लांब थ्रेड:
पोलिस-दल

१८५७ चा स्वतंत्रता संग्राम झाला,ब्रिटिशांना भारतीयांच्या शक्तीची दहशत बसली
त्यामुळे त्यांनी शासक म्हणून स्वतःच्या सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना केल्या.

१८६१ ला पोलिस कायदा पास झाला आणि १९०५ पर्यंत देशभरात पोलिस दल सक्रिय झाले
@gajanan137 @PadmakarTillu
प्रसंग:
माया सकाळच्या बाजारहाटासाठी गेलेली,तिथे दलवाई तिला मागून येऊन धरतो,नको ते करण्याचा प्रयत्न करतो ती त्याच्या तावडीतून कशीबशी सुटून घरी थरथरत परतते

तिचा भाऊ अखील विषय समजून पोलिसांत जातो आणि समोरच्या वर्दीतील अधिकाऱ्याना विषय सांगतो,तो एक टेबलकडे बोट दाखवतो,त्याला बसवतात👇🏻
अखील ला काही प्रश्न विचारून तक्रार नोंदवून घेण्याआधी माया(तीच,बहीण)ला बोलवायला सांगितले जाते

तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती,मग तक्रार नोंदणी,त्यांच्या हातात तक्रार नोंदीच्या कागदाची एक प्रत दिली जाते,हे दोघे घरी येतात
दुसऱ्या दिवशी अखील काही झाले का पाहण्यासाठी पोलीस स्थानकात परत👇🏻
पोचतो

असा लागोपाठ ४ दिवस जातो,काही होत नाही

शांतता !

माया आणि अखील दोघांनाही त्यांचे उपजीविकेचे साधन सोडून अशा पोलिस स्थानकाच्या फेऱ्या मारणे शक्य नसते

शेवट काय होतो हे सांगण्याची गरज आहे का?
तर नाही!

ही भारतात कुठेही घडलेली घटना असू शकते.

आपल्या पोलिसांविषयी धारणा असतात👇🏻
पोलिस नागरीकांच्या सुरक्षेसाठी आहेत
पोलिस गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी आहेत
पोलिस तस्करी वगैरे रोखण्यासाठी आहेत
चोरी,खून,दरोडा या गोष्टी थांबवण्यासाठी आहेत

आपले सोडा बऱ्याचदा प्रत्यक्ष पोलिसांनाही सुरुवातीला असेच वाटत असते

वास्तवात मात्र पोलिसांच्या जबाबदाऱ्या याहून वेगळ्या
आणि व्यापक असतात.

पण त्या आधी पोलिस दलाची सोपी कनिष्ठांपासून सर्व उच्च अधिकाऱ्यांची श्रुंखला स्क्रिशॉट मध्ये पाहू... कुठेतरी उपयोगात येईलच.
आता सव्वाशे वर्षांत इतकी घट्ट बनलेली वीण किती कार्यक्षम असते याचे कोरोनाकाळातील जबरदस्त कार्यक्षम स्वरूप आपण पाहिलेच आहे

आणि इतरवेळचे थंड-गरम स्वरुप जास्त पाहत आलो होतो

पण इथे सर्वात महत्त्वाच्या मुद्याकडे वळताना आपण घोष वाक्य मनावर घेतो आणि तिथेच गफलत होते
👇🏻
'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' हे घोषवाक्य म्हणजे कर्तव्य नव्हे आणि घोषवाक्य हे कर्तव्य असण्याचा कोणता नियमही अस्तित्वात नाही

उद्या तुम्ही लाख म्हणाल बलात्काऱ्याला धरून अमुक तमुक करावे तर त्या वेळी ते परवानग्यांची रांग बनते आणि प्रकरण बारगळते पण हेच पोलिस दल मंत्र्यांची आणि 👇🏻
अधिकाऱ्यांची, विशेष व्यक्ती आणि कार्यक्रमाची सुरक्षा पाहण्यात जास्त काम करताना दिसते अगदी मंत्र्यांच्या,सचिवांच्या खाजगी कामांच्या अधिकाराचा सर्रास वापर करताना दिसतात
का?
तर पोलिस दल हे नागरिकांच्या रक्षणासाठी अजिबात नसते,ते फक्त शांतता राखण्यासाठी आणि प्रस्थापित करण्यास कटीबद्ध
असते.

जोपर्यंत कोणत्याही गुन्हेगारीमुळे समाजाची शांतता भंग होत नाही तोपर्यंत पोलिस दलाला त्यात खूप लक्ष घालायची गरज नसते ते फक्त नियंत्रणात ठेवायचे असते

मघाशी नमूद केलेले आपले फक्त गैरसमज असतात.

गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ करण्याचे नेहमीचे रडगाणे या अधिकारशाहीच्या नाड्या 👇🏻
सत्तेच्या ताब्यात असतात याचे द्योतक आहे

शेवटी... पोलिसांकडे आपली-माणसे म्हणून पहा. आपले पहारेकरी किंवा सेवक वगैरे समजू नका कारण खरेतर ती आपल्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा आहे हे पक्के लक्षात घेऊन त्यांच्याशी सख्य आणि सलोखा राखण्यातच सगळ्याचे उत्तर आहे.

#जयहिंद
#वंदेमातरम्
You can follow @migratorscave.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.