असे झाले असेल काय ?
विचार करा 2010 पासून भारतीय उपखंडात घडलेल्या घटनांचा
CPEC मध्ये काही अब्ज डॉलर गुंतवून महामार्ग जवळजवळ पूर्ण होत असतानाच चीनने काम परस्पर थांबवले (,स्थगित)
चीन सारखा देश आपली गुंतवणूक अशी वाया घालवेल?
आणि ती सगळी गुंतवणूक म्हणजे पाकिस्तान ने घेतलेले कर्ज आहे.
जेव्हा CPEC ची घोषणा झाली तेव्हाच 1 बाब क्लियर झाली होती की हा मार्ग गिलगिट मधून जाणार जो भारतीय भूभाग असून त्यावर पाकिस्तान चा अवैध कब्जा आहे.कदाचित ह्यांना असे वाटले असावे की भारतात सत्तापालट इतक्या लवकर होणारच नाही किंवा जरी झालाच तरी पूर्ण बहुमताने
सध्या विरोधात बसणाऱ्यांचे
सरकार येणारच नाही.व महामार्ग पूर्णत्वास जाईल
मार्ग पूर्ण झाल्यावर आपोआपच भारतीय सत्ताधारी तो भाग पाकिस्तान ला आंदण देतील तसेच देशातून ही कोणते विरोध प्रदर्शन होणार नाही अशी मानसिकता तयार करूनच घेतली जाईल त्यासाठीच काँग्रेस पक्षाकडून 2008 साली तथाकथित MOU
करून घेतला असावा
त्याचे फोटो आता viral करण्यात येऊन आम्ही आणखी काय करू शकतो अशी झलक सुद्धा दाखवली जात असू शकते.गलवान प्रकरणात काँग्रेसची विधाने व त्याच दरम्यान viral झालेला MOU चा फोटो बरेच काही सांगून जातो
2010 साली घोषणा झाल्यानंतर मनमुटाव मिटवून पैसे चारून काम सुरू झाल्यावर 2014 पर्यत काम
नीटसे चालू झाले पण 14 साली सर्व चक्रे फिरली.
मोदींच्या वाढत्या जागतिक लोकप्रियतेमुळे तसेच POK व अक्सइ चीन विषयी मोदींचा दृष्टीकोन व त्यानुसार उचललेली पावले 370 ,35A व UT करणे
आणि भरीस भर म्हणून कोरोना मुळे बनलेले जागतिक कलुषित मत ह्यामुळे चीन ने CPEC स्थगित केला असू शकतो
असे होईल काय ?
समजा 14 साली सत्तांतर झालेच नसते तर चीनचा CPEC एकाच देशातून गेला असता व गिलगिट बाल्टिस्तान पाक चे 5 वे राज्य बनले असते.
पण आता ते शक्य नाही आणि अब्जावधी डॉलर ची गुंतवणूक ही अडकलीय व जागतिक कलुषित मतांमुळे चीन तेवढी कठोर कारवाई जशी आतापर्यंत विस्तार करताना केली तशी
करण्यास धजावणार देखील नाही.मग गुंतवणूक कशी सोडवणार ?आता भारताच्या पाठीशी अवघे जग उभे राहिलंय अश्या स्थितीत भारताला दुखावणे म्हणजे आगीत तेल पडल्यासारखे होईल म्हणून ही चीन तटस्थपणे जे होतेय ते पहात असावा
ज्या जागतिक घडामोडी होताहेत त्यात जर अकसाई चीन जसा बळकावला होता तो भारताला परत
देऊन निदान तात्पुरता भारताला शांत करता येईल काय अशीही चाचपणी केली जात असेल ही
हे पाऊल जर उचलले तर तिबेट वगैरे बद्दल भारत शांत बसेल काय ?हा ही जर तर चाच विषय आहे
अकसाई चीन जर भारताला विनासायास परत देण्याचे घाटत असेल तर चीन स्वतःची प्रतिमा तात्पुरती सुधारण्यासाठी हे पाऊल उचलू ही
शकेल पण त्यात त्याला CPEC बद्दल गिलगिट भारताने ताब्यात घेतल्यावर हमी हवी असेल ही 1 शक्यता नाकारता येणार नाही,कारण गलवान प्रकरण घडते नाही तर गिलगिट प्रदेश आज भारतात नक्कीच असता तेवढी चाचपणी करून झाली होती हे आता उघड गुपित झालेय.पण गिलगिट घेऊन भारत अकसाई चीन वर ही लगेचच नजर वळवणार
ह्यासाठीच चीन ने भारताला गलवान मध्ये गुंतवले व पाकिस्तान ला दुसरी आघाडी उघडण्यास उद्युक्त केले हे ही उघड गुपित आहे.
पण पाकिस्तान ने आजचे मरण उद्यावर जातेय हाच विचार करून दुसरी आघाडी उघडण्यास तयारी दाखवली नाही आणि चीन पुरता फसला
पाकिस्तान जर दुसरी आघाडी उघडतो आणि चीन हिमालय
ओलांडतो तर नक्कीच युद्ध पेटले असते त्याचमुळे तर USA च्या 3 नेव्ही फ्लिट दक्षिण चीन समुद्रात तैनात केल्या गेल्या व सगळ्यांची आवळली.
गलवान ला भारतीय जवानांनी माना व इतर भाग तोडून जे मुडदे चिनी सैनिकांचे बसवले आणि नंतर मोदीजी सीमेवर जाऊन आपल्या जवानांना प्रेरणा दिली त्यामुळे चीनी
सैनिकांचे मनोधैर्य खचले असण्याची अंतर्गत सूचना चीन ला मिळाली असण्याची शक्यता ही नाकारता येत नाही म्हणून चीन सध्या कागदी घोडे नाचवू लागलेला आहे.
पाकिस्तान कडून आपल्याला सपोर्ट मिळत नाही आणि त्यामुळे POK भारताने ताब्यात घेतल्यास CPEC ची अवाढव्य गुंतवणूक धोक्यात येऊ शकते असा विचार
कोणीही सुज्ञ माणूस करेल तोच चीन ने केला असण्याची शक्यता असावी
@migratorscave मला बोलला होता की चीन भारताला अकसाई चीन प्रदेश परत करेल.तेव्हा मला विश्वास बसला नव्हता पण ज्या on ground तसेच ऑन पेपर ज्या जागतिक घडामोडी घडताहेत तसेच पाकिस्तान मध्येही सर्वत्र PDM चे कबड्डी सामने चालू
झालेत त्यावरून मला ही शक्यता फार जवळची वाटते.
आता CPEC पाकिस्तान वगळता भारतीय गिलगिट मधून जात होता तोच मार्ग आता भारत,पंजाब(पाकिस्तान)सिंध,बलुचिस्तान ह्या 4 देशातून गेला तर चीनची गुंतवणूक ही धोक्यात येणार नाही आणि अकसाई चीन प्रदेश भारताला परत देऊन भारताचा सॉफ्ट कॉर्नर ही चीन
मिळवेल व काहीही गुंतवणूक न करता अत्यंत अवघड प्रदेशातून (गिलगिट अत्यंत अवघड आहे)तयार केलेला महामार्ग ही मिळेल व त्यावरील आंतरराष्ट्रीय वाहतुकीचा कर ही मिळेल
आणि हॉंगकॉंग तसेच इतर बळकवलेले देश ह्याबद्दल कलुषित झालेले जागतिक जनमत ह्यांच्यापासून चीन ला थोडा आराम ही भेटेल
कारण चीनची
आता पुरती पाचावर धारण बसलेली आहे कितीही गमजा मारून दाखवत असला तरीही चीन आपल्या गुंतवणुकीचा नक्कीच विचार करणार
चीन CPEC 4 देशातून पुढे नेणार,चीन अकसाई चीन भारताला परत देऊन आपली गमावलेली भारतीय बाजारपेठ परत मिळवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार पण तोपर्यंत भारतात असंख्य चिनच्याच धर्तीवर
उद्योग उभे केले जाताहेत त्यामुळे ह्या बाजारपेठेचा चीन ला फायदा किती होईल हा जर तर चा विषय होतो
पण मी म्हणतोय तेच
असे झाले असेल काय ?
आणि
असे होईल काय ?

जय हिंद
वंदे मातरम
भारत,खैबरपख्तुनखाँ,पंजाब(पाकिस्तान),सिंध,
बलुचिस्तान असे 5 देश
मी वरती 4 बोललोय
म्हणजेच आपली गुंतवणूक वाचवण्यासाठी चीन ही
पाकिस्तान चे तुकडे करायला सर्वांची बिनबोभाट साथ देईल पण CPEC ची हमी मात्र नक्कीच घेईल
त्यासाठीच सर्व भविष्यातील शक्याशक्यता पडताळून बघितल्या जात असतील ही
म्हणजेच काय ?पाकिस्तान चे दिवस आता भरत आलेत.
बांगला देश ने त्यांच्या देशात असणाऱ्या रोहिंग्या बद्दल कडक भूमिका स्वीकारली आहे
बंगालच्या समुद्रात बांगलादेश सीमेपासून 40 KM दूर असलेल्या व ज्वालामुखी स्फोटामुळे नवीनच म्हणजे अदमासे 30 वर्षांपूर्वी तयार झालेल्या बेटावर
त्यांचे स्थलांतर
करणार आहे त्याबद्दल तमाम जागतिक कनवाळू लोकांना स्पष्टपणे सूचना देण्यात आल्यात की तुम्हाला जी काय ह्यांची दया वगैरे करायची आहे ती ह्या बेटावर जाऊन करा आमच्या मुख्य भूमीवर आम्ही ह्यांना आसरा देणार नाही
हे 1 कट्टर इस्लामी रिपब्लिक देश स्वधर्मात असणाऱ्या लोकांवद्दल उघड बोलतोय
आणि भारतीय मुस्लिम उम्मा ला डोक्यावर घेताहेत.
14 च्या अगोदर भारत आणि बांगलादेश ह्यांच्यात सीमा विचित्र प्रकारच्या होत्या म्हणजे शाळा भारतात तर घर बांगलादेशात असेच बरेच प्रकार होते ते सगळे प्रकारचे टापू भारताने बांग्लादेशला देऊन टाकले व आपली सीमा सुरक्षित केली त्यामुळे बांगला
घुसखोरीला बऱ्याच प्रमाणात आळा बसला
अलीकडच्याच काळात बांगलादेशचे सामंजस्यपूर्व
विधान ऐकण्यात आले होते की आपले नागरिक परत बोलावण्यास बांगलादेशने तयारी दाखवली होती.
पण आताच अधिकृत आणि तितकेच कडक पाऊल रोहिंग्या बद्दल बांगलादेश ने उचलले त्यामुळेच सगळ्यांची आता द्विधा स्थिती झालेली आहे
बांगलादेश ने रोहींग्या वस्ती वसवण्यासाठी बाकायदा घरे ही बांधलीत त्या बेटावर.भारतीय समुद्रात अशी कित्येक निर्मनुष्य बेटे आहेत.
भारत ही तसाच विचार ही करू शकतो पण त्याअगोदर NRC आणली जाईल आणि ती NRC व तत्सम येऊ घातलेले कठोर कायदे ह्याच साठी झलक दाखवण्यासाठी हे किसान आंदोलन चालू आहे
अशी आंदोलने करून बहुमताने संसदेत पारित झालेले कायदे परत घेता येतील असे जर कोणाला वाटत असेल तर ते मूर्खाच्या नंदनवनात आहे
हे कायदे तर परत घेतले जाणार नाहीतच पण ह्याहून कठोर कायदे आता नजीकच्या काळात संसद बहुमताने पारित करेल.त्याच साठी तर मोदींना बहुमताने जनतेने निवडून दिलेय
You can follow @MilindG11975687.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.