रायगड हा महाराष्ट्रातील असा एक किल्ला आहे ज्यातील वास्तूंविषयी आज बरेच(खूप बरेच) गैरसमज आहेत. या उत्तरात वास्तूंविषयी माहिती देताना मी ते गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करीन.

सुरवात करण्याआधी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की,

संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर म्हणजेच १६८९ साली हा-
किल्ला मुघलांनी जिंकला होता. १६८९ ते १७०७ पर्यंत रायगड मुघलांच्याच ताब्यात होता. सुरसिंग आणि शंभुसिंग नावाचे २ भाऊ रायगडाचे व पाचाडचे किल्लेदार होते. पुढे १७०७ मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर हा किल्ला मुघलांनी जंजिऱ्याच्या सिद्दी ला देऊन टाकला.
सिद्दींकडे हा किल्ला तब्बल ४५ वर्ष ताब्यात होता. नानासाहेब पेशव्यांनी पुढे किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर १७८७, १७९६, १८०९ या तीन साली रायगडावर बांधकाम चालू असल्याचे उल्लेख आज आपल्याला मिळतात. मग पुढे १८१८ साली ब्रिटिशांनी किल्ला जिंकून घेतला.
त्यांनी १८८५ पर्यंत कोणालाही किल्ल्यावर येऊ दिले नव्हते. १८८५ साली जेम्स डग्लस आणि पुढे रिचर्ड टेम्पल नावाचे ब्रिटिश अधिकारी सर्वप्रथम किल्ल्यात गेले. मग वेगवेगळे भारतीय संशोधक जायला लागले.

हे सगळं सांगण्याचा उद्देश हा की मराठ्यानंतर तब्बल ६० वर्ष आणि पुढे ८० वर्ष हा किल्ला
स्वराज्यात नव्हता. त्यामुळे यावरची आज दिसत असलेली सगळी बांधकामं शिवाजी महाराजांच्याच काळातील होती हे आपण कधीही म्हणू शकत नाही.

⚫ राणीवासा (सहा महाल)

महाराजांच्या सदरेजवळ आज ही वास्तू आपल्याला राणीवासा म्हणजे महाराजांच्या ६ पत्नींची घर म्हणून दाखवली जाते. मुळात ही जागा कधीही-
राणीवासा नव्हती. हा एक अक्खा हॉल होता. या मधल्या पार्टिशनच्या ज्या ५ भिंती आहेत त्या नंतरच्या काळात बांधल्या गेल्या आहेत ज्यावेळी रायगड स्वराज्यात नव्हता. त्या ५ भिंती बांधून ६ खोल्या केल्या आहेत. फोटो मध्ये प्रत्येक खोली च्या बाहेर एक छोटीशी खोली दिसत असेल.
ती शौचालये आहेत. तशा प्रकारच्या शौचालयांची व्यवस्था(आज आपण त्यांना इंडियन टॉयलेट म्हणतो) मराठ्यांच्या काळात नव्हती. ती ब्रिटिशांनी भारतात आणली.

त्यामुळे हा राणीवासा कधीही राणीवासा नव्हता. नंतर कदाचित ब्रिटिशांनी ऑफिसेस किंवा (तुरुंग?) बनवण्यासाठी या हॉलच्या ६ खोल्या केल्या असे-
आपण म्हणू शकतो.

⚫ बाजारपेठ

या आजच्या बाजारपेठेत उजवीकडे २१ खोल्या आहेत आणि डावीकडे २२ खोल्या आहेत.

मुळात ही जागा कधीही बाजारपेठ नव्हती. ही बाजारपेठ होती असा कुठेही म्हणजे कुठेही समकालीन कागदात उल्लेख नाही. समकालीन कागदच काय, महाराजांनी रायगडावर शिलालेख लिहून घेतला.
ज्यात त्यांनी गडावर काय काय बांधकामं केली हे लिहिलं आहे त्यात बाजारपेठेचा कुठेही उल्लेख नाही. हा शिलालेख सध्या जगदीश्वराच्या मंदिरात आहे.

दुसरी गोष्ट ही की या बाजारपेठेच्या बांधकामातील इमारतीचे जे मूळ जोते आहे तेच फक्त शिवकालीन आहे. जोत्यावरील सगळ्या बांधलेल्या भिंती,
खोल्या या शिवकालीन नाहीत. उत्तरकालीन आहेत. तिसरी गोष्ट, कोणत्याही गडावर सामान्य जनतेला कधीही विनाकारण प्रवेश नव्हता त्यामुळे गडावर एवढी मोठी बाजारपेठ असण्याचं कारणही नव्हतं.

⚫ लोहस्तंभ

या लोहस्तंभविषयी आज ३ गोष्टी प्रचलित आहेत.

हा स्तंभ संभाजी महाराजांचा मल्लखांब होता.
हा स्तंभ सुर्यघटी होती. म्हणजे सूर्याच्या प्रकाशावरून दिवसा वेळ मोजण्याचे साधन.

हत्तीना बांधण्यासाठी या स्तंभाचा उपयोग व्हायचा.

या तीनही गोष्टी अतार्किक (illogical) आहेत.

1) हा स्तंभ संभाजी महाराजाचा मल्लखांब होता.

मुळात मल्लखांब कधीही लोखंडी नसतो. त्यामुळे हा तर्क इथेच पडतो.
आणि तसाही हा मल्लखांब होता याचा कोणत्याही समकालीन कागदात उल्लेख येत नाही.

2)  हा स्तंभ सुर्यघटी होती. म्हणजे सूर्याच्या प्रकाशावरून दिवसा वेळ मोजण्याचे साधन.

= शिवाजी महाराजांच्या काळी वेळ मोजण्यासाठी घटिकपात्रे होती त्यामुळे असे स्तंभ उभारण्याची गरजच नव्हती. आणि जरी हा स्तंभ
सूर्यघटी म्हणून बांधला असता तर तो रायगडावर होळीच्या मैदानातजिथे दिवसातून भरपूर वेळ ऊन असतं तिथे न बांधून इथे जिथे हिवाळ्यात अगदी १० वाजेपर्यंत सूर्यप्रकाश पडत नाही तिथे का बांधला?

3) हत्तींना बांधण्यासाठी या स्तंभाचा उपयोग व्हायचा.

= मुळात हत्ती हा प्राणी डोंगरी गडावर आणला
जायचाच नाही. कारण गड चढणीला कठीण असायचा आणि हत्तींना गडावरचे वातावरण सहजा झेपत नाही. राज्यभिषेकाच्या वेळी सुद्धा जो हत्ती गडावर आणला होता तो राज्याभिषेकानंतर लगेच १४-१५ दिवसांनी मेला. त्यामुळे 'हत्तींना बांधण्यासाठी या स्तंभाचा उपयोग व्हायचा' या तर्काचेही इथे खंडन होते.
तर मग हा स्तंभ कशासाठी वापरला जायचा?

याचे काही उल्लेख सापडत नाहीत परंतु आर्किओलॉजिस्ट्स च्या मते हा स्तंभ कैद्यांना बांधून त्यांना फटके मारण्याच्या कामात वापरला गेला असावा. आपण जर नीट स्तंभाकडे बघितलेत तर वरती एक कडं दिसतं त्या कडातून दोरी सोडली जायची आणि
कैद्यांना त्या दोरीने बांधून फटके दिले जायचे.

एव्हढच काय तो या लोहस्तंभाचा उपयोग केला जाऊ शकत असावा.

⚫ जगदीश्वर मंदिर.

रायगडावर शिवसमधीजवळ जे मंदिर आहे त्या मंदिराला आज जगदीश्वर मंदिर म्हणतो. मुळात या मंदिराचे नाव जगदीश्वर मंदिर नसून वाडेश्वर मंदिर आहे.
मग जगदीश्वर हे नाव कसं पडलं? वर उल्लेख केल्याप्रमाणे मंदिरात जो शिलालेख आहे त्याची सुरवात अशी आहे की 'प्रासादो जगदीश्वरस्य..' हे वाचून लोकांनी हे मंदिर जगदीश्वराचे असं ठरवून टाकलं.

मुळात, हा शिलालेख जो आज मंदिरात आहे तो इकडे नव्हता. पुढे गड जेव्हा स्वराज्यात नव्हता तेव्हा कोणी-
इकडे आणून लावला असेल.

शिलालेख देवनागरीतच आहे. सुरवात 'प्रासादो जगदीश्वरस्य..' अशी आहे. इकडे जगदीश्वरस्य हे छत्रपती शिवाजी महाराजांना उद्देशून म्हटलं आहे. प्रासाद म्हणजे महाल/घर. जगदीश हे बरेचदा राजाला उद्देशून म्हटले जाते. त्यामुळे जगदीश्वर हे मंदिराचे नाव नाही तर
छत्रपती शिवाजी महाराजांना उद्देशून म्हटलं आहे. अनेक पत्रात मंदिराचे वाडेश्वर असेच नाव दिसून येते.

हा शिलालेख आणि त्याचे भाषांतर देत आहे.
२६ जुलै १७८८ साली पेशव्यांकडून या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. त्या पत्रातही मंदिराचे नाव जगदीश्वर नसून श्रीवाडेश्वर असेच आहे.

⚫ पाचाड

आज आपण पाचाड मध्ये जाऊन फक्त आऊसाहेब जिजाबाईंनी समाधी पाहून येतो. पाचाडचा किल्ला कोणीच पाहत नाही. परंतु सत्य हे आहे की तो किल्ला महाराजानी-
फक्त जिजाबाईंसाठी बांधला नव्हता. महाराजही राहत होते तिकडे. महाराज त्यांच्या आयुष्यात रायगडापेक्षा जास्त काळ या पाचाडचा किल्ल्यात राहिलेत.

लेखक - ओंकार ताम्हनकर
You can follow @ShriRajTripute_.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.