १०.१२ ) एखाद्याचे धन बलात्काराने हरण करण्याच्या कृतीला आपण दरोडा घालणे, असे म्हणतो परंतु मनु मात्र तसे मानत नाही.
'आपत्काली जरुरीपुरते शूद्राचे धन हरण करण्यात कोणताही दोष नाही. ( मनु ११.०३ ) असे मनु सांगतो. एखाद्याचे श्रमाने कमावलेले धन हरण करून आपल्या गरजा भागविणाऱ्या कृतीस आपण ' चोरी ' म्हणतो. ' परंतु शूद्राने मात्र वरील दोन्ही कारणांसाठी वरिष्ठ वर्णाचे धन हरण करू नये. ( मनु. ११.१६ ते १८ )
हा मनूचा आदेश म्हणजे वरिष्ठ वर्णाच्या हितसंबंधांचे आणि त्यांच्या धनाचे संरक्षण करण्याचा खास ' कावा ' आहे. मनूच्या दृष्टीने ' शूद्राला धन असूच शकत नाही.' ( मनु. ८.४७ ) स्वतःच्या श्रमाने धनाची निर्मिती करणाऱ्यांना त्यांच्या निर्मितीवरील अधिकार नाकारणे हा ' अन्याय ' झाला. मनुने
कनिष्ठ वर्णाच्या तुच्छतेपोटी या प्रकारच्या अनैतिक, दरोडेखोरी, चोरी यांचे समर्थन करणाऱ्या कावेबाज समाजव्यवस्थेची निर्मिती करण्यास अभय दिले. आपल्या देशातील बहुतेक ब्राम्हणांची विद्वत्ता या जातीबद्ध व्यवस्थेचे समर्थन करण्यात आणि क्षत्रियांची सारी शक्ती या व्यवस्थेला वास्तवात आणण्यात
याप्रकारे खर्च झाली . म्हणून भारत त्याच्या इतिहासात मानवजातीची प्रगती करणाऱ्या विविध उपक्रमांना चालना देऊ शकला नाही. आणि बहुजन समाज दारिद्र्यात खितपत पडला.

मनुस्मृती वरील विवेचन इथेच थांबवतो. यानिमित्ताने मनुची भलावण करणाऱ्या विकृत मेंदूच्या विकृतांना या देशात कोणती व्यवस्था
अपेक्षित आहे?

भाग १
https://twitter.com/Manoj2212Khare/status/1341964468201213952?s=19

भाग २
https://twitter.com/Manoj2212Khare/status/1342336455293595648?s=19

भाग ३ https://twitter.com/Manoj2212Khare/status/1342725110717849600?s=19
You can follow @Manoj2212Khare.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.