शेतकरी आंदोलन-शेतीपलीकडचे समज-गैरसमज..

"भारत हा कृषिप्रधान देश आहे" हे आमच्या भूगोल विषयात शिकवले आणि मुळातच भारत देशाची जडणघडण ही शेती आणि शेतीवर आधारित उद्योगांवर झालेली आहे, होत आहे आणि होत राहील यात तिळमात्र शंका नाही...
शेती हा इथला मूलभूत, जुना व्यवसाय असून तो टाकून देता येणार नाही आणि होणारी औद्योगिक, तांत्रिक, डिजिटल प्रगती आम्हाला पोटाला अन्न देऊ शकेल पण पोट भरू शकणार नाही, त्यासाठी शेती हाच पहिला आणि शेवटचा पर्याय होता, आहे आणि राहील..
ज्या ज्या वेळी शेती व्यवसायावर संकट आली त्या त्या वेळी त्या त्या वेळेच्या सरकारने / राजाने शेती व्यवसाय हाच भक्कम पाया मानून शेतकऱ्यांना शक्य ती मदत केली आहे..
.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंडित नेहरूंनी शेती आणि औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी नेहमी समतोल साधण्याचा प्रयत्न केला.
पुढे शास्त्री जी, इंदिरा जी यांनीही शक्य तितकी भरीव कामगिरी केली..
.
शेती करतांना तोंड द्याव्या लागणाऱ्या समस्या नैसर्गिक आणि मानव निर्मित असून, त्या नवीन नाहीत मात्र सरकार हाच खरा शेतीचा आधारस्तंभ आहे, तारणहार आहे हे ज्या सरकारला कळले त्यांनी त्यांच्यासाठी काम केले..
.
सध्याच्या शेतकऱ्यांच्या आंदोलन संदर्भात अनेक गैरसमज निर्माण झालेले आहेत ते असे.
1. शेतकरी गरीब आहे, असतो, राहणार
2. गरीब शेतकरी अशिक्षित, अडाणी, गावठी असतो, आहे राहणार
3. शेतकरी सरकारला प्रश्न विचारू शकत नाही
4. शेतकऱ्याला काहीही कळत नाही.
5. शेतकरी टॅक्स भरत नाही
6. शेतकरी गरीब, दरिद्री, भिकारी असतो त्याला खाण्यापिण्याचे काहीही कळत नाही
7. शेतकरी आंदोलनात एवढे पैसे कुठून येत आहेत.
8. शेतकऱ्यांना राजकीय नेत्यांनी भडकावले आहे.
9. शेतकरी नेहमी अस्वच्छ, घाणेरडा, असतो, आहे, राहणार
10. शेतकऱ्यांना जगाचे ज्ञानच नसते, नाही, नसणार.
कारणे.
शिक्षण-मूळ कारण:
शेतकरी, कष्टकरी, मजूर यांच्याविषयी शिक्षणक्षेत्राने अनेक गैरसमज पसरवले आहेत.
पाठ्यपुस्तक तयार करतानाच अनेक तथाकथित शिक्षण सम्राट, शिक्षण महर्षी, शिक्षण तज्ञ, चाणक्य लोकांनी या गटविषयी नकारात्मक चित्र रंगवलेले आहे.
.
उदा. मी शाळेत शिकत असतांना इयत्ता 4थी ते इ.12वी पर्यन्त च्या शालेय अभ्यासक्रमातील अनेक चित्र शेतकरी गरीब, फाटलेल्या, मळकटलेल्या, कपड्यात, चेहऱ्यावर सुरकुत्या, नेहमी नाराज, दुःखी, वेदना सहन करणारा, अत्यंत गरीब, रडणारा दाखवलेला असतो..
सोबतच त्याची बायको, मुलं, आईवडील गरीब, कुपोषित, नेहमी कामाच्या बोजाने दबलेले दाखवलेले असतात.

शिक्षित समाजाने त्यांचे असे चित्र रेखाटून त्यांच्या घरी आनंद, समाधान, कधी दाखवलेच नाही.
.
शेतकरी हा नेहमी उदासीन, दुःखाने पिचलेला, अर्धमेला, घरात आठरविश्व दारिद्र्य असणारा दाखवला जातो
शाळेत जाणारी मुलं हेच शिकतात, जसजशी ही मुलं मोठी होतात ते आपल्याच व्यवसायाकडे, हे दुःख आता नको म्हणून याच गोष्टीचे रूपांतरन, दुर्लक्ष, तिरस्कार, अज्ञान स्वरूपात होते. काल शाळेत गेलेला आजचा तरुण नवीन सुखाच्या अनेक वेगळया मार्गांवर चालायला सुरुवात करतो.
याच्या उलट, शहरातील, पॉश lifestyle, झगमगीत कपडे, हॉटेलमधील चटपटीत जेवण, शोरूम मधील महागडे कपडे, चारचाकी गाड्या, त्यात उधळणारी जीवनशैली, डान्स, चित्रपट, खेळ यातील ग्लॅमर ही चित्रे मुलांना अधिक भावतात.

मोठेपणी कोणाला कोहली, कोणाला मेस्सी, कोणाला धोनी, कोणाला खान व्हायला आवडते
शेतकरी व्हायला आवडत नाही.

शेतकऱ्यांची, प्रामाणिकता, सचोटी, कष्ट करण्याची ताकद, त्यांचे शेतीतील अगाध ज्ञान, निसर्गाला तोंड देण्याची वृत्ती, त्यांचे परोपकराचे दातृत्व, मातृत्व, प्रेम, वात्सल्य, करुणा, यांचे चित्र कधी उभे केलेच जात नाही..
.
झालीच तर एखादी बहिणाबाईंची कविता स
शालेय अभ्यासक्रमात दिसते त्यातही चित्र गरिबीचेच असते..
मग अशा वेळी शहरी शाळेत शिकणारा विद्यार्थी, खाजगी शाळेत लाखोंची फी भरून शिकणारा विद्यार्थी कोणाचे गुण आत्मसात करेल.

श्रीमंतांचे काळे धंदे, भ्रष्टाचार, गरिबांना लुटण्याची वृत्ती, मेकअप च्या आता असणारे काळे डाग, धुर्त आणि
लुटारी वृत्ती, काळे हृदय, तिरस्कार, द्वेष, श्रीमंतांची कृतघ्न वृत्ती कधी चित्रांच्या माध्यमातून दाखवली जात नाही.
.
उदा. अंबानी किती श्रीमंत आहे हे शिकवले जाते मात्र त्याच अंबानीने प्रोजेक्ट कसे मिळवले हे शिकवले जात नबी उलट तुम्हीही तसेच काम करा याला अप्रत्यक्षरीत्या प्रोत्साहन
दिले जाते.
.
मग आजच्या आंदोलनात शेतकरी पिझा बर्गर, लस्सी, बिर्याणी खातांना अचानक समोर दिसत असेल तर हे ज्यांना दूध कोण देतं हे माहीत नाही अशा पिढीकडून आम्ही काय अपेक्षा करायची?
शेतकरी आयफोन वापरतो, जीन्स टी शर्ट घालतो, हे या पिढीला अचानकपणे दिसू लागल्यावर त्यांना दोष देता येईल का?
शेतकऱ्यांच्या घरी असणारी स्वच्छता, त्यांचे व्यवस्थापन, त्यांची दुरदृष्टी, जंगलाचे आणि शेतीची माहिती, बिनभिंतीच्या शाळेत शिकलेले गुरांसोबत राहणारे, त्यांना परिवाराचा हिस्सा मानणाऱ्या लोकांचे जीवन कुत्र्याला कारमध्ये मीरवण्याऱ्या artificial प्रेम करणाऱ्या तरुणाला काय बोलणार?
थोडक्यात. शाळेचा अभ्यासक्रम संतुलित स्वरूपाचा असावा, त्यात उकिरडा नेमका काय असतो इथपासून ते शेतकरी जवळपास दर महिन्याला 2 सण साजरे करतो, त्यावेळी कधी गोडधोड जेवण तर कधी मांसाहार दाबून असतो, जसे दुःख असते तसे समाधान प्रेमही भरून असते. हे शिकवलं पाहिजे,
ही चित्र शालेय अभ्यासक्रमात असली पाहिजेत. परंतु शिकलेल्या शिक्षण सम्राटांना हे कधी कळणार?
.
आजही शालेय विज्ञानाच्या पुस्तकांमध्ये १पाणवठा, त्यात कपडे धुणाऱ्या २बायका, शेजारी त्या पाणवठ्यावर पाणी प्यायला आलेली गुरं, शेजारी पिण्याचे पाणी भरणाऱ्या २बायका हेच चित्र दाखवले जाते.
आणि शिक्षक आत्मविश्वासाने हे सगळं शिकवतो. अशा धड्यातून विद्यार्थी तिरस्कार, द्वेष, मत्सर, साहजिकच शिकतो. त्याचे हे आजचे चित्र आंहे.
.
जेंव्हा सधन शेतकरी, पिझा बर्गर लस्सी, बदाम, काजू, खाऊ लागला तर भ्रष्टचार शिकलेल्या, अंगी भिनलेल्या तरुणांना शेतकरी आंदोलन पचत नाही आहे.
त्यासाठी शालेय अभ्यासक्रम संतुलित करणे गरजेचे आहे जेणेकरून येणारी पिढी प्रामाणिक, सच्चा, खरा देशभक्त शेतकरी, शेती यांच्याविषयी अज्ञानी न राहता ती पीढी ही शेतकर्यांना मदत करेल असे अभ्यासक्रम निर्माण केले पाहिजेत.
तात्कालिक कारण-राजकारण:नोकरी
जगात आर्थिक मंदीचे चटके 2008 पासून बसू लागले आहेत मात्र, दुरदृष्टी असणाऱ्या डॉ. मनमोहन सिंग सरकारने ते आपणाला जाणवू दिले नाही.
२०१४ च्या निवडणुकीत भाजपने नको तो आश्वासने देऊन आ बैल मुझे मार अशी परिस्थिती निर्माण करून घेतली.
त्याआधी भारतात आयटी क्षेत्राने भरभरून प्रगती केली होती, चांगले पॅकेज मिळू लागली होती म्हणून तरुणांचा जोश होता, आम्हाला यापेक्षा अधिक हवे या भावनेने भाजपकडे वळले. भाजपने गाजर दाखवले.
याच संधीचा फायदा घेत भाजपची मातृ संस्था RSS ने व्यवस्थित काही शिक्षित पण असंस्कारी तरुणांना
हाताशी धरून देशद्रोह, हिंदू मुस्लिम, उच नीच, पाकिस्तान, शिव्या आदी धडे शिकवून त्या तरुण पिढीवर सुसंस्कार केले. त्यांचे ब्रेनवॉश केलेले आहे. त्याबदल्यात त्यांना नोकरी, एसी रूम्स, मोबाईल, खाणे ईत्यादी गोष्टी मिळतात, मग अशा वेळी ते मालकांचेच ऐकतील आणि शिकवलेले धडेच गिरवतील..
एका वर्गाची मानसिकता:
भारत देशामध्ये जशी जातीयता, धर्मांधता, आहे तशीच काही मोजक्या लोकांच्या समूहाची रक्तशोषक मानसिकता आहे. गरीब कष्टकरी जनतेने पुढे जाऊ नये, आमच्या व्यवसायात वाटेकरू होऊ नये, आमच्या समोर प्रतिस्पर्धी निर्माण होऊ नये, आम्हाला जे हवं जस हवं तसं आम्ही करू
अशी एक मानसिकता आहे. हा काही धन्याड्या, आणि विशिष्ठ जातीचा मिळून एक समूह तयार झालेला आहे या वर्गाला तुमची श्रीमंती आणि ज्ञान बघितल्या जात नाही अशा लोकांनी शेतकरी, शेतकरी आंदोलन यांच्याविषयी जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर पैसे देऊन खोट्या गोष्टी पसरवण्याचे काम केलेले आहे.
त्यात कोणकोण सामील आहे तुम्हाला माहितीच आहे.
.
अशा लोकांना expose करून प्रेमाचा, माणुसकीचा धडा शिकवणे गरजेचे आहे. जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना त्रास कमी होईल...
.
शेतकऱ्यांविषयी खरी माहिती, सत्य परिस्थिती, त्यांचे ज्ञान, त्यांचे कष्ट, प्रामाणिकपणा इत्यादीविषयी समाजात जागृती करन
लोकांच्या मनातील गैरसमज दूर करता येतील, त्यासाठी सय्यम, शांतता आणि निकराने लढा द्यावा लागणार आहे.
.
ही लढाई फक्त सरकार विरुद्ध शेतकरी नव्हे तर अन्याय अपरिपकवता विरुद्ध प्रेम, सचोटी, समृद्धी यांची आहे.
देशाच्या कानाकोपऱ्यातू शेतकरी आंदोलनात लोकं सहभागी होत आहेत.
ते स्वतःसाठी नव्हे तर देशासाठी, देशातील प्रत्येक व्यक्तीच्या, सजीवाच्या सुखासाठी ते भांडत आहेत, त्यांना आपण प्रत्येकाने शक्य ती मदत करावी. मदत करता येत नसेल तर त्यांच्याविषयी नाकरात्मकता, द्वेष पसरऊ नका एक विनंती. त्यांच्या सुखताच देशाचे सौख्य आणि समृद्धी सामावलेली आहे.
You can follow @plutotrainings1.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.