आनंदीबाई गोपाळराव जोशी || #थ्रेड

भारतातील पहिल्या महिला डॉक्टर. ज्या काळात स्त्रीचे घराबाहेर पडणे सुद्धा कठीण होते, त्या काळात या विरांगणेने, १८८३ मध्ये, १९व्या वर्षी, विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हानिया या अमेरिकास्थित कॉलेजमधून 👇
‘हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतिशास्त्र’ या विषयावर प्रबंध सादर करून MDची पदवी मिळवली.

पूर्वीच्या "यमुना", आनंदीबाईंचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी पुण्यात त्यांच्या आजोळी झाला.
कल्याणमधील गणपतराव जोशींच्या त्या ज्येष्ठ कन्या. ९व्या वर्षी त्यांचे लग्न २९ वर्षीय गोपाळराव यांच्याशी झाले👇
१४व्या वर्षी गर्भवती राहिल्या पण वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे त्यांचे मूल फक्त दहा दिवस जगले. त्यामुळे त्यांनी डॉक्टर बनण्याचा निर्णय घेतला..

इच्छाशक्ती असेल तर कोणताही विचार सत्यात उतरवणे अवघड नाही हे आनंदीबाईंच्या कार्यातून दिसून येतेच...!!!

गोपाळरावांची कोलकात्याला बदली 👇
झाली. आनंदीबाईंना मिशनरी शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून गोपाळरावांनी खूप प्रयत्न केला.  त्या काळातही त्यांचा महिला शिक्षणाला पाठिंबा होता.
अमेरिकेत त्यांनी पत्रव्यवहार केला पण ख्रिस्ती धर्म स्वीकारणे त्यांना पटले नव्हते. पण अखेर त्यांना प्रवेश मिळालाच.
👇
🔸कोलकत्ता मध्ये त्यांनी एक भाषण दिले. त्यातून त्यांना खूप प्रसिद्धी मिळालीच पण सोबत कार्याला सुद्ध हातभार लावण्यासाठी लोक पुढे आले.
🔸पदवीदान समारंभाला गोपाळराव उपस्थित राहिले, पंडिता रमाबाई होत्या
🔸भारताचे तत्कालीन व्हाइसरॉय यांनी पण २०० रुपयांचा फंड जाहीर केला.

👇
🔸भारतात आल्यानंतर त्यांना  कोल्हापूरमधील अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमधील स्त्री-कक्षाचा ताबा देण्यात आला.

खरोखर अजब वाटण्याजोगे जोडपे आहे हे..!!!
ज्या काळात स्त्रियांना अत्यंत दुय्यम आणि कमी लेखले जायचे, एखादी स्त्री काम करत नसेल तर तिला मारहाण केली जायची,👇
अश्या काळात गोपाळरावांनी स्त्री शिक्षणासाठी कठोर भूमिका घेत आनंदीबाईंचे शिक्षण पूर्ण करून घेतले.. नक्कीच ते नसते तर भारतात इतक्या लवकर महिला डॉक्टर बनण्याचा योग आला नसता..

दुर्दैवाने अवघ्या एकविसाव्या वर्षी त्यांचा क्षयरोगाने मृत्यू झाला...👇
ज्योतिबा सावित्री इतक्याच पवित्र व्यक्तिमत्त्वांना नमन 🙏

गोपाळराव जोशी यांच्या प्रमाणे जर प्रत्येक पुरूष स्त्रीच्या शिक्षणासाठी इतका झुरला तर...!!!
You can follow @Adiitiii_05.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.