राहून राहून कोणीतरी उठतो आणि जुनी धर्मव्यवस्था आणि वर्णव्यवस्था कशी चांगली आहे याबद्दल प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष अशी टिप्पणी करतो. स्वतःला पुरोगामी समजणारा समाज याचा पुरजोर विरोध करण्यात त्यामानाने कमजोर पडतो आणि मग खरी सुरुवात होते RW च्या नंग्या नाचाला. ही लेखमाला याच
प्रयत्नाला हाणून पाडण्यासाठी आहे. यांच्या बलस्थानांवर जोपर्यंत हल्ला होत नाही तोवर आपण कितीही प्रयत्न केला तरी यांना सत्तेतून हटवणे मुश्किल आहे, हे माझं वैयक्तिक मत आहे. बाकी वाचक सुज्ञ आहेतच, तुमच्या प्रतिक्रियांचा प्रतीक्षेत:
मनुस्मृती आणि चातुर्वर्ण्य - भाग १
'मनुस्मृती ', आणि ' कौटिल्याचे अर्थशास्त्र ' या दोन्ही ग्रंथांचा मध्यवर्ती विषय चातुर्वर्ण्यव्यवस्था हाच आहे.परंतु यापैकी प्रत्येक ग्रंथाच्या तपशीलात मात्र चातुर्वर्ण्य व्यवस्थेला अधिक व्यवहारक्षम बनविण्याच्या दृष्टीने विशिष्ट पैलूवर भर आहे.
'मनुस्मृती ', आणि ' कौटिल्याचे अर्थशास्त्र ' या दोन्ही ग्रंथांचा मध्यवर्ती विषय चातुर्वर्ण्यव्यवस्था हाच आहे.परंतु यापैकी प्रत्येक ग्रंथाच्या तपशीलात मात्र चातुर्वर्ण्य व्यवस्थेला अधिक व्यवहारक्षम बनविण्याच्या दृष्टीने विशिष्ट पैलूवर भर आहे.
मनुस्मृतीने या व्यवस्थेला जनव्यवहारात कसे उतरविता येईल याचे धर्मशास्त्रीय दंडक ठरविले आणि कौटिल्याच्या अर्थशास्त्राने राज्यसंस्थेच्या सहाय्याने चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे वास्तवात नियंत्रण कसे करता येईल आणि त्यायोगे राज्यसंस्था अधिक समृद्ध आणि शक्तिशाली कशी बनेल यादृष्टीने राजाला
मार्गदर्शन केले. यात भगवदगीतेत घालघुसड करून मनुस्मृतीने दिलेल्या कायद्यांना आणि अर्थशास्त्राने राबविलेल्या व्यवहाराला तत्वज्ञानाच्या पातळीवर नेऊन त्याला दैवी मान्यता प्राप्त करून देण्याचा केविलवाणा प्रयत्न ही ब्राह्मण्यवाद्यांकडून झाला...
'या जगातील प्रत्येकाला काही ना काही काम केल्याशिवाय त्याचा शरीर निर्वाह होणे अशक्य आहे ' ही भगवदगीतेची कर्माबद्दलची भूमिका सर्वमान्य होण्यास कोणतीही हरकत नाही, परंतु, माणसाने उदरनिर्वाहासाठी कोणते काम करावे ? हे कोणी आणि कसे ठरवावे ? यासंबंधी ब्राम्हणी धर्मशास्त्र अतिशय जागरूक
आणि कठोर दिसते. त्यासाठी तर त्याने चातुर्वर्ण्य व्यवस्थेला जन्माला घातले आणि तिचा उगम ऋग्वेदातील पुरुषसूक्तापर्यंत नेऊन भिडविण्याचे कारस्थान यशस्वी केले. परंतु कालौघात माणूस जसजशी निसर्ग नियमातील कोडी उलगडण्यात यशस्वी होत गेला आणि स्वतःबद्दल आणि समाजाबद्दल अधिक जागृत बनत गेला,
तसतशी त्याला धर्मग्रंथातील लबाड्यांची उकल होऊ लागली. ऋग्वेदात चातुर्वर्ण्याची उत्पत्ती ज्या पद्धतीने मांडण्यात आली ती काल्पनिक, हास्यास्पद, मतलबी आणि अन्याय्य आहे हे त्याला कळू लागले. याचा परिणाम अनेक अवैदिक विचारधारांकडून झालेल्या चातुर्वर्ण्याच्या निषेधात दिसला. विकसित ज्ञान
विज्ञानाच्या निकषावर चातुर्वर्ण्याचे समर्थन करणे भल्या भल्या पंडित, महापंडितांना जड जाऊ लागले. त्यामुळे मुळच्या चातुर्वार्यव्यवस्थेला अबाधित आणि सुरक्षित ठेवायचे असेल तर, तिच्यावर नवा साज चढवून ती लोकांपुढे नेणे ही चातुर्वर्ण्य समर्थकांची गरज बनली. ती गरज धर्मग्रंथांच्या
अतिरेकी लिखाणाने पूर्ण केली आणि चातुर्वर्ण्य-व्यवस्थेला अबाधित आणि सुरक्षित ठेवले. म्हणूनच धर्मग्रंथ हे भारतातील उच्च जाती आणि वर्णाचा सर्वात पूज्य ग्रंथ ठरले. या वर्गाची त्याबद्दलची भावना आजही तशीच आहे. धर्मग्रंथानी हे ऐतिहासिक कार्य पार पाडले नसते, तर चातुर्वर्ण्य
तात्विकदृष्ट्या कधीच इतिहास जमा झाले असते. म्हणूनच या साजाखाली काय दडलेले आहे त्याचे रूप सुरुवातीला समजून घेऊ, त्यानंतर त्या साजाची चिकित्सा करू. त्यातूनच भारतीय माणसाचा ' माणूस ' म्हणून विकास कसा खुंटला आणि इसवी सनाच्या सुरुवातीपासून ते विसाव्या शतकाच्या उंबरठ्यापर्यंत भारतातील
बहुजन समाज अज्ञानी, अंधश्रद्ध, दरिद्री, पराभूत आणि अवमानित जीवन का जगत होता या प्रश्नांची काही उत्तरेही सापडू शकतील. या व्यवस्थेचा खंदा पुरस्कर्ता मानला गेलेला मनु आणि त्याचे धर्मशास्त्र मनुस्मृती यांच्यापासून पुढील पोस्ट वर विवेचनाला सुरुवात करू.
क्रमश..!
(अशोक सरांचे विचार.)
क्रमश..!
(अशोक सरांचे विचार.)