पाय ज्या दिशेला वळतील त्या दिशेला अख्या शरीराला वळावे लागते ; देशाचे पाय असणारे “केरळ” राज्य भारताला योग्य दिशेला घेऊन जाईल

लहानपानापासून भारताचा नकाशा बघत आलोय ; देश एक मनुष्य कल्पिला तर अर्थातच केरळ राज्य त्या शरीराच्या पायाची ठिकाणी आहे
आणि पायाच्या रूपात असणारे केरळ देशाला देखील योग्य दिशेला घेऊन जाईल ; कारण त्याचा ट्रॅक रेकॉर्ड आहे शेकडो वर्षांचा

जागतिकीकरकरण हा शब्द देखील कॉईन झाला नव्हता अशा शेकडो वर्षांपासून जगातील इतर भूभागांशी आपल्या टर्म्स वर व्यापार करणारा केरळ ;
जगातील इतर भूभांगाशी व्यापार करतांना होणारी सांस्कृतिक देवाणघेवाण आपल्यात सामावून घेत स्वतः सर्वार्थाने श्रीमंत होणारा केरळ

जीडीपी एके एके जीडीपी न करता शिक्षण आणि आरोग्यावर भर देणारा केरळ
परदेशात जाऊन नोकरी धंदे करत रेमिटांस मधून देशाला सर्वात जास्त परकीय चलन मिळवून देणारे केरळ

जेथे खेडेगावात देखील शहरातील सुविधा आहेत असा केरळ

मसाल्याचा पदार्थानी आपल्या सगळ्यांचे / आणि जगाचे पदार्थ रुचकर बाणवणरे केरळ
आणि आजच्या काळात फॅसिस्ट राजकीय शक्तींना कसे दूर ठेवायचे याचे वस्तुपाठ देणारा केरळ

उगाच का त्याच्यावर वरुणदेव लाखो वर्षे प्रसन्न आहे आणि देवांनी त्याला “आपली भूमी” (गॉड्स ओन कंट्री ) म्हटले आहे

संजीव चांदोरकर
You can follow @praveengavit10.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.