पांडेजी आता माझा थ्रेड वाचा..
मी सकाळपासून कोल्हापूर, सांगली, मिरज भागातच होतो. मित्रांचे कार्यक्रम होते. अगदी आग्रहाचे निमंत्रण होते मला.आणि त्यांनी दिलेलं प्रेम हे तुला मी शब्दात सांगू शकणार नाही.सांगलीत गेलो की मित्रांसोबत प्रसिद्ध गणेश मंदिर मध्ये जाऊन आल्याशिवाय राहवत नाही. https://twitter.com/malhar_pandey/status/1340206754794151938
मी सकाळपासून कोल्हापूर, सांगली, मिरज भागातच होतो. मित्रांचे कार्यक्रम होते. अगदी आग्रहाचे निमंत्रण होते मला.आणि त्यांनी दिलेलं प्रेम हे तुला मी शब्दात सांगू शकणार नाही.सांगलीत गेलो की मित्रांसोबत प्रसिद्ध गणेश मंदिर मध्ये जाऊन आल्याशिवाय राहवत नाही. https://twitter.com/malhar_pandey/status/1340206754794151938
तिथली शांती वेगळाच अनुभव देते. राहिला प्रश्न दंगलीचा तर अशा विकृत्त आणि समाज विघातक कृत्याचे कोणीही समर्थन करत नाही. 2002 मध्ये मोदींनी घडवलेल्या दंगलीचे सुद्धा तू समर्थन करत नसशीलच अशी अपेक्षा आहे. अनेक वर्षे मी स्वतः या भागात फिरलो, अनेक मित्र आहेत माझे.
पण इथल्या लोकांनी ते सगळं विसरून बंधूभावणेचा मार्ग अवलंबला आहे. कारण द्वेषाने झालेले नुकसान इथल्या हिंदू मुस्लिम लोकांनी अनुभवले आहेत. त्यांनाही समजलं आहे.
राहील प्रश्न मस्जिद बांधण्याचा तर तुला एक उदाहरण देतो. कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी कागल शहरात भव्य राम मंदिर उभ केलं आहे. कोणताही गाजावाजा नाही, मोदीसारखी मताची भिक मागीतली नाही. आता विचारणार आहेस का, मंदिर बांधण्यासाठी फंड कुठून आला..?
आणि मुस्लिम धर्मात दान धर्मालाही तितकंच महत्त्व आहे. एखाद्या धार्मिक कार्याला लोक भरभरून दान देत असतात. कारण त्यातून त्यांना पुण्य मिळते. त्यामुळे मस्जिद उभी करण्यासाठी बाहेरून फंड गोळा करायची मुस्लिमांना गरज भासत असेल असं मलातर नाही वाटत.
मी शाहू महाराजांचे नाव घेऊ शकलो असतो पण मी तुझे थ्रेड वाचलेत.त्यामुळे तुझी अक्कल किती चालते याची खात्री आहे मला. पानसरे नाव घेण्यामागचे कारण म्हणजे त्यांनी दंगली नंतर कोल्हापुरात व्यवस्थापनेचे काम केले होते.त्यांचे कार्य लिहिणारे,सांगणारे सुशिक्षित इतर जातीधर्माचेही होते
त्यामुळे तुला त्यांचा चुकीचा इतिहास नक्कीच कोणी पुरवला नसणार याचीही खात्री आहे मला. म्हणून पानसरे..
आता तुझे संस्कार चवाट्यावर मांडायची वेळ झाली आहे... हे पाहून तूच सांग.. हे महिलांचा अनादर करणे, लोकांच्या अडनावरून बोलणे असे संस्कार संघाच्या कार्यालयात दिले जातात की घरात.. म्हणून तू पांड्या...
तुझ्यासारख्या मानसिकतेचे लोक जोपर्यंत समाजात आहेत तोपर्यंत या समाजात शांती पसरेल असं मला नाही वाटतं. कोल्हापूर, सांगली, मिरज या क्षेत्रात खूप शांती आणि बंधुभाव आहे. तू ज्या लोकांचे ऐकून हे बोललास तोही तुझ्याच बिरादरीचा आहे हे तू विसरलास..
अजून एक गोष्ट... तुला माझा धर्म समजला नाही इथच माझा विजय झाला. कारण कोल्हापुरात कोणाच्या नावा, आडनावावरून धर्म ठरत नाहीत. इथे माणुसकी हाच धर्म असतो.
2019 मध्ये जेव्हा कोल्हापूरला महापूराने विळखा घातला होता. तेव्हा जाती धर्म विसरून कोल्हापूर, सांगलीची लोक एकत्र आली होती. एकमेकाला केलेली मदत आम्ही पाहिली आहे. तो धर्म आम्ही पहिला आहे. तू उंटावरून शेळ्या हाकणारा आज आम्हालाच शिकवतो आहेस.??
शिवजयंतीला गाडीला भगवा बांधून अभिमानाने फिरणारे मुस्लिम तुला याच भागात दिसतील. पण तुला असा एकही मुस्लिम दिसणार नाही ज्याने अफजल खानची जयंती साजरी केली आहे.
गणेश उत्सव काळात ये कधीतरी कोल्हापुरात तुला दाखवतो, प्रत्येक गणेश उत्सव मंडळात एकतर मुस्लिम सदस्य असतोच, काही ठिकाणी तर अध्यक्ष, उपाध्यक्ष अशा मोठ्या पदावर राहून जात धर्माला फाट्यावर मारून गणेशोत्सव साजरा करताना दिसतील.
अजून काही उदाहरणे देतोय..
https://twitter.com/CrazyViku/status/1340269014166081538?s=19
