आज आपण अश्या राणी विषयी जाणून घेणार आहोत जी,इंग्रजांनविरूध्द भारताच्या इतिहासात बंड करणारी पहिली शासक स्री म्हणून प्रसिध्द आहे.
1824 मध्ये या राणीनं ईस्ट इंडिया कंपनीला जेरीस आणलं होत. राणी लक्ष्मीबाईंच्या ही आधी 56 वर्षापूर्वी या वीरांगणेनं इंग्रजाशी कडवी झुंज दिली.
......कित्तूर राणी चेन्नम्मा......
"चेन्नम्मा " चा अर्थ होतो "सुंदर कन्या "
या सुंदर कन्येचा जन्म दक्षिण कर्नाटक च्या बेळगाव जिल्ह्यातील 'काकती ' .गावात काकतीय लिंगायत राजवंशामध्ये झाला.वडील धूलप्पा आणि आई पद्मावती यांनी एखाद्या राजपुत्राप्रमाणं राणीचं पालन पोषण केलं.
या सुंदर कन्येला ,संस्कृत ,मराठी, कन्नड,ऊर्देू भाषा अवगत होत्या.याचबरोबर घोडेस्वारी,तलवारबाजी,शस्र चालवणे ,युध्दकला यांच शिक्षण दिलं गेलं.
काकती च्या जवळ ' कित्तूर ' हे समृद्ध  राज्य होत. हिरे जड-जवाहिरे याचा व्यापार मोठ्या प्रमाणित तिथे होत होता.
एकदा कित्तूर चे राजा मल्लसर्ज देसाईंना कळलं,की काकतीमध्ये नरभक्षी वाघने धुमाकूळ घातला आहे.त्यांना शिकारीची आवड होती.राजा काकती गावात गेले आणि वाघाचा शोध सुरू केला.जशी त्यांना वाघाची चाहूल लागली ,त्यांनी आपल्या धनुष्याचा चाप ओढला,वाघ जखमी होऊन खाली पडला.जेव्हा राजे...
वाघाजवळ गेले ,त्यांनी पाहिलं की,वाघाला दोन बाण लागले आहेत.ते विचारात पडले.तेवढ्यात झुंडपामध्ये सैनिकी वेषात असणार्या सुंदर मुलीवर राजाची नजर पडली.ही मुलगी म्हणजेच राणी चन्नम्मा होती.मल्लसर्ज राजे प्रभावित झाले.आणि त्यांनी राणीला लग्नाची मागणी घातली.
15 वर्षाची चेन्नम्मा कित्तूर राणी चेन्नम्मा बनली.. .पण नियतीचा खेळ वेगऴाच होता.
राणीनं एका पुत्रालाही जन्म दिला . या काऴातचं राजा 1816 ला कालवश झाला पण लवकरचं राणीचा पुत्र ही मरण पावला.नंतर राणीनं नात्यातील शिवलिंगप्पा ला दत्तक घेतला.
त्या वेळी कर्नाटक सहित पूर्ण भारतावर इंग्रजाचं राज्य होतं. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचे गव्हर्नर.लाँर्ड डलहौसी नी दत्तकविधान ची निषेध नीती जाहीर केली होती.या नीतीनुसार भारतातील राजघराण्यांना ज्यांना रक्ताचा वारस नव्हता त्या राज्यांना ईस्ट इंडिया कंपनी आपल्या आखत्यारित
घेत होती.खरं तर सगळी भारतीय राजघराणी काबीज करून भारतावर राज्य करणे हेच या नितीमागचे मुख्य कारण होतं. या नीतीला "doctrine of lapse" असं नाव होतं.इंग्रजाची नजर या छोट्याश्या पण संपन्न राज्यावर खूप आधिपासून होती.हा सगळ्यात अनुकूल मौका त्यांना मिळाला.
दत्तक घेतलेल्या मुलाला त्यांनी कित्तूर चा उत्तराधिकारी मानन्यास नकार दिला.आणि हे राज्य कसं हडपलं जाऊ शकतं याची योजना बनवू लागले.त्यावेळी राणीनं ठणकावून सांगितलं की उत्तराधिकारी कोण असावा ही राज्याची खाजगी गोष्ट आहे याच्याशी ईस्ट इंडिया कंपनीचा काहीही संबंध नाही .
या बरोबरचं राणीनं प्रजेलाही सांगितलं की, जोपर्यंत तुमच्या राणीच्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब शिल्लक आहे.तुमची राणी तुमचं रक्षण करेल आणि कित्तूर अभेद्य ठेवेल..राणीच्या या उत्तरांनी इंग्रज भडकले.धारवाडचे कलेक्टर थेंकर नी 500 शिपायासहित कित्तूर चा किल्ला घेरला .
23सप्टेंबर 1824 चा दिवस होता .किल्ल्याचे बुंलद दरवाजे बंद होते थेंकर ने राणीला आत्मसमर्पण करायला सांगितलं..आणि अचानक किल्ल्याचे बुलंद दरवाजे उघडले गेले.दोन हजार देशभक्त सैनिकांच्या सहीत राणी चेन्नम्मा इंग्रजानवर तुटून पडली.राणीनं अनेक सैनिकांना कंठस्नान घातलं .
मग इंग्रजांनी मद्रास आणि मुंबई हून अधिक कुमक मागवली.3 डिसेंबर 1824 ला पुन्हा कित्तूर वर आक्रमण केलं परंतु या ही वेऴी देशभक्त सैनिक आणि वीर राणीनं त्यांचा पराभव केला. पण दोन दिवसातचं कित्तूर वर पुन्हा हल्ला करण्यात आला.या युध्दात 20 हजार शिपाई आणि 400 बंदू्ंकाचा वापर करत
इंग्रज चालून आले..चेन्नम्मा चे मुख्य सेनापती बलप्पा नीं पहिल्याच प्रयत्नात इंग्रजाना पाठीमागे ढकलण्यात यश मिऴवलं.आणि ब्रिटीश सेनेचे दोन प्रमुख आधिकारी ,सर वाँल्टर इलियट आणि स्टीवेंसन यांना बंदी बनवलं
या नंतर ब्रिटीशांनी आपल्या अधिकार्याना सोडण्यासाठी राणीशी तह केला .
आणि ते आधिकारी सोडले गेले.पण दुसर्या चरणातील युध्दात दुसर्या मोर्चावर असणारा आधिकारी चँपलिन ने लढाई चालू ठेवली.देशभक्त सैनिकांनी कडवी झुंज दिली.सोलापूर चे सब कलेक्टर मुनरो यांना मृत्युमुखी पाडलं.लढाई खूप लांबली ,सैन्य दमलं आणि इंग्रजांन इतका शस्र साठा ,दारूगोळा
नसल्याने राणीला या युध्दात पराभव पत्करावा लागला . इंग्रजानी राणीली कैद करून बेंलहोंगल च्या किल्ल्यात ठेवलं राणीच्या महत्तवाच्या सहकार्याना फाशी देण्यात आली.आणि कित्तूर ची मनमानी लूट करण्यात आली.जवळजवळ पाच वर्षे राणीला बंदी बनवण्यात आलं.21फेब्रुवारी 1829 ला या किल्यामध्येचं
राणीनं अखेरचा श्वास घेतला..या बहादुर राणीला स्थानिक लोकांनी खूप सहाय्य केलं.
या राणीला आजही कर्नाटक मध्ये देवीसारखं पूजले जातं.त्यांच्या स्मरणार्थ 22 ते 24 आक्टोबर कित्तूर उत्सव साजरा केला जातो..राणीचे अश्वारूढ पुतळे बेंगलुरू आणि कित्तूर मध्ये पहायला मिऴतात.
आजही कित्तूर राजवाडा आणि ऐतहासिक इमारती या महान वीरांगणेच्या वीरतेची साक्ष देतात.या वीरांगणेन जी स्वातंत्र्याची ऊर्मी जागृत केली त्यातून अनेक वीरांनी प्रेरणा घेतली.राणीच्या स्मरणार्थ दिल्लीच्या पार्लंमेंट हाऊस परिसरात 11सप्टेंबर 2007 ला भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती..
श्रीमती,प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते राणी चेन्नम्मा च्या मूर्तीचं अनावरण करण्यात आलं.
बंगलूर हून कोल्हापूर ला जाणारी पहिल्या रेल्वेचं नामंकरण ही याच राणीच्या नावानी "राणी चेन्नम्मा एक्सप्रेस" केलं गेलं .राणीच्या जीवनावर आधारित एक फिल्म ही आहे.
"कित्तूर चेन्नम्मा" ज्याचं निर्देशन .बी.आर. पंठलु नी केलं आहे.
राणी चेन्नम्माचं योगदान विसरलं जाऊ शकतं नाही. राणी फक्त महिला शक्ती चं प्रतिक नव्हती तर एक परिपूर्ण प्रेरणा स्रोत होती.आपल्या तत्वांवर आणि स्वाभिमानांवर जीवन जगणं याच मूल्य अमूल्य असतं. अशा राणीला माझा मानाचा मुजरा..जय हिंद.
सदर माहिती मी Vasantha Prakaashana. यांच्या व बसवराज नायकर यांच्या पुस्तकातून घेतली आहे. वरील पुस्तके आपणास आँनलाईन विक्री साठी उपलब्ध आहेत.
You can follow @real_amruta.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.