परवा एका भावाने मंदिर मशीद चा मुद्दा मांडला, त्यावर अनेक लोकांनी त्याची बोलती बंद केली. मग काल ओपन ला फलंदाजीला एक भाऊ पुन्हा तोच मुद्दे घेऊन आला, ज्यांची उत्तरे आधीच देण्यात आली होती.
आता हे सगळं बघून बाबासाहेब आंबेडकरांची आठवण झाली, की त्यांनी सनातन्याविरुद्ध कसा लढा दिला.
आता हे सगळं बघून बाबासाहेब आंबेडकरांची आठवण झाली, की त्यांनी सनातन्याविरुद्ध कसा लढा दिला.

सनातन्यांची एक पद्धत होती, जर एखादा सुधारक आला की त्याला वादामध्ये गुंतवून ठेवायचं, गोल गोल वाद घालायचे, निष्कर्षापर्यंत यायचं नाही, कृती तर अजिबात करायची नाही, आणि सुधारक गेला की पुन्हा त्याच मुद्द्यापासून सुरुवात करायची.
शतकानुशतके कित्येक सुधारक आले आणि गेले.
शतकानुशतके कित्येक सुधारक आले आणि गेले.

बाबासाहेबांबद्दल सुद्धा सनातन्यांना असंच वाटलं, की ते थकतील, थांबतील आणि गप्प बसतील. पण आधीचे सुधारक आणि बाबासाहेबांमध्ये एक फरक होता की बाबासाहेब इतिहास, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र इत्यादी विषयात निपुण होते.

त्यात महत्त्वाचं म्हणजे बाबासाहेबांचा इतिहास या विषयाचा अभ्यास उत्तम होता. म्हणून ये या डावाला बळी पडले नाही.
आता सुध्धा तीच पद्धत सुरू आहे, तेच मुद्दे घेऊन वाद घालायचे, आणि अंतिम निष्कर्षापर्यंत काही पोहोचायचं नाही..!!
आता सुध्धा तीच पद्धत सुरू आहे, तेच मुद्दे घेऊन वाद घालायचे, आणि अंतिम निष्कर्षापर्यंत काही पोहोचायचं नाही..!!