लज्जतदार विदर्भ 
गोळाभात 
साधारण मलकापूर पासून वैदर्भी बोलीभाषा जाणवते ती थेट चंद्रपूर भंडारा पर्यन्त.विदर्भ म्हणजे रखरखीत कोरडे ऊन आणि चमचमीत जेवण .ठररा न खाणारा नागपुरी पुरुष आणि गोळाभात न येणारी नागपुरी सुगरण सापडणे अशक्य आहे .सावजी मटण , सांबर वडी ,आमटी पातोडी या 0/1

या झणझणीत पदार्थांच्या मंदियाळीत गोळाभात आपले वेगळेपण टिकवून आहे .दिसायला सोपा असला तरी गृहिणीचा कस काढणारा आहे आणि सुगरणीने बनवलेला अस्सल गोळाभात हैद्राबादच्या दम पुखत बिर्याणीच्या कानंफाट्यात मारण्याला समर्थ आहे .एक वाटी बासमती हिंग मीठ जिरे मोहरी घालून सोडलेले बेसनाचे गोळे 1/1
भात आणि गोळे बरोबच शिजायला हवेत ,शिजवून झाल्यावर त्यावर फोडणीचे तेल वरतून थोडी कोथिंबीर आणि सोबतीला कढी किंवा पातळ पिठले किंवा आमसुलचा सार पण चालतो . एकदा हा खास वैदर्भीय चवीचा पदार्थ करूनच बघा.नागपूरची मुलगी लग्न करून महाराष्ट्रात कुठेही स्थिरस्थावर झाली आणि कितीही वयस्कर 1/2
झाली तरी सासरच्या लोकांना हा पदार्थ खाऊ घालताना थांबा मी आज तुम्हाला माझ्या माहेरचा एक छान पदार्थ खाऊ घालते असेच म्हणेल .कारण गोळाभात तिच्याकरता माहेरहून पाठवलेल्या रुखवता सारखा सुगरणीने दिलेला आयुष्यभराचा ठेवा असतो