आदरणीय @narendramodi आपणास पत्रास कारण की,
नमस्कार,
आपल्याशी कृषी कायद्याच्या बाबतीत बोलण्यासाठीचा हा अट्टहास. सांभाळून घ्या जास्त बोललो तर.
कृषी कायदे चांगले आहेत असं आपण सांगत आहात. जनतेचा आपल्यावर विश्वास का नाही याचा कधी विचार केला का आपण?
कारणे👇
1) नोटबंदी - अचानक केलेली
👇
नोटबंदी आजही सगळ्यांच्या लक्षात आहे. रांगेत थांबणे लोक विसरली नाहीत.रांगेत मृत्यू झालेले विसरले नाहीत.नोटबंदी लोकांचे झालेले हाल आपल्याला दिसले नाहीत. नोटबंदीत आपण 50 दिवस मागितले,त्यानंतर आपण त्याचे फायदे सांगणार होता.अजून त्याचे फायदे आपण सांगितले नाही.आतंकवाद कमी झाला नाही.👇
2) पेट्रोल डिझेल -मनमोहन यांच सरकार होत तेव्हा कच्च तेल 140 डॉलर होत तरी तेव्हा पेट्रोल 70 ने मिळत होत.
पण तुम्ही आल्यापासून कच्च तेल 50 डॉलर पर्यंत खाली आले तरी पेट्रोल 90 पर्यंत गेल.
नक्की काय जादू केली तुम्ही?कळायला काही मार्ग नाही.स्वस्तात देणार म्हणून तुम्ही सत्तेत आला ना.👇
3)GST - GST चांगली नाही म्हणून तुम्ही बोंब मारत होता पण सत्तेत आल्यावर GST तुम्ही लागू केली. आता राज्यांना त्यांचे हक्काचे पैसे मिळत नाहीत. GST हा त्या राज्यांचा अधिकार आहे पण आपण तो रोखून धरला आहे आणि कर्ज घ्या म्हणून सांगत आहात. हे कळायला मार्ग नाही. आपण प्रकाश टाकावा.
4) स्मार्ट सिटी - आपण निवडून आल्यावर 100 स्मार्ट सिटी बांधणार म्हणून सांगितलं होत. त्या स्मार्ट सिटीचे कुठे नामोनिशाण दिसत नाही. ढोलेरा स्मार्ट सिटी तेवढी गाजली. आता या स्मार्ट सिटीच पण वचन अजून पूर्ण नाही केलं. आता कसा विश्वास ठेवायचा आपल्यावर? सांगा 👇
5) काला धन - निवडणुकी आधी आपल्याकडे एक यादी होती. सत्तेत आल्यावर ती यादी दिसली नाही. नोटबंदीत काळा पैसा बाहेर येणार होता. तो आल्याचं काही दिसलं नाही. उलट 99% पैसा भारतीय चलनात आला. परदेशातून 100 दिवसात काळा पैसा आणणार होते त्याच काय झालं?
विरोधात असताना आपण बोलला होता आठवतंय?👇
6) गंगा साफ - माँ गंगा साफ करणार होता म्हणून सांगितलं. पण गंगा काहीच साफ झाली नाही. हे तुम्ही देखील मान्य कराल. आता यावरून एक सांगा स्वच्छ भारत अभियान सफल झालं नाही. गवगवा मात्र खूप झाला. कचरा आपणच टाकायचा आणि साफ करायचा. मग त्याचे फोटो काढायचे. समुद्र किनारा आठवला का?👇
7) 2 करोड नोकऱ्या - दरवर्षी इतके रोजगार देणार होते. रोजगार तर सोडा. मागच्या 6 वर्षातले आकडेच दाबले होते मोदी सरकारने. आपण रोजगार उपलब्ध करू शकला नाहीत. याउलट बेरोजगारी खंडिभर वाढली. आज किती लोक बेरोजगार आहेत याचा विचार करा. तुमचे नेते म्हणतात पकोडा तळा. कस करायचं तुम्ही सांगा.👇
8) महागाई - UPA सरकारच्या काळात आपण जरा जरी महागाई झाली तर आंदोलन करत होता. जावडेकर, इराणी, प्रसाद इ नेते तर काय काय भाषण ठोकायचे. आता गॅस ची किंमत तुम्हीच बघा. UPA च्या काळात असलेला 300 चा गॅस आता किती आहे पहा. तुम्ही महागाई वाढवली कसा विश्वास ठेवायचा? तुम्हीच सांगा.👇
9) लाल आंख - आपण विरोधात होता तेव्हा शत्रू देशांना लाल आंख दाखवायची भाषा करत होता. लाल आंख सोडा तुमच्या तोंडून साधं चीन च नाव येईना. तो आत घुसला आहे त्याला जबाबदार कोण?
आता तुम्ही म्हणाल पाकिस्तानला आम्ही काय केलं बघा. अहो त्याच पाकिस्तान चे दोन तुकडे केले काँग्रेसने. त्यांची 👇
लायकी नाही भारतासमोर. तुम्ही चीन बद्दल शांत आहात. तो जमीन खातोय आणि तुम्ही चीनचे app ब्लॉक करताय. लॉजिक काही कळालं नाही.
माझ्या घरात कोणी घुसले तर whatsapp वर ब्लॉक करून प्रश्न सुटणार आहे का? त्यासाठी इंदिरा आणि काँग्रेस सारखी इच्छा शक्ती हवी. कसा विश्वास ठेवायचा तुम्ही सांगा.👇
10) कोरोना - @RahulGandhi यांनी फेब्रुवारी मध्ये सांगितलं की कोरोना त्सुनामी म्हणून येईल यावर लवकर उपाययोजना करायला हवी. पण आपण गांभीर्याने न घेता नमस्ते ट्रम्प करत राहिलात. जे मृत्यू झाले त्याला जबाबदार कोण? ट्रम्प ने तर मध्ये धमकी पण दिली त्यावर देखील आपण काही बोलला नाहीत.👇
11) कृषी कायदे - ज्यांच्यासाठी कायदे आपण बनवले त्यांनाच ते कायदे नको आहे. कायदे बनवताना आपण स्थायी समिती कडे पाठवले नाही. चर्चा केली नाही. शेतकऱ्यांचे म्हणणे मागवले नाही. उलट कोरोना काळात ते कायदे पास केले. इतकी काय गरज होती. शेतकऱ्यांचे उत्पन्न रातोरात महिना 1 लाख होणार होते का?
हिवाळी अधिवेशन आपण कोरोनामुळे घेईना आणि ते कायदे मात्र कोरोनाकाळात पास केले. शंकेला कारण आहे ना.
आज शेतकरी नाराज आहेत त्याच कारण आपण आजपर्यंत एकही आश्वासन पाळलं नाही. कसा विश्वास ठेवायचा आपल्यावर. यादी बरीच मोठी आहे. न संपणारी.
2017 नंतर एक निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर BJP
लढली आहे ते दाखवा मला.
फक्त निवडणूक जिंकणे महत्वाचे नाही तर लोकांची मन जिंकणे महत्वाचे.
राम मंदिर,370, CAA मुळे लोकांची पोट भरत नाहीत. लोक कधी ना कधी पोटाला पण प्रश्न विचारतात.
अंबानी अदानी यांनी या कायद्यावर भाष्य करणे यातच सगळं आलं साहेब.
त्यामुळे आपल्यावर शेतकरी सहित मी आणि
देशातली जनता आपल्यावर विश्वास ठेवू शकत नाही.
शेवटी एकच प्रश्न विचारतो,
"हेच का ते अच्छे दिन"
बास मला आपल्याला इतकेच बोलायचे होते. आपण पंतप्रधान आहात. सगळ्यांची काळजी करणे आपल कर्तव्य आहे. कृषी कायदे परत घेऊन नवीन कायदे सर्वानुमते आणा त्यातच देशाचं हित.
आपलाच एक भारतीय नागरिक 🙏
You can follow @Anand_Dasa88.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.