सावरकरांनी जातिव्यवस्थेविरोधात लढा दिला असं नॅशनल चॅम्पियन लोकांचं म्हणणं आहे. सावरकरांनी काही निबंध लिहीले होते त्यासंबंधात. हे झालं अर्धवट सत्य. पुढचं सत्य हे इथे आहे.
संदर्भ - मायबोली २००८च्या हितगुज दिवाळी अंकात डॉ. चिन्मय यांचा लेख
संदर्भ - मायबोली २००८च्या हितगुज दिवाळी अंकात डॉ. चिन्मय यांचा लेख
सावरकरांनी चालवलेल्या जात्युच्छेदन चळवळीने अस्वस्थ झालेल्या ब्राह्मणांनी लोणी येथे झालेल्या सनातनी परिषदेत
सावरकरांना 'धर्मद्रोही' ठरवून 'त्यांना पेशवाई असती तर हत्तीच्या पायाखाली दिले गेले असते' असा ठराव मांडला. त्यावर ३००० ब्राह्मणांनी सह्या केल्या.
सावरकरांना 'धर्मद्रोही' ठरवून 'त्यांना पेशवाई असती तर हत्तीच्या पायाखाली दिले गेले असते' असा ठराव मांडला. त्यावर ३००० ब्राह्मणांनी सह्या केल्या.
सावरकरांनी त्यावर 'शिवशाहीत अथवा, पहिल्या बाजीरावाच्या पेशवाईत आमच्यासारख्या हिंदू संघटकांना हत्तीच्या पाठीवरील अंबारीत मिरवले जाण्याचाच संभव अधिक होता' असे उत्तर दिले. यांच्या मांडणीप्रमाणे, 'भटशाही' संपवण्यासाठी पूजा, पाठ, गौरी, गणपती, सोयरसुतक, संक्रांत, दिवाळी, दसरा,
द्वादशी या धार्मिक कार्यक्रमांना भटांना बोलावणे बंद करून 'भटशाही' संपवावी असे मत मांडले. डाॅ. चिन्मय म्हणतात त्याप्रमाणे "त्यासोबतच काशीतील ब्राह्मण महासंमेलनाची तुलना सावरकरांनी माकडांशी केली. त्यात 'काशीत दोन महासंमेलने भरली - एक माकड महासंमेलन आणि दुसरे भाकड महासंमेलन.
माकडे परिवर्तनीय तरी आहेत. पण सनातनी तर काळ, वेळ, परिस्थिती या गोष्टीच बघत नाहीत. अशा वागण्यामुळे निदान काशीच्या भाकड महासंमेलनातील पंडित हे तरी माकडांची विकसित श्रेणी नसून तेथील माकडेच त्या पंडितांची विकसित श्रेणी आहे हे म्हणणे क्रमप्राप्त आहे' असे लिहित त्यांची विकेट घेतली
____
____
आता नॅशनल चॅम्पियन्स लोकांचा स्वतःशीच काही मेळ बसना आणि हे लोक दुसऱ्यांना "अरे हिंदुंनो, अजून किती दिवस मूर्ख बनणार आहात? तुम्ही शंढ आहात" सारख्या टेपा लावतात.
अर्धशिक्षित फाॅलोअर्स

अर्धशिक्षित फाॅलोअर्स


