#Thread #म #मराठी
5G मानसिकता
१/ जनरेशन गॅप च्या नावाखाली सर्व काही सपाटून जाते अशी साधारणतः समजूत झाली आहे . नक्की आहे तरी किती मोठी ही गॅप ! तुम्हाला नाही कळणार ते , तुला काय करायचंय ,आता जग बदललंय , तुमचा काळ नाही राहिला अशी उत्तरे मिळतात.
5G मानसिकता
१/ जनरेशन गॅप च्या नावाखाली सर्व काही सपाटून जाते अशी साधारणतः समजूत झाली आहे . नक्की आहे तरी किती मोठी ही गॅप ! तुम्हाला नाही कळणार ते , तुला काय करायचंय ,आता जग बदललंय , तुमचा काळ नाही राहिला अशी उत्तरे मिळतात.
२/ आपले पाल्य समाजात आपले प्रतिनिधित्व करते आणि त्याच्या विषयी जर चुकीचा अभिप्राय मिळत असेल तर हे पालकत्वाला तडा गेल्यासारखे झाले. समाज हा फक्त फुकटची मते मांडण्यासाठी आहे आणि त्यात जर अशी परिस्थिती असेल तर संस्कारांवर स्तुतीसुमने उधळल्या शिवाय त्यांना चैन पडू शकत नाही!
३/ जग जरी फार पुढे निघून गेले असले तरी काही गोष्टी बदलत नाही. थोरामोठ्यांचा आदर करणे तर दूरच त्यांच्याशी दोन शब्द बोलले तरी खूप झाले असे वातावरण आहे. पाहुणे आल्यावर त्यांना पाहून फोन बाजूला ठेवणे हा मॉडर्न आदर आहे असे वाचण्यात आले, काही वर्षांनी आदर हा केवळ एक शब्द बनून राहील!
४/ पूर्वी मित्र हे मित्र असायचे आता मित्र म्हणजे फक्त संख्येत मोजायची गोष्ट झाली आहे , सोशल मीडियावर जसे आभासी जग असते तसेच मित्रत्वाचा आभास दाखवणारे हे मित्र ! वाढदिवसाला गर्दी करणारे हे मित्र अडचणीच्या वेळी दिसत नाहीत.
५/ खोटा प्रेमाचा वर्षाव आईचे प्रेम मागे टाकत चालला आहे. तलवारीने कापलेला केक वडिलांनी आणलेल्या केक पेक्षा जास्त अप्रुक वाटतो. आई वडील मरेपर्यंत सोबत असतील , हे मित्र नाही हा वैचारिक गॅप जो पर्यंत भरून निघत नाही तो पर्यंत गल्लोगल्ली असे टुकार युवानेते जन्म घेत राहणार !
६/ आपले आई वडील कुठे आपल्या साठी काय जगावेगळं करतात , त्यांचं ते कर्तव्यच आहे ! पण आपले त्यांच्या प्रति काय कर्तव्य आहे याचा विचार नाही करू वाटत ? नको तिथे मोठेपणा , भांडण करून नसलेली ताकद दाखवणे , चार-पाच आपल्या सारखे मागे सोबत , व्यंग राहून काय मिळते ?
७/ सणावारांना चौकातल्या फ्लेक्स वर फोटो आहे म्हणून कुणी नोकरी देत नाही ! प्रेमाला वयोमर्यादा नसते या वाक्याचा शब्दशः अर्थ घेण्याची हीच ती वेळ कारण पाचवीतील बंटीचा पण प्रेमभंग होऊ लागला आहे! प्रेमाच्या व्याख्या च बदलून गेल्या आहेत.
८/ चित्रपट, इत्यादी माध्यमांतून याला खतपाणी मिळत आहे आणि मग प्रश्न उपस्थित होऊ लागतात, गुन्हेगारी मध्ये तरुणाईचे प्रमाण का वाढत आहे? प्रत्येकाला मान-सन्मान हवा आहे, मार्ग चुकीचा असला तरी चालेल! नावापुढे दादा लागल्याने कुणी भाई बनत नाही,हा आदर नसून चुकीच्या मार्गावरील पहिले पाऊल!
९/ दुनियादारी म्हणजे सर्वस्व नव्हे हे कळणे महत्वाचे आहे. दुनियेचे प्रश्न सोडवण्याआधी स्वतःच्या आयुष्यातील प्रश्न सोडवले तर जीवन मार्गी लागेल. याचे पडसाद आणखी काही वर्षांनी सांसारिक आयुष्यात उमटतील हे नक्की! ‘मी’ पणा बाजूला ठेवण्याची हीच ती योग्य वेळ!
१०/ या बिघडवणाऱ्या लोकांपासून दहा हात लांब राहण्यातच शहाणपण आहे. म्हणूनच कदाचित यांची तुलना पालक कुत्र्यामांजरांसोबत करत असावी , पण हा तर त्यांचाही अपमान म्हणावा लागेल. वाईट गोष्टींमध्ये वेळ घालवून शष्प मिळणार नाही हेच सत्य ! बाकी वैयक्तिक मर्जी !
-प्रतिक
-प्रतिक