आज १३डिसेंबर.,
बरोबर १९वर्षांपुर्वी,२००१साली लोकशाहीचे मंदीर समजले जाणार्या भारतीय संसद भवनावर पाकिस्तान स्थित अतिरेकी संघटनेच्या ५अतिरेक्यांद्वारे हल्ला करण्यात आला होता.
अंधाधुंद गोळीबार,ग्रेनेड हल्ल्यासह,सुसाईड बॉंम्बींग चा सुध्दा अवलंब अतिरेक्यांद्वारे यात करण्यात आला होता.

१३डिसें२००१... दिल्लीच्या आसमंतात कोवळं ऊन पसरलं होतं.
संसदेत विरोधकांच्या गदारोळात हिवाळी अधिवेशन सुरू होतं. महिला आरक्षण विधेयकावरून गेले काही दिवस संसदेत गदारोळ सुरू होता.
संसद परिसरात सगळीकडे नेते, पत्रकार बिनदिक्कत फिरत होते, बोलत होते.
सगळं रोजच्यासारखं सुरू होतं.

११वाजता लोकसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं.पंतप्रधान वाजपेयी व विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी आपापल्या गाडीने संसदेबाहेर पडले.
उपराष्ट्रपती कृष्णकांत यांची गाडी गेटवर येउन त्यांची बाहेर येण्याची वाट बघत थांबली.
तेवढ्यात DL3 CJ1527 क्रमांकाची पांढरी ऍंबेसेडर वेगाने गेट१२ जवळ आली.

कारचा वेग संसदेत चालणाऱ्या इतर सरकारी गाड्यांपेक्षा थोडा जास्त असल्याने संसदेच्या वॉच अँड वॉर्ड ड्युटीवर असलेले जगदीश प्रसाद यादव घाई-घाईत निशस्त्रच गाडीच्या दिशेने धावले.
तेव्हा लोकशाहीचं मंदिर मानल्या जाणाऱ्या संसदेच्या सुरक्षारक्षकांकडे शस्त्रं नसायची.

जगदीश यादवांना पळताना पाहून इतर सुरक्षारक्षकही त्या गाडीच्या दिशेने धावले.
तेवढ्यात, ही एंबेसेडर उपराष्ट्रपतींच्या गाडीला धडकली.
गाडीच्या बाहेर पडत अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला. त्यांच्या हातात AK-47 आणि हँडग्रेनेडसारखी आधुनिक शस्रास्त्रं होती.

गोळीबाराच्या आवाजावर नेमकं काय घडलंय कुणालाही समजेनासं झालं पण वॉच एंड वॉर्ड टिमचे सदस्य आवाजाच्या दिशेने धावले.
एका पत्रकारास तर वॉच एंड वॉर्ड च्या एका गार्डने, "चिमण्या उडवण्यासाठी कुणीतरी ठासायची बंदुक उडवलीये बहुतेक" असाही अंदाज सांगितला.

मात्र, पुढच्याच क्षणाला, राज्यसभेच्या गेटमधून एक मुलगा आर्मीच्या गणवेशासारखी पँट आणि काळा टीशर्ट घालून हातात एक मोठी बंदूक घेऊन हवेत गोळीबार करत गेट नंबर एकच्या दिशेने धावत आला.
वार्ताहर मनोरंजन भारती सांगतात, "काही क्षणांपूर्वी मी ओबी व्हॅनमधून लाईव्ह रिपोर्ट करत होतो.

त्यावेळी माझ्यासोबत शिवराज सिंह चौहान आणि काँग्रेसचे एक नेते होते. मी या नेत्यांना आपल्या मारूती व्हॅनने आत सोडून बाहेर पडलोच होतो तेवढ्यात मला पहिल्या गोळीचा आवाज आला, त्यानंतर मी पळत गेलो आणि लाईव्ह केलं. माझ्या मागे मुलायम सिंह यादव यांचा ब्लॅक कॅट कमांडो होता.
मी त्याला म्हणालो, 'बॉस, मी संसदेकडे पाठ करून लाईव्ह रिपोर्टिंग करतोय. मागून कुणी अतिरेकी आला तर बघून घे. तो म्हणाला ठिक आहे.' गोळीबाराचे व स्फोटांचे मोठ-मोठे आवाज येत होते"
अतिरेक्यांच्या हातातील AK47मधून बाहेर पडणाऱ्या गोळ्यांच्या आवाजाने उपस्थित लोकांचे चेहरे भीतीने काळवंडले.

सभागृहाच्या गेट१ च्या बाहेर केंद्रीय मंत्री मदनलाल खुराना यांच्याशी बातचीत करत असलेले पत्रकार सुमित अवस्थी सांगतात,"मी मदनलाल खुरानांना विचारलं की हा सिक्युरिटी गार्ड गोळीबार का करतोय?
मला वाटलं तो कुणाचा बॉडीगार्ड असावा.
एवढ्यात वॉच अँड वॉर्डच्या एका जवानाने त्यांना खेचलं.

त्या झटक्याने ते खाली जमिनीवर पडले, नंतर त्या जवानाने माझा हात खेचून म्हटलं, 'खाली वाका. कुणीतरी गोळ्या झाडत आहे. वाकूनच आत जा. नाहीतर गोळी लागेल'."
मनोरंजन भारती सांगतात, "संसदेतील सुरक्षारक्षकांकडे तेव्हा शस्त्रं नसायची. संसदेत सीआरपीएफची एक बटालियन असायची.

मात्र, तिला घटनास्थळापर्यंत येण्यासाठी अर्धा किलोमीटरचं अंतर पार करावं लागणार होतं. गोळ्यांचा आवाज येताच ते धावत आले."
उपराष्ट्रपतींचे सुरक्षारक्षक आणि अतिरेकी यांच्यात संघर्ष सुरू असताना निशस्त्र सुरक्षारक्षक मातबर सिंह यांनी आपल्या प्राणांची बाजी लावत गेट नंबर ११ बंद केलं.

मातब्बर सिंह काही करणार तोच त्यांच्यावर बेछूट गोळीबार झाला,पण त्या परिस्थितीत ही त्यांनी वॉकिटॉकीवरुन संदेश दिला आणि संसदेचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले., ज्यामुळे अतिरेकी संसदेत दाखल होउ शकले नाहीत.
अवस्थी सांगतात,"मदनलाल खुरानांच्यासोबत मलाही गेट१:च्या आत टाकुन बंद करण्यात आलं.

अतिरेक्यांनी गेट १ मधून संसदेच्या आत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षारक्षकांनी एका अतिरेक्याला तिथेच ठार केलं.
यात अतिरेक्याच्या शरिरावर बांधलेल्या स्फोटकाच्या बेल्टचा स्फोट झाला.
या संपूर्ण घटनाक्रमाला आपल्या कॅमेऱ्यात बंद करणारे कॅमरापर्सन अनमित्रा चकलादार सांगतात,

"गेट १वर एका अतिरेक्याला ठार केल्यानंतर दुसऱ्या एका अतिरेक्याने आम्हा पत्रकारांवर गोळीबार सुरू केला.यातली एक गोळी न्यूज एजेन्सी एएनआयचे कॅमेरापर्सन विक्रम बिष्ट यांच्या मानेला लागली.दुसरी गोळी माझ्या कॅमेऱ्याला लागली. आमच्या जवळ एक ग्रेनेड येऊन पडला. मात्र,त्याचा स्फोट झाला नाही.
यानंतर चारही अतिरेकी गेट ४कडे वळले. दरम्यानच्या काळात तीन अतिरेक्यांना ठार करण्यात आलं. पाचव्याने,गेट ५मधुन सभागृहात घुसण्याच्या प्रयत्न केला. पण, जवानांनी त्यालाही ठार केलं.
सुरक्षारक्षक आणि अतिरेकी यांच्यात सकाळी ११:३०वाजता सुरू झालेली ही चकमक संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू होती.

संध्याकाळी चार ते पाचच्या दरम्यान मोठ्या संख्येने सुरक्षादलांचे जवान संसद परिसरात आले आणि त्यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला.
या हल्ल्यात दिल्ली पोलिसांचे पाच जवान, केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाची एक महिला सुरक्षारक्षक,राज्यसभा सचिवालयाचे दोन कर्मचारी आणि एका माळ्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणात चार संशयितांना अटक झाली.
१५डिसें'२००१ रोजी, दिल्ली पोलिसांनी अफजल गुरू, प्रो.एस.आर.गिलानी, अफशान गुरू आणि शौकत गुरू या चौघांना संशयीत म्हणून ताब्यात घेतले.
१८डिसें रोजी अफशान गुरू ला सोडण्यात आले व इतरांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

३०ऑगस्ट२००३रोजी या हल्ल्याचा मास्टरमाईंड, जैश-ए-मोहम्मद चा कमांडर, गाजीबाबा चा श्रीनगर मध्ये एन्काऊंटर करण्यात लष्करास यश आले.
४ऑगस्ट२००५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने अफजल गुरू ची फाशी ची शिक्षा कायम केली, आणि शौकत गुरु यास १०वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

नंतर मधील काही वर्ष.,
दया अर्ज, राष्ट्रपतीभवन आणि गृहमंत्रालय यांत हा विषय घोळत राहिला...
आणि अखेरीस, राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी २३जाने२०१३ला दया अर्ज फेटाळून लावला.
९फेब२०१३ ला म्हणजे तब्बल १२वर्षांनंतर अफजल गुरू यास तिहार जेल मध्ये सकाळी ८:००वाजता मरेपर्यंत फाशी देण्यात आली.