हजारो वर्षांपूर्वीची गोष्ट आहे
माणूस रोज भटकंती करत शिकार करून पोट भरत असे. नैसर्गिक आपत्ती, आसमानी संकटांना समर्थपणे मुकाबला करत जगत होता
तग धरुन जिवंत राहणे हेच एकमेव ध्येय!!! 1/6👇
मानव जीवनातला सर्वात मोठा शोध लागला होता "आग" . तो आता हिंस्त्रपशू ,थंडी या पासून स्वतःचे संरक्षण करू शकत होता. कालांतराने तो शेती करायला शिकला व एका जागेवर स्थिर होऊन समूहाने रहायला लागला.
त्याला पहिल्यांदा स्वतःला सुरक्षित असल्याची खात्री पटली सोबत भविष्यात येणार्‍या 2/6👇
अडचणी वर विचार करायला लागला .
समूहातील काही मंडळींनी भविष्य सुरक्षित करायचे असेल तर आपले संरक्षण करण्यासाठी सर्वशक्तीमान,अलौकीक अशी ताकद म्हणजे "देव,ईश्वर"
संकल्पना मांडली.
एकमताने निर्णय घेऊन भव्य दिव्य मूर्ती तयार करण्यात आली, रोज पूजा अर्चना होऊ लागली. 3/6👇
मानसिक शांतता आणि सुरक्षेची भावना निर्माण झाली.
अचानक!!
एके दिवशी अन्नाच्या शोधात असणारा एक समूह तिथे पोहोचला, अनावधानाने धक्का लागून मूर्ती भंग झाली,
देव धोक्यात आला होता!! जो देव आपल रक्षण करण्यासाठी उभारण्यात आला होता त्याच रक्षण करण्याची वेळ येऊन ठेपली होती,4/6👇
दोन चार लोकांनी भावना भडकावून द्वेष निर्माण करायला मदत केली आणि एक जिवंत देव दुसर्‍या जिवंत देवाला कापायला लागला.....
माणूस देवापेक्षा की देव माणसांपेक्षा मोठा झाला होता कळायला मार्ग नव्हता
5/6👇
विपरीत परिस्थितीत स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेऊन हजारो वर्ष तग धरून जगणारा माणूस त्यानेच विणलेल्या मोहजाळ्यात अडकून भरकटला होता!!

Religious wars are basically people killing each other over who has the better imaginary friend!!!

@manojpimpale 6/6
You can follow @bharat_parody.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.