तिला स्त्री व्हायचे होते, पण समाजाने तिचं स्त्रीत्व स्वीकारायला नकार दिला, पण ती घाबरली नाही... ती एक आई बनली...

कायद्यामध्ये नसलेलं अस्तित्व दाखवून समाजाने तिच्या अस्तित्वावरच प्रश्न केला, पण ती घाबरली नाही, ढासळली नाही, उठली, लढली... तिने सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला
हो... मी बोलत आहे ट्रान्सगेंडर गौरी सावंत... त्याच गौरी सावंत (पूर्वीचे गणेश सावंत), ज्या समाजातील जाचक अटींना, तिच्यातील थोड्या वेगळ्या सेक्शुअलिटीला कधीच न समजून घेणार्या जाचक रूढींना कंटाळून फक्त ६० रुपये घेऊन घरातून पळून मुंबईला आल्या...
विक्सच्या जाहिरातीमुळे प्रकाशझोतामध्ये आल्या.
तर सुरुवात होते २००८ पासून..

एका सेक्सवर्करचा एड्समुळे मृत्यू होतो. तेव्हा तिची अनाथ मुलगी सोनाघाचीमध्ये विकली जात असताना तिला पाहवलं नाही आणि डिलरला पैसे देऊन त्या मुलीला गौरी घरी घेऊन येते. रात्री २ वाजता त्या मुलीच्या चुळबुळीमुळे
गौरी इरिटेट होते. ती गौरीच्या पोटावर तिचा हात टाकते. गौरी सांगते, मुलीच्या त्या कोमल स्पर्शाने गौरीचे जे मातृत्व जागृत झाले, त्यामुळे ती तिचा हात आजवर सोडू शकली नाही. ती म्हणते, कनेक्शन फक्त पोटाचं तर आहे,त्यामुळे मी तिची,गायत्रीची आई आहे...

असे म्हणतात की, जोपर्यंत एक स्त्री आई
होत नाही तोपर्यंत तिचं बाईपण सिद्ध होत नाही.
गौरी सुद्धा म्हणते, फक्त साडी घातली की बाईपण सिद्ध होत नाही. त्यासाठी आई व्हावं लागतं, पण त्या म्हणतात की आईपणाला कधीच गेंडर वरून लेबल करू नका. आईपण हे एक बिहेवियर आहे, एखाद्यावर प्रेम करायचं,एखाद्याची काळजी करायचं.

आईपनाची इतकी सुंदर
व्याख्या एखाद्या "तथाकथित" पूर्ण स्त्रीला सुद्धा करता येणार नाही. गायत्रीची जबाबदारी तर स्वीकारलीच पण सोबत शिक्षणसुद्धा दिले

समाज ट्रान्सगेंडेरला पूर्ण मानत नाही. पण गौरी राजा शिखंडीचे उदाहरण देतात. एक राजा कधीच "अर्धवट" असू शकत नाही.

शिवाय अर्धनारिनटेश्वर सुद्धा आहेच..!!!
हायलाईट-
🔸 त्या "नॅशनल लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी" याच्या याचिकाकर्त्या आहेत. २०१४ मधील सुप्रीम कोर्टाचा एक ट्रान्स च्या आयुष्याला नवीन कलाटणी देणारी जजमेंट ठरली. ज्यामध्ये ट्रान्सचे अस्तित्व कायद्याद्वारे स्वीकारले गेले.
🔸 महाराष्ट्र शासनाने तिच्या कार्याची दखल घेऊन
तिला इलेक्शन कमीशनची फर्स्ट गूडविल अंबेसिडर बनवले. त्यांनी कँपेनसाठी स्वतःहून त्यांच्या बांधवांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जागरूक केले. संधीचे सोने केले म्हणतात, ते हेच..
🔸 विक्स च्या माध्यमातून समाजासमोर आल्या. आणि एक वेगळाच आदर्श ठेवला
🔸 काट्याकुट्यांचे संघर्षमय आयुष्य मिळून सुद्धा समाजकार्य अजून देखील सुरूच आहे. सेक्स वर्करच्या मुलांना अब्यूज पासून वाचवण्यासाठी "सखी चारचौघी ट्रस्ट" या NGOची स्थापना केली.
🔸एके दिवशी त्यांना एक बंगाली २० वर्षाची मुलगी भेटली. ती त्यांच्याशी थोड्या गप्पा मारून आत गेली.
खूप वेळ बाहेर न आल्यामुळे त्या रूम मध्ये गेल्या.तिथे त्यांना एक खूप सुंदर दृश्य दिसले. एक ४ महिन्याचे बाळ आईच्या ओढणीशी खेळत होते. त्याची आई शेजारीच झोपली होती. तिथेच त्यांना एक पुरुष त्याच्या पँट ची झिप लावताना दिसला. हो, ती सेक्स वर्क करत होती. गौरींनी सेक्स वर्कर सोबत काम
केलं आहे, असं त्या सांगतात, पण या वेळी त्यांना त्या बाळाच्या दृश्याने अगदी वेड लावले. त्यांना गिल्टी फील झालं. याच घटनेनंतर त्यांनी "नाणी का घर" ची स्थापना केली, जिथे वयस्कर ट्रान्स सेक्स वर्कर्सच्या मुलांची काळजी घेतात. त्या सांगतात, इथे मुलांना "एक सेक्स वर्करचे मुल" म्हणून
नाही तर एक "माणूस" म्हणून वागवलं जातं.

खरोखर त्यांच्या नानी का घर कल्पणेमुळे मुलांना निवारा मिळाला.. हक्काचे घर मिळाले
समाजामध्ये सेक्स वर्कर्सच्या मुलांबद्दल किती घृणा, किळस, तिरस्कार दिसून येते. काय चूक असते त्यांची यात...?!!!
What's problem?
🔸सेक्स एज्यूकेशनच्या कमतरेमुळे ट्रान्स घरातून बाहेर फेकले जातात आणि त्याचा राग समाजावर निघतो.
🔸लहापणापासूनच "ते" "आपल्यापेक्षा" वेगळे आहेत, असे संस्कार आपल्या वर होतात आणि म्हणूनच सिग्नल, स्टेशन अश्या ठिकाणी त्यांना पाहिल्यावर लोकांची नाक मुरडले जातात
त्यांना सहन करावं लागणारं रेजेक्शन, हेटाळणी, अत्याचारी वागणूक हे पाहून खरंच दुःख होतं. 🔸संविधानाने प्रत्येक व्यक्तीला "लाईफ वुईथ डीग्निटी" म्हणजेच सन्मानाने जगण्याचा अधिकार दिलाय.
कायद्याने सुद्धा अस्तित्व स्वीकारलं. हे थोडं आधी झालं असतं तर अजून मानसिकता सुधारणा झाल्या असत्या.
What can we do?

🔸बेसिक लेव्हल वर आपण प्रथमतः त्यांच्याकडे आदराणी पाहायला शिकलं पाहिजे. Both for transgender and sex workers.
🔸रोज बोलताना आपण शिव्यामध्ये "छक्का" व त्यासदृश शब्दांचा वापर टाळू शकतो. कारण छोट्या छोट्या गोष्टींमुळे मानसिकता बदलत असते.
🔸आर्थिकदृष्ट्या सक्षम असाल
तर एका ट्रान्सच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारू शकता, त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी मदत होईल.
🔸त्याचप्रमाणे सेक्स वर्कर च्या मुलांच्या शिक्षणाची, पालनपोषनाची सुद्धा जबाबदारी स्वीकारता येऊ शकते. त्यांना सन्मानाने जगण्याची प्रेरणा मिळेल.
त्यांची परिस्थिती सुधारणा
फक्त आणि फक्त शिक्षण आणि सन्मान, या २ गोष्टींनी करता येईल.
बाबासाहेबांनी सुद्धा शिक्षणाला उन्नतीचे साधन म्हंटले आहे.
गौरी म्हणतात, माझा लढा सेक्शन ३७७ बरोबर नाही, लोकांच्या मानसिकते बरोबर आहे.
त्यांना जी हेटाळणी सहन करावी लागते, ती आपण तेव्हाच फील करू शकतो जेव्हा आपण त्यांच्या
जागी स्वतःला ठेवून पाहू. लिहिताना डोळे पाणावत आहेत...
हृदय आक्रोश करत आहे...
जगाला मोठ्यानी ओरडून विचारावसं वाटतंय...
का हा छळ...

असो 😓

🙏
Apologize me for spelling mistakes 😓🙏
You can follow @Adiitiii_05.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.