वडील आमचे काँग्रेस संस्थाचालकाच्या संस्थेत कामाला त्यामुळं नगरपालिकेला काँग्रेसचा जोमानं प्रचार अन रॅल्या, पण विचारसरणी अन बांधिलकी पवारसाहेबांची त्यामुळं नगरपालिकेला स्वतः च 1 वोट फक्त साहेबांच्या घड्याळला असं त्यांच समीकरण असायच. विधानसभा जागा राष्ट्रवादीला सुटायची म्हणून ते..
त्यात निवांत असायचे. वडिलांची ही राजकारणाची पद्धत वेगळीच वाटायची पण त्यांच साहेबांवरील प्रेम अन विश्वास त्याला कारणीभूत. आजही साहेबांनी माझ्या वडिलांच्या लग्नानिमित्त दिलेलं शुभेच्छापर पत्र घरात सांभाळून ठेवलंय. या वर्षी दिवाळी निमित्त साहेबांना भेटण्याचा प्लॅन होता पण कोरोना
मुळ सगळं फसलं. असाच आज दुपारी एक
ट्विट वाचून चर्चा करतांना वडिलांना म्हटलं 'साहेब हे यशस्वी झालेत पण विजय राहून गेला असं वाटत???
वडील : मीं लहान पणा पासून बघतोय हा नेता एक पण निवडणूक हरला नाय म्हणजे जेव्हा पुलोद प्रयोग झाला. त्या नंतरच्या निवडणुकात इंदिराजीनी स्वतः विरोधात
सभा घेतली तरी साहेब जिंकले हे त्यांच यश
आज आमदार ते संरक्षण मंत्री, MCC ते ICC अध्यक्ष अशी कितीतरी पद भेटली त्यात उत्कृष्ट काम केलीं हे त्यांच यश. पन्नास वर्ष अभेदय, अजिंक्य असा हा माणूस आहे. हे साहेबांच यश आहे.
बरोबर की नाय बोल?? म्हटले अगदी बरोबर.
आता विजयाकडं ये...
ज्या विरोधी पक्षाने देशातील सगळ्या पक्षांना चितपट केलंय आज त्याचं पक्षाचा
"पंतप्रधान जाहीर सभेत म्हणतोय पवार साहब मेरे गुरु हैं" बस्स इथंच विजय आहे !!
ज्या नेत्याच्या 75 व्या वाढदिवसाला देशातील सगळे विरोधी पक्ष, मित्र,शत्रू सगळे एकाच व्यासपिठावर दिसताय बस्स इथंच विजयी झाले साहेब.
जो मित्रच काय शत्रूला ही स्वतःच नाव आदराने बोलायवंस भाग पाडतोय तोच तर खरा नेता असतो, तोच माझ्या साहेबांचा विजय आहे. आज वयाच्या 80 ला भिडल्यावरही तुम्हा तरुणाईला लाजवेल अशी ऊर्जा, अशी जिद्द घेऊन दिल्लीच्याही सरकार ला लोळवून ठेवलंय हाच तर साहेबांचा विजय आहे..!
त्यांच नाव घेतल्याशिवाय आपल्याला राजकारणात कोणी ओळखणारच नाही अश्या भीतीने जेव्हा बिनलाजी टीका साहेबांवर केलीं जाते अन साहेब त्याच टिकेला ज्या संयमाने उत्तर देतात अन विरोधकाचा टप्प्यात आल्यावर जो कार्यक्रम करतात तोच साहेबांचा विजय आहे...!!
आजही गावातील कार्यकर्त्यांला साहेब नावानी हाक मारतात तोच आमच्या सारख्या साहेबप्रेमींचा अन पवार साहेबांचा विजय आहे...!!

तुमच्या पिढीला नाही समजणार लेका हे शरद पवार नावाचं रसायनच वेगळं आहे...,
तुला नाय समजणार लेका साहेब माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे..❣️🙌

#threadकर
@prash_dhumal
You can follow @Truepat19189910.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.