अगदी बालपणापासूनच अमेरिकेत राहणारी माझी एक मैत्रीण आहे. ती वंशाने जरी भारतीय असली तरी अमेरिकन म्हणावी इतपत ती आता अमेरिकेच्या संस्कृतीत मिसळल्या गेली आहे. मध्यंतरी कोरोनाचा अमेरिकेत मोठा कहर चालू असतानाहि आंदोलन करण्यासाठी अमेरिकन नागरिक मोठ्याप्रमाणावर रस्त्यावर उतरले होते.👇
कारण होते 'जॉर्ज फ्लॉइड' या ब्लॅक अमेरिकन कलाकाराची एका पोलीस अधिकाऱ्याकडून वंशद्वेषातून झालेली हत्या. या घटनेचा तीव्र निषेध नोंदविण्यासाठी ऐन कोरोनाकाळातही समस्त अमेरिकन जनता रस्त्यावर उतरली होती. त्यात जसे अमेरिकन ब्लॅक होते अगदी तसेच अमेरिकन व्हाईटही👇
त्यांच्या खांद्याला खांदा लावून या आंदोलनात सहभागी झाले होते. या अमेरिकेतील घटनेनंतर भारतात अशी अनेक प्रकरणे कमी अधिक प्रमाणात घडून गेली. परंतु त्यातही क्रौर्याची परिसीमा गाठलेले प्रकरण म्हणजे; 'हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरण'. या प्रकरणानंतर संबंध देश👇
सवर्ण आणि दलित अशा गलिछ भेदत विभागला गेला.पीडितेवर झालेला बलात्कार हे घृणास्पद कृत्य नसून जातीय अस्मितेचा विषय आहे हे सिद्ध करण्यात आपल्या देशातील मुख्य प्रवाहातील माध्यमे तर यशस्वी झालीच परंतु त्याचबरोबर आपल्या यंत्रणाही त्यात यशस्वी झाल्या.👇
या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मी माझ्या अमेरिकेत राहणाऱ्या मैत्रिणीला विचारले कि अमेरिकेत प्रत्येक घरोगणिक एवढी संवेदनशीलता कशी काय पाहायला मिळते? अन्याय, हक्क, अधिकार यांबाबत लोक इतके जागृत कसे काय असतात?त्यावर उत्तर देताना माझी मैत्रीण मला म्हणाली कि अरे सिद्धार्थ👇
अमेरिकेला मेल्टिंग पॉट असे उगाच म्हणत नाहीत. जगाच्या कानाकोपऱ्यातून येऊन लोक येथे स्थायिक झाले आहेत. इथे बहुसंख्य ज्यू असे आहेत ज्यांच्या पूर्वजांनी हिटलरच्या छळछावणीत दिवस काढले आहेत, काही ज्यू असे आहेत ज्यांचे पूर्वज हिटलरच्या भयानक वंशसंहाराला बळी पडले आहेत👇
.इथे काही आफ्रिकन लोक असे आहेत ज्यांनी रवांडा, डार्टर या आफ्रिकन देशातला वंशसंहार प्रत्यक्ष अनुभवला आहे. अमेरिकेत सुरज येंगडे आणि सुजाता गिडला यांसारखे दलित भारतीयही आहेत ज्यांनी आपल्या प्रत्यक्ष आयुष्यात अन्याय, अत्याचाराच्या झळा सोसल्या आहेत.👇
त्यामुळे बहुसंख्य अमेरिकन नागरिकांच्या जाणीवा आणि संवेदना टोकदार असतात. म्हणूनच अमेरिकेत कानाकोपऱ्यात घडलेल्या अन्यायाला राष्ट्रीय स्वरूप क्षणार्धात प्राप्त होते.परंतु क्लेश या गोष्टीचा वाटत राहतो कि पदोपदी अन्याय, अत्याचाराचं गाठोडं आपल्या पाठी वागवणाऱ्या भारतीयांच्या👇
जाणीवा एवढ्या बोथट कशा काय?गावपातळीवर असो वा देशपातळीवर कुठे काहीही झाले तरी आम्हाला त्याचे काहीच देणेघेणे नसते.आंदोलने,निषेध सभा,मोर्चे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला फॅशन शो वाटतात.जोपर्यंत एखादी गोष्ट आमच्यावर शेकत नाही तोपर्यंत आंदोलने म्हणजे देशद्रोह्यांचा अड्डाच वाटतो आम्हाला👇
पण एकदा का आम्हाला चटका बसला कि तेव्हा मात्र माझ्याबाजूने कुणीतरी उभे राहावे, कुणीतरी आंदोलन करावे अशी आपली तीव्र भावना असते. याबाबतीत जर्मनीचंच मोठं जितंजागत उदाहरण आपल्यासमोर आहेच कि. कारण त्याहीवेळी नाझी नरसंहाराच्या त्याकाळात आमचा त्याच्याशी काय संबंध?👇
असे म्हणणारे अलिप्ततावादी काही कमी नव्हते जर्मनीत.काहींनी तर चक्क आपल्या डोळ्यांना झापड लावून घेतली होती. अशा या लोकांना पाहून निमोलर नावाच्या एका जर्मन कवीने फार समर्पक आणि डोळ्यात अंजन घालणारी कविता लिहिली होती.तिचा भावानुवाद मी खाली देत आहे;👇
ते प्रथम कम्युनिष्टांचा वेध घेत आले
मी काहीच बोललो नाही,
कारण मी कम्युनिष्ट नव्हतो.
त्यानंतर ते कामगार कार्यकर्त्याच्या शोधात फिरू लागले
मी मनात म्हटले, माझा कुठाय कामगार संघटनेशी संबंध
मी काहीच बोललो नाही
मग ते ज्यू वंशविच्छेदाचे सूत्र घेऊन सर्वत्र धावू लागले
मी मनात म्हटले,👇
मी काही ज्यू नाही;
मी शांतच राहिलो,
त्यानंतर ते माझाच शोध घेत आले;
पण तोपर्यंत त्यांच्याविरुद्ध आवाज
काढू शकतील असे बाकी कोणीच उरलेच नव्हते. 👇
हि कविता वेगवेगळ्या रूपात आठवण्याची वेळ आपल्यावर येणार नाही इतकी खबरदारी आपण सगळ्यांनीच येत्या काळात घ्यायलाच हवी.
#OpinionMatters
#AllLivesMatters
You can follow @siddharthsuffi4.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.