#Thread : हिंदुंनो, अजून किती दिवस मूर्ख बनणार आहात?

इंग्रजांपासून ते डाव्यांपर्यंत ते तथाकथित पुरोगाम्यांपर्यंत सगळ्यांनी सनातन धर्मात फूट पाडण्याचं काम केलं आणि विविध जातींमध्ये आग लावून स्वत:चं राजकारण चमकवलं.

महाराष्ट्रात घडलेल्या काही घटना पाहूयात.

(१/१३)
🔸हिंदुना मूर्ख बनवण्यासाठी पुरोगाम्यांनी आणि B-ग्रेड्यांनी ‘शाहू-फुले-आंबेडकर’ ह्यांच्या बरोबर शिवछत्रपतींचं नाव जोडलं.

होय, तेच फुले ज्यांनी ज्ञानेश्वरीला ‘डावपेची’ व शिवछत्रपतींना ‘अज्ञानी व अक्षरशून्य’ संबोधलेलं.

ज्ञानेश्वर माऊलींचा काय गुन्हा होता?

(२/१३)
फुलेंच्या घरातल्या व्यक्तिने (नातवाने) त्यांच्यांवर व्हायलेली ‘स्तुतिसुमने’ पहा👇🏼

आता ह्यावरुन तुम्हाला काय निषकर्ष काढायचा तो काढा.

(३/१३)
स्त्री शिक्षणासाठी फक्त फुले दामपत्य व जातीवादासाठी फक्त आंबेडकरांनी काम केलं असं चित्र नेहमी आपल्याला दाखवलं जातं.

महादेव व रमाबाई रानडे, आगरकर, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, महर्षि कर्वे इत्यादि समाजसुधारकांचं नाव सुद्धा घेतलं जात नाही.

https://indianexpress.com/article/opinion/columns/vinayak-damodar-savarkar-the-reformer-5753369/

(४/१३)
🔸राजर्षि शाहू महाराजांना ब्राह्मणद्वेष्टा व बहुजनप्रतिपालक म्हणणारी ही लोकं हे सांगायला विसरतात की खुद्द छत्रपती स्वत:ला ‘हिंदुपदपादशहा’ मानायचे.

आता जरा ‘वेदोक्त प्रकरण’ बघूयात. एका अतिशहाण्या ब्राह्मणामुळे सगळ्या जातीविषयी सत्यशोधकांनी समाजात तेढ निर्माण केला.

(५/१३)
वेदोक्त प्रकरणावर अनेक नसलेले तर्क लढवले जातात.

बाळाचार्य खुपेरकर - ज्यांचा जन्म छत्रपतींच्या पदरात असलेल्या सोळा शास्त्री घराण्यांपैकी एका घराण्यात झाला होता, त्यांनी हे प्रकरण स्वत: अनुभवलेलं होतं.

पूर्ण प्रकरण काय होतं ते पहा👇🏼

https://www.mahamtb.com/Encyc/2020/7/31/Article-on-Yugpursh-Lokmanya-by-Parth-Bawaskar.html

(६/१३)
तथाकथित पुरोगीमी आणि B-ग्रेडी लोकमान्य टिळक आणि राजर्षि शाहू महाराज ह्या दोघांमधला ‘नसलेला वाद’ फार रंगवून सांगतात.

त्या वेळेला पण भास्करराव जाधव आणि डोंगरे ह्या सत्यशोधकांनी महाराजांचे कान भरले आणि शाहू-टिळक वाद निर्माण करुन दिला.

हे प्रकरण त्यांच्याचमुळे वाढलं.

(७/१३)
चिरोलच्या पुस्तकाबद्दल जेव्हा टिळकांनी त्याच्या विरुद्ध खटला भरला, त्यावेळी चिरोलचे रेव्हिन्यू ऑफिसर भास्करराव जाधव आणि त्या पुस्तकाचे भाषांतरकार डोंगरे यांच्या साक्षी झाल्या.

डोंगरे यांनी आपल्या साक्षीत सांगितले, “वेदोक्त प्रकरणात व्यक्तिशः छत्रपती सरकारविरुद्ध...

(८/१३)
...टिळकांनी लिहिल्याचे मला दाखवता येणार नाही. किंबहुना, शिवाजीच्या वंशजांना वेदोक्ताचा अधिकार आहे असेच टिळक म्हणत होते, असे मला वाटते!

कोर्टात हे सत्यशोधक चांगलेच तोंडावर आपटले ते बरंच झालं.

शिवछत्रपतींच्या वंशजांचा अपमान लोकमान्य करुच शकत नाहीत!

(९/१३)
🔸श्रीसमर्थ रामदासस्वामी व छत्रपती शिवाजी महाराज

महाराष्ट्र ही संतांची भूमि. पण गेल्या काही वर्षांपासून संतांच्या जाती काढण्याची प्रथा काही नीच राजकारण्यांनी सुरु केली.

समर्थ शिवरायांचे गुरु होते का नाही? हा वाद पेटवून दिला गेला. आता गुरु होते का नाही ह्या दोन्हीचे...

(१०/१३)
...पुरावे कोणीच देऊ शकत नाही. मग वाद वाढवायचा कसा?

तर आधारवडीने एक नवीनंच कल्पना काढली - समर्थ आणि शिवछत्रपती हे एका कालखंडात नव्हतेच!

जेव्हा ह्या शिल्पाचं उद्घाटन करणारा माणूस हे बोलतो तेव्हा काय बोलावं हेच सूचत नाही.

बरं आज महाराजांनी समर्थांना दिलेल्या सनदीची...

(११/१३)
...प्रत उपलब्द्ध असताना देखील काही मुर्ख माणसं आधारवडीवर विश्वास ठेवतात.

ह्याच विषयावर अजून काही पुरावे बघूयात.

ही साताऱ्याचे छत्रपती शाहू महाराज (तिसरे) ह्यांची लग्न-पत्रिका. त्यांच्या मातोश्रींनी छापवून आणलेली. ह्यात काय-काय लिहीलय ते नक्की वाचा.

(१२/१३)
साताऱ्याच्या राजघराण्याचे सज्जनगडाशी असलेले संबंध👇🏼

आता भोसले राजघराण्यावर आणि छत्रपतींच्या गादीवर विश्वास ठेवायचा का B-ग्रेडी व जातीवादी राजकारण्यांवर हे महाराष्ट्राच्या जनतेने ठरवावं.

माझं म्हणणे एवढेच आहे की महापुरुषांच्या जाती बघून त्यांना मान देणं बंद करा.

(१३/१३)
You can follow @TheDarkLorrd.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.