आपल्याला कल्पना आहे की दिल्लीच्या सीमांवर किसान आंदोलन सुरू आहे , इतक्या थंडीत देखील आंदोलन अजून गर्दी टिकवून आहे आणि त्याचे सर्वात मोठे (एकमेव म्हणायला हवे) कारण म्हणजे आंदोलकांना दररोज खायला मिळणारे नवीन नवीन खाद्यपदार्थ , आंदोलनातील विविध पदार्थांचा हा #थ्रेड
पहाटे 3 वाजताच लंगरची तयारी सुरू होते
पंजाब मध्ये चहा सोबत पकोडे खायची पद्धत आहे !
त्यानुसार सकाळी सर्वात आधी न्याहारीला गरम गरम पकोडे तळले जातात
सोबतीला मग भरून चहा दिला जातो !
होय तिकडे नुसत्या दुधाचा चहा असतो आणि लोक कपभर घेत नाहीत , अख्खा मग रिचवतात !
नाश्त्यानंतर बारी येते ती जेवणाची !
बटाट्याची भाजी हा तेथील स्पेशल डायट ! गोड बटाट्यात थोडे पीठ मिसळून स्पेशल आचारी बटाट्याची भाजी केली जाते !
सोबत रोटी दिली जाते ! त्यासाठी भल्यामोठ्या मशीनी अचानकपणे आंदोलनात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत !
पुरी बनवायच्या मशिनी देखील उपलब्ध असून , तीन तासात एक मशीन किमान 4 हजार पुऱ्या बनवते !
सोबतीला जीरा राईस आहेच !
दुधाच्या नद्या वाहत असून , मागेल त्याला लिटर लिटर दुध दिले जाते ! लक्षात घ्या पंजाब मध्ये 52 रुपये लिटर दुधाची किंमत आहे !!
कुदरती बिर्याणीला विसरून कसे चालेल ??
नॉनव्हेज बिर्याणी देखील मोठ्या प्रमाणात वाटली जात आहे !
घसा शेकायला नुसती कढी बनवली जात नसून , खमंग अशी पकोडा-कढी बनवली जाते !
आता स्वीट डिश कडे वळू !
मोठ्या मोठ्या भांड्यात खीर बनवली जाते !
जिलेबी तर फेव्हरेट आयटम असतो !!
गुलाब जामुन आणि बुंदीच्या लाडवाचे मोठे मोठे बॉक्स आणले जातात !!
सिंटेक्सच्या टाकीतून लस्सी वाटप होते !!
काजू-बदाम सारख्या ड्राय फ्रुटस चे डोंगर उभे केले आहेत !! जे गाजराच्या हलव्यात किंवा खीर मध्ये वापरले जातात !!
पालक,गाजर,टमाटे ,बटाटे, तुम्ही फक्त नाव बोला ती भाजी टनाच्या हिशोबात अव्हेलेबल आहे !!
इतक्या मोठ्या प्रमाणत म्यानेजमेंट आहे !!
केळी, संत्री,सफरचंद सर्व फळे उपलब्ध करून देण्यात आली आहेत!
कोण कुठून काय आणते त्याला किती रुपये लागतात हे प्रश्न विचारायला फक्त मनाई आहे !!
कृषी मंत्र्यासोबतच्या बैठकीला आंदोलकांचे नेते पराठे दाल सबजी स्वतःच पॅक करून घेऊन जातात !
रात्री पुलाव देण्यात येतो
मोठ्या मोठ्या तंदूर सेट करण्यात आल्या असून त्यात नान बनवली जाते ! तंदूर ऑपरेट करायला स्किल असलेले कामगार लागतात त्यांचा पगार कोण देतो ? असले फालतू प्रश्न विचारायची मुभा नाहीं आहे !
चहाचे काउंटर उभे करण्यात आले असून पाहिजे तेव्हा पाहिजे तितका चहा उपलब्ध आहे !
अल्पसंख्याक बांधवांनी स्वतःचे वेगळे स्टॉल उभे केले असून त्यात वेगळे पदार्थ पुरवले जातात !
ह्याने शीख-अल्पसंख्याक एकोप्याचे छान चित्र उभे केले जाते!!
फक्त भारतीयच नाही तर इटालियन पिझा देखील सर्व्ह केला जात आहे !
कोणता किसान पिझ्झा खातो असे प्रश्न विचारल्यास तुम्हाला महाराष्ट्र सॉरी पंजाब द्रोही घोषित केले जाईल 😡
मध्यरात्री भूक लागल्यास चॉकलेट बिस्किटे उपलब्ध करण्यात येते ! काहीच काळजीचे कारण नाही ✌️
एवढे खाल्ल्यावर प्यायला बिस्लरीचे पाणी उपलब्ध करण्यात येते किमान 10 रुपयांच्या बाटलीचा खर्च कोण उचलते असे प्रश्न विचारल्यास मुस्काट फोडण्यात येईल 😡
एकंदरीतच जेवणाची चंगळ असून ह्या चळवळी मागचे अर्थकारण राजकारण समजून न घेता फक्त समाजकारण लोकांनी पहावे ही आंदोलकांची इच्छा आहे !
You can follow @khadaksingh_.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.