कंगणाबाईंच्या बिकीनी फोटोवरून सनातन धर्म दुखावला गेला, अगदी अपेक्षित प्रतिक्रिया आली. बाईला बाई न मानणारा हा तोच सनातन धर्म आहे. बाईचा पत्नी ते 'पति'व्रता पर्यंतचा प्रवास याच सनातन धर्मात झाला. वेदानी दिलेलं थोडफार स्वातंत्र्य स्मृतींनी ओढवून घेतलं अन् बाईची व्याख्या पतिव्रतेत
होऊ लागली. वैवाहिक जीवनातच पतिव्रता असते असा तद्दन गैरसमज आहे. पत्नी वा बाई असं काही अस्तित्वातच नसते, जर असली तरी ती तुच्छ असते हे ठासवण्यासाठी पत्नी ऐवजी 'पति'व्रतेची सुरुवात झाली.

आता पतिव्रता कोण? जी आपल्या पुरूषांने उरवून ठेवलेलं जेवण खाते, पुरूषाआधी झोप घेऊ शकत नाही, जी
पतीची आज्ञा सर्वोतोपरी मानते ती खरी पतिव्रता असते, हे युध्दिष्ठिराला मार्कंडेयाने सांगितले म्हणे. (शांती पर्व)

पतीची सेवाच तीला मोक्षाची प्राप्ती करून देते. तिला 'पतीलोकात' अन् शेवटी देवलोकात जायचे असल्यास खरा पतिव्रता धर्म सिद्ध करावे लागायचे. स्रीच्या मोक्षाचा एकमेव मार्ग
पतिव्रतेतून जात होता म्हणे.

आयरनी म्हणजे पतीच्या सांगण्यावरून 'ओघावतीला' परपुरूषा सोबत संबंध ठेवण्याचा आदेश दिला होता पण त्यात कोणतेही गैर नाही कारण त्यासाठी पतीची आज्ञा होती. पतीच्या आज्ञेशिवाय तो पाप आहे. परपुरूषा कडे बघणे सूर्य, चंद्र सारख्या पुरूषी देवांकडे एकटक पाहणे
हेही पतिव्रता धर्माचे उल्लंघन होते. (अनुशासन पर्व)

अशा सुंदर नियमावलीत बाईचे आयुष्य सरत होते. अशा सनातन धर्मातून बाई एकविसाव्या शतकात आली आता कंगणाबाईं सारख्या उथळ बायकांना हेच सनातन धर्म प्रिय वाटते. कट्टर धार्मिक उजवी मंडळी बाईला एक तर प्रॉपर्टी मानतात वा देवी मानतात.
अशांची बारा महिने बाजू घेऊन लढल्यानंतर त्यांच्या कडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची अपेक्षा ठेवता यापेक्षा मोठी आयरनी होऊ शकत नाही.

महिला अविवाहित राहू नये यामुळेच पति'व्रतेची तरतूद केली हे न समजण्याइतकी हुशार मंडळी आज आहेत. आत्मा सनातन धर्माची मान्यता आहे पण कुठेही
तिला जेंडर असल्याचे दिसून येत नाही तरीही स्रियांसाठी मोक्षाची वेगळी तरतूद केली होती. इथे सनातन धर्म स्वतःला कॉन्ट्रॅडिक्ट करतो. स्त्रीला मुठीत कैद करण्याच्या कथा द्रौपदी सारख्या लिबरल पात्रातही दिसून येतीलच.

असो, कंगणाबाईंनी स्वतःला डिफेंड करण्यासाठी संविधानाचा आधार घेण्याऐवजी
सनातन धर्माचा आधार घेतला. काय बोलणार आता..! रहा अजूनही धर्माच्या प्रेमात. जग पुढे जाईल तुम्ही हेच करत रहा.

बाई जातीला कुठलीही ओळख नसते ती बाईच असते म्हणून किमान तुम्ही एकविसाव्या शतकातील स्त्रीया तरी अशा जाळ्यात येऊ नका व कोणाला येऊ देऊ नका. 🙏

_____________

- प्रथमेश पुरूड
You can follow @prathameshpurud.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.