#सावरकरांच्या_आठवणी
भाग १९ : #आत्मर्पण

तात्या (स्वातंत्र्यवीर सावरकर) दररोज रात्री निजताना योगविषयक श्लोक म्हणत. त्या वेळी ते आपले दोन्ही हात प्रथम टाळूवर ठेवून मग कपाळ, छाती, पोट यांवर ठेवीत ठेवीत पायांवरून पावलांकडे सावकाश नेत असत.

#स्वातंत्र्यवीरसावरकर

(१/१०)
ते श्लोक पुटपुटत असल्याने ते श्लोक कोणते हे सांगणे कठीण होते; पण ते सदर कृती तीन वेळा करीत. हा प्रकार मी लागोपाठ ३-४ दिवस पाहिला. कुतूहल तर निर्माण झाले होते, पण तात्यांना मी हेतुतःच काही विचारले नाही. कदाचित त्यांनी हा परिपाठ बंद केला असता, अशी मला भीती वाटली.

(२/१०)
मात्र कुतुहलाने त्या वेळी कामावर असलेल्या शुश्रूषांकडे मी चौकशी केली होती. त्यांनीही तेच सांगितले. तेव्हा माझी निश्चिती झाली की, योगविषयक श्लोक ते म्हणत असावेत व त्यातील अर्थाप्रमाणे ते डोक्यापासून हात ठेवत ठेवत पावलांपर्यंत नेत असावेत.१९ फेब्रुवारी १९६६ ला अमावास्या होती.

३/१०
त्या संध्याकाळपासून त्यांची तगमग होत होती. जीव आत ओढला जात होता. मी खाली #सुधीरफडके यांच्याशी उपचारासंबंधी बोलत होतो. इतक्यात घाईघाईने कोणीतरी येऊन मला निरोप दिला की, तात्या तुम्हाला हाका मारत आहेत. ताबडतोब त्यांच्याजवळ जाऊन मी आल्याचे त्यांना सांगितलेते.

(४/१०)
ते अत्यंत क्षीण झाल्याने प्रयत्नाने मोठ्याने मला म्हणाले, ‘‘विश्वास, आता माझा अंतकाळ जवळ आला."
प्राणोत्क्रमणाच्या वेळी मी त्यांच्यापाशी राहावे असे त्यांना वाटत असावे. त्या रात्री डॉ. गोडबोले यांनी उद्या सकाळ दिसेल की नाही, अशी शंका व्यक्त केली होती. पण ती रात्र पार पडली.

(५/१०)
दुसऱ्या दिवशी प्रकृतीत थोडी सुधारणा झाली. तेव्हा डॉक्टरांनाच आश्चर्य वाटले.तद्नंतर मात्र दि. २२ ते २६ पर्यंत प्रकृती बिघडतच गेली.
कानांत, घशात सूज आली होती. तोंडही आले असल्याने पाणीसुद्धा तोंडात घेणे अशक्यच झाले. त्यामुळे पाणी पण वर्ज्य झाले.अशा अवस्थेत फेब्रुवारी २६ उजाडली.
६/१०
नऊ वाजल्यानंतर त्यांना श्वास घेणे जड जाऊ लागले. डॉक्टरांची धावपळ सुरू झाली. तात्यांना प्राणवायूच्या नळ्या लावण्यात आल्या. हदयावर जोरजोरात मर्दन करून श्वासोच्छ्वास वाढवण्याचा प्रयत्न होऊ लागला, तर दुसरीकडे त्यांना हदयात ‘कोरेंमीनचे' टोचणे एकावर एक दिले जात होते.

(७/१०)
त्याच्या सिरिंज उकळून आणणे व नेणे ह्या कामात मी गर्क असताना अकस्मात टोचणे थांबवले गेले होते. ऑक्सिजनच्या नळ्या काढल्या होत्या आणि डॉक्टरांची धावपळ शांत झाली होती. उकळलेले सिरिंज घेऊन मी घाईने मी खोलीत प्रवेश केला तो हे दृश्य !
मन चरकले !

(८/१०)
डॉक्टरांनी मला खुणेनेच सिरिंजचे भांडे सिरिंज भांडे सिरिंज न वापरता ठेवण्यास सांगितले.
मी सर्वकाही समजून चुकलो.
सरतेशेवटी सर्व कर्तव्ये पुरी केल्याचे पूर्ण समाधान व्यक्त करून आणि आता अधिक काही मिळवावयाचे शिल्लक राहिलेले नाही, असे प्रतिपादन करून अत्यंत संतोषाने -

(९/१०)
तात्यांनी प्रायोपवेशनाचा मार्ग अनुसरून दि. २६ फेब्रुवारी १९६६ या दिनी सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी #आत्मर्पण केले.

संदर्भ : #आठवणी_अंगाराच्या ( विश्वास सावरकर, पृष्ठ क्र. २५-२६)

#स्वातंत्र्यवीरसावरकर
#जाज्वल्यदेशाभिमानी
#राष्ट्रहितसर्वोपरि

(१०/१०)
You can follow @smitprabhu.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.