#मोठीथ्रेड 
"कालचं भाग्यनगर, आजचं काश्मीर, उद्याचं बंगाल आणि विरोधक अक्कलकंगाल.."
२०१६ साली झालेल्या भाग्यनगर मनपाच्या निवडणुकीत अवघ्या चार नगरसेवकांवरून ह्या वर्षी झालेल्या निवडणुकीत भाजपाने ४८ वर झेप घेतली. अगदी स्थानिक म्हणाव्या अश्या ह्या निवडणुकीत भाजपाने जसा रंग भरला +

तसा त्यांना लाभ झाला, हे देशाने पाहिले. त्याचा योग्य तो धडा चंद्रशेखर रावांनी घेतला असेल कारण येत्या विधानसभेचा हा ट्रेलर होता, हे धडाधडीत वास्तव नाकारायला काय ते मविआचे अक्कलशुन्य नेते नव्हेत आणि संजय राऊत तर अजिबात नाहीत. अर्थात देशपातळीवर चंद्रशेखर राव हे कितपत मोदीविरोध +
करतील ह्यावर मला शंका आहे. कारण मोदींविरोधात कोणतेही प्रभावी मुद्दे कोणत्याही विरोधकाला अजूनतरी सापडले नाहीत. जेंव्हा केंव्हा सापडले असा कांगावा केला गेला, तेंव्हा त्याचे उत्तर खुद्द जनतेनेच त्यांना दिलेले आहे. अर्थात येत्या काळात चंद्रशेखर राव ते सर्व करण्यापासून फारकत घेतील +
अशी आशा आहे, जर त्यांना भाजपाला टक्कर द्यायच्या नादात आपली जागा डळमळीत करून घ्यायची नसेल तर.. पाहूया
तुलनेने भाग्यनगरात भाजपाला कमी संघर्ष करावा लागला. बंगालात भाजपाला अगदी कटथ्रोट कॉम्पिटिशन म्हणावी अशी स्पर्धा करावी लागत आहे. कित्येक हत्या, कित्येक हल्ले, जाळपोळ ह्या सर्व +
तुलनेने भाग्यनगरात भाजपाला कमी संघर्ष करावा लागला. बंगालात भाजपाला अगदी कटथ्रोट कॉम्पिटिशन म्हणावी अशी स्पर्धा करावी लागत आहे. कित्येक हत्या, कित्येक हल्ले, जाळपोळ ह्या सर्व +
आगीतून तावून सुलाखून निघण्याचा प्रवास भाजपाला बंगालात करावा लागतोय, तेवढा भाग्यनगरात करावा लागला नाही. बिहार निवडणुकीनंतर भाजपाने भाग्यनगर निवडणुकीतला जोर भयंकर वाढवला. आणि हे ४८ जागांचे फळ पदरात पडले. साधारण दीड-एक महिन्यात..
काश्मीर संबंधी जे काही झालं, तो भारतीय राजकीय आणि +
काश्मीर संबंधी जे काही झालं, तो भारतीय राजकीय आणि +
संविधानिक इतिहासात चमत्कार म्हटल्यास वावगे नाहीच. "३७० कलम उडवले जाणे आणि तिथे हिंदुत्ववाद्यांचे शासन येणे", हे स्वप्नवतच होते. पण आज ह्या दोन्ही शक्यता वास्तवात उतरताना दिसत आहेत. ३७० कलम रद्द करणे हे जनता स्विकारत नाहीये, तिथे किती महाभयंकर आक्रोश आणि असंतोष धुमसत आहे, ह्याची +
चविष्ट वर्णने रंगवणाऱ्या माध्यमांना तिथे नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुकांनी खणखणीत कानाखाली वाजवली आहे, एवढे यश भाजपासारख्या हिंदुत्ववादी पक्षाला मिळाले आहे. महबुबासोबत भाजपा गेल्यावर भाजपावर टीका करणारे आज त्याच महबुबाची केविलवाणी अवस्था आणि काश्मिरचे +
आशादायी वास्तव, ह्यावर चुकूनसुद्धा थोबाड उचकटत नाहीत, ह्यातच मोदींचे यश.
यश ओरडून सांगावं लागत नाही.. विरोधकांनी कितीही त्याविरुद्ध गोंगाट केला तरी सामान्य जनतेला सत्य आणि पूरक परिस्थितीची जाणीव असतेच. काश्मीर हे ताजे उदाहरण..
बंगालात दशकापेक्षा जास्तची मेहनत आहे. बंगालात +

ज्यापद्धतीने अमित शहा, नड्डा, वगैरेंच्या रोड-शोला प्रतिसाद मिळाला. तो पाहता ममता बानोबद्दलचा जनाक्रोश कोणत्या पातळीवर गेलाय ह्याची कल्पना येते.
ह्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय विरोधक काय करत आहेत?
काँग्रेसच्या एकंदरीत प्रवासावर जर नजर टाकली, तर कोणाच्याही लक्षात येईल की, +
ह्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय विरोधक काय करत आहेत?
काँग्रेसच्या एकंदरीत प्रवासावर जर नजर टाकली, तर कोणाच्याही लक्षात येईल की, +
काँग्रेस ही आकुंचन पावत गेलीये. केवळ गांधी घराण्याच्या नावावर ही टिकली नाही तर तेवढ्या पातळीवरचा विरोधक तयार व्हायला वेळ लागला, म्हणून ती टिकली. सर्व देशाला बांधून ठेवणारे धोरण काँग्रेसकडे कधीच नव्हते. म्हणून दक्षिणेतून काँग्रेस संपत गेली. पूर्वोत्तर राज्ये हा भारताचा भाग आहे, +
हे काँग्रेस अजूनही विसरलेलीच दिसते. जिथे जिथे काँग्रेस होती तिथे तिथे बहुतेक ठिकाणी आज ती प्रादेशिक पक्षांच्या टेकुवर डळमळीत अशीच उभी आहे. अगदी पश्चिम बंगालात सुद्धा ती अगदी "तृण - मूल" सुद्धा नाही.
मुळात काँग्रेसला डळमळीत असण्यातच सार्थकता वाटते का? अशीही शंका मला येते. कदाचित +
मुळात काँग्रेसला डळमळीत असण्यातच सार्थकता वाटते का? अशीही शंका मला येते. कदाचित +
संजय राउतीझम काँग्रेसमध्ये जास्त असावा. कारण अशक्त होत असणारी काँग्रेस ही खुद्द काँग्रेसच्या नेत्रुत्वाला चिंतेची बाब वाटत नाही.
राम मंदिर आंदोलनाने देश जागा केला. तो जागा झालेला देश मतपेटीतून अगदी ठळक दिसायला २०१४ साल उजडावे लागले. नरेंद्र मोदींसारखे प्रखर नेतृत्व दिसले आणि +
राम मंदिर आंदोलनाने देश जागा केला. तो जागा झालेला देश मतपेटीतून अगदी ठळक दिसायला २०१४ साल उजडावे लागले. नरेंद्र मोदींसारखे प्रखर नेतृत्व दिसले आणि +
काँग्रेस पाळापाचोळ्यासारखी उडत चालली. नुसती काँग्रेसच नाही तर इतर छोटे छोटे विरोधक सुद्धा बाजूला पडत गेले. पडत जात आहेत. २०१९ नंतर ह्यावर कळस रचला गेला..
पश्चिम बंगालाच्या पार्श्वभूमीवर जिंकायची इच्छा आणि सामर्थ्य कोणात जास्त आहे ह्याची जाणीव देशाला होत आहेच..
३ आमदार वाली +
पश्चिम बंगालाच्या पार्श्वभूमीवर जिंकायची इच्छा आणि सामर्थ्य कोणात जास्त आहे ह्याची जाणीव देशाला होत आहेच..
३ आमदार वाली +
भाजपा जेवढी पश्चिम बंगालात श्रम घेतीये तेवढे श्रम खुद्द सत्ताधारी सुद्धा घेताना दिसत नाहीत..
काही ठिकाणी विजयाचे परिमाण सत्ता स्थापनेवर अवलंबून असतं तर काही ठिकाणी किती जागा आल्या ह्यावर तर काही ठिकाणी मतदानात टक्का किती वाढला ह्यावर अवलंबून असतं.. ह्या तीनही आघाडीवर भाजपा +
काही ठिकाणी विजयाचे परिमाण सत्ता स्थापनेवर अवलंबून असतं तर काही ठिकाणी किती जागा आल्या ह्यावर तर काही ठिकाणी मतदानात टक्का किती वाढला ह्यावर अवलंबून असतं.. ह्या तीनही आघाडीवर भाजपा +
जवळपास सगळीकडे आघाडीवरच आहे..
बंगालात अवघे तीन आमदार असणाऱ्या भाजपच्या यशाचे परिमाण किती आमदार निवडून आले ह्यावर असणार आहे. अर्थात काही राजकीय पंडित भाजपा सत्ता स्थापन करेल ह्याच विचारावर मांड ठोकून आहेत. अर्थात त्रिपुरात २०१३ मध्ये एकही आमदार नसताना २०१८ मध्ये भाजपने स्वबळावर +

मुख्यमंत्री बसवण्याचा केलेला पराक्रम बघता हा विचार दुर्लक्षून चालणार नाही.
"भाजपाची आक्रमक रणनीती आणि त्यावर बिथरलेल्या ममता बॅनर्जी", पाहता भाजपाला अशक्य काहीही नाही..
ममतांनी पवारांना फोन केल्याची बातमी मध्यंतरात झळकली होती. "तृणमूल" चं मोल तृणापेक्षाही कमी होत असताना +
"भाजपाची आक्रमक रणनीती आणि त्यावर बिथरलेल्या ममता बॅनर्जी", पाहता भाजपाला अशक्य काहीही नाही..
ममतांनी पवारांना फोन केल्याची बातमी मध्यंतरात झळकली होती. "तृणमूल" चं मोल तृणापेक्षाही कमी होत असताना +
त्यांनी जर पवारांचे साहाय्य घ्यायचे ठरले असेल तर त्यांचा नाहीसे होण्याचा वेग हा नक्कीच वाढेल, कारण "पवारटच" होताच पक्ष कसा अधोगतीला जातो हे विश्लेषकांना माहित नसेल असे नाहीच..
सध्या तरी 'मोदी शहांच्या भाजपाला हरवायची ताकद खुद्द 'मोदी-शहा' सोडले तर कोणात फारशी दिसत नाही. जनमत +
सध्या तरी 'मोदी शहांच्या भाजपाला हरवायची ताकद खुद्द 'मोदी-शहा' सोडले तर कोणात फारशी दिसत नाही. जनमत +
मोडून दगाबाजीच्या अधिष्ठानावर सत्तारूढ झालेल्यांवर मी बोलणार नाही, वेळच बोलेल..
भाजपाला हरवायचं असेल तर मिडीया मॅनेज करून फायदा नाही. तथ्यहीन आरोप करून फायदा नाही. आंदोलनं करून जनमानस वेठीस धरूनही काही फायदा नाही. तर हैद्राबाद, काश्मिर आणि पश्चिम बंगाल मधली निवडणूक ही देशातील +
भाजपाला हरवायचं असेल तर मिडीया मॅनेज करून फायदा नाही. तथ्यहीन आरोप करून फायदा नाही. आंदोलनं करून जनमानस वेठीस धरूनही काही फायदा नाही. तर हैद्राबाद, काश्मिर आणि पश्चिम बंगाल मधली निवडणूक ही देशातील +
सर्व पक्षांसाठी एक रिसर्च असाईंमेन्टच आहे. ती व्यवस्थित केली तरी बऱ्याच गोष्टी समजू शकतात..
अर्थात मानली तर.
सध्या तरी तसं कोणी दिसत नाही. कदाचित स्वतःचे "अक्कलकंगालत्व" जाहीर करण्यात त्यांना "भूषण" वाटत असावे..
अजून काय लिहू? थांबतो..
- चेतन दीक्षित
अर्थात मानली तर.
सध्या तरी तसं कोणी दिसत नाही. कदाचित स्वतःचे "अक्कलकंगालत्व" जाहीर करण्यात त्यांना "भूषण" वाटत असावे..
अजून काय लिहू? थांबतो..
- चेतन दीक्षित