जर तुम्हाला वाटत असेल की भरपूर पैसे आले कि आर्थिक स्वातंत्र्य मिळेल आणि तुम्ही आयुष्यभर सुखी,समाधानी रहाल तर ते पुर्णपणे चूक आहे.

आर्थिक सुरक्षिततेसाठी ज्ञान, अनुभव आणि सतत कष्टाची तयारी याला पर्याय नाही.

हा फोटोतला सुशीलकुमार आठवतोय?
१/६
#आर्थिकसाक्षरता #मराठी #SaturdayThread
2011 साली हा पठ्ठ्या ५ कोटी रूपये जिंकला होता तो ही स्वत:च्या बुद्धीच्या आणि ज्ञानाच्या जीवावर!
एका रात्रीत करोडपती तर झालाच पण स्टारही बनला..

एवढे पैसे की आले की मग इतर काहीही करायची गरजच काय? विविध कार्यक्रमांना हजेरी, मार्गदर्शन, सत्कार, समाजोपयोगी कार्यक्रमांसाठी देणगी २/६
अगदी दर महिन्याला.
लोकं काहीही कारण सांगून याच्याकडून पैसे घेऊन जायचे.
पुढे मित्रही स्वार्थीच निघाले, भरपूर दारूचे, सिगारेटचे व्यसन लावून गेले!

त्यात काहीही अनुभव नसल्याने कोणत्याही व्यवसायात तो पैसे गुंतवत गेला. अगदी सिनेमाही, नको ती संगत आणि अचानक आलेला भरपूर पैसा यामुळे ३/६
सद्सदविवेक बुद्धीच नष्ट झाली.

पुढे त्याच्याकडचे सर्व पैसे संपले, त्याचे करियरही उद्ध्वस्त झाले, जे लोक त्याच्या पुढेमागे करत होते ते आता त्याला टाळू लागले. सर्वांनीच त्याला बेदखल केले.

कसातरी तो आता सावरतोय, दोन गायी घेऊन त्यांच्या दुधावर आता त्याची गुजराण सूरू आहे. ४/६
हे सर्व त्याने अलिकडेच स्वत:च

सर्वांसमोर मांडलेय. शेवटी तोच म्हणतो

it’s important to have little needs in life & work towards fulfilling it.

पैसे आले की सर्व ठीक होते असे नाही त्यासाठी आर्थिक साक्षरतेचे महत्व किती आहे हे कळलेच असेल. ते समजून घ्या, शिका आणि जागृत व्हा! ५/६
You can follow @wankhedeprafull.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.