कौतुक कसले व कोणाचे करायचे? - भाऊ तोरसेकर
अजाणत्या बारामतीकराचे फाजील कौतुक आता जनतेने आणि लाळघोट्या मीडियाने थांबवले पाहिजे.
तपशील सोडला तर कुठलाही भुलभुलैया उभा करता येत असतो.
(1/14)
अजाणत्या बारामतीकराचे फाजील कौतुक आता जनतेने आणि लाळघोट्या मीडियाने थांबवले पाहिजे.
तपशील सोडला तर कुठलाही भुलभुलैया उभा करता येत असतो.
(1/14)
१९८० साली जुन्या जनसंघाचे भाजपात रुपांतर झाले आणि त्यातला त्यांचा जवळपास कोणीही नेता आज राजकारणात उरलेला नाही. पण स्थापनेपासून अवघ्या काही महिन्यातच विधानसभेची निवडणूक लढवताना भाजपाला १५-१६ जागा कशाबशा मिळालेल्या होत्या.
(2/14)
(2/14)
पवारांच्या समाजवादी कॉग्रेसला ५५ आमदार मिळालेले होते. तेच पवार आज राष्ट्रवादी म्हणून ५६ आमदारांवर आहेत आणि तोच भाजपा आज १०५ आमदारांपर्यत पोहोचला आहे. कौतुक कसले व कोणाचे करायचे?
ज्या वयात किती पावसाळे बघितले, म्हणून नवोदितांना अनुभव सांगायचे,
(3/14)
ज्या वयात किती पावसाळे बघितले, म्हणून नवोदितांना अनुभव सांगायचे,
(3/14)
. त्या वयात पवार पावसात भिजून भाषण करतात आणि ५६ आमदार निवडून आणतात. किती मोठा पराक्रम आहे ना? जेव्हा पवारांनी पक्ष स्थापन केला तेव्हा बंगालच्या ममता बॅनर्जी राजकारणात आल्याही नव्हत्या किंवा चंद्राबाबूंचा तेलगू देसम पक्ष स्थापनही झाला नव्हता.
(4/14)
(4/14)
आणखी मजेची गोष्ट म्हणजे शिवसेना हा पक्ष मुंबई ठाण्यापलिकडे फ़ारसा पसरला नव्हता आणि पुणे नाशिकातही त्याचे नगण्य अस्तित्व होते. मुंबई महापालिकाही एकट्याने जिंकण्याचा मनसुबा सेनेने कधी बाळगलेला नव्हता. तिथून आज सेना कुठवर पोहोचली आहे?
(5/14)
(5/14)
आज बाळासाहेब हयात नाहीत आणि उद्धव ठाकरे सात वर्षे सेनेची सुत्रे हलवित आहेत. त्यातूनही राज ठाकरे बाजूला झाले व त्यांनी वेगळी चुल मांडली आहे. अशा सेनेलाही आज ५७ आमदार निवडून आणणे शक्य झाले आहे आणि पवार कुठे आहेत? ३९ वर्षानंतरही पवार पन्नाशीत अडकून बसले आहेत.
(6/14)
(6/14)
त्यासाठीही कॉग्रेस किंवा अन्य पुरोगामी पक्षांच्या कुबड्या घ्याव्या लागत आहेत. जग इथले तिथे होऊन गेले आणि पवार मात्र पन्नाशीत अडकून पडले आहेत. गेल्या खेपेस एकट्या बळावर उद्धव ठाकरे यांनीही ६३ आमदारांचा पल्ला गाठून दाखवला. पवारांना तितके स्वबळ कधी सिद्ध करता आले आहे काय?
(7/14)
(7/14)
मोजपट्टी कुठली असते? पावसात भिजण्याची की आमदार खासदार निवडून आणण्याची?
कॉग्रेस सोडून आपली वेगळी चुल मांडणारे पवार एकटेच नेते नाहीत. ममता बानर्जी, जगनमोहन रेड्डी असे अनेक आहेत. त्यानी आपापल्या राज्यात किती मोठा पल्ला गाठला आहे? त्याचे भान तरी पवार प्रशंसकांना आहे काय?
(8/14)
कॉग्रेस सोडून आपली वेगळी चुल मांडणारे पवार एकटेच नेते नाहीत. ममता बानर्जी, जगनमोहन रेड्डी असे अनेक आहेत. त्यानी आपापल्या राज्यात किती मोठा पल्ला गाठला आहे? त्याचे भान तरी पवार प्रशंसकांना आहे काय?
(8/14)
बंगालमध्ये डाव्यांशी कॉग्रेस समर्थपणे लढत नाही म्हणून तृणमूल या नव्या पक्षाची स्थापना ममता बानर्जींनी केली. त्यांनी १९९८ सालात प्रथमच वेगळा पक्ष स्थापला आणि पवारांप्रमाणेच त्यांच्याभोवती कॉग्रेसचे कंटाळलेले कार्यकर्ते दुय्यम नेते एकत्र येत गेले.
(9/14)
(9/14)
२००६ सालात ममतांनी बंगालमध्ये विरोधी पक्ष होण्यापर्यंत मजल मारली आणि २०११ सालात त्या थेट बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या. एकहाती विधानसभेत बहूमत संपादन केले. २०१६ मध्ये तर त्यांनी अधिक बहूमताने विधानसभा जिंकली आणि आज बंगालमधून डावी आघाडी नामशेष होऊन गेली आहे.
(10/14)
(10/14)
२००४ साली आंध्रप्रदेशात राजशेखर रेड्डी या कॉग्रेस नेत्याने तेलगू देसमकडून सत्ता हिसकावली आणि २००९ साली पुन्हा एकहाती बहूमत संपादन केले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचाच सुपुत्र कॉग्रेसमधून बाजूला झाला आणि दहा वर्षात आपल्या एकट्याच्या बळावर आज आंध्रामध्ये बहूमत संपादन केले
(11/14)
(11/14)
ममता किंवा जगनमोहन तसे तरुण पण त्यांच्यात संयम व मुरब्बीपणा आहे, तो पवारांमध्ये नाही. राज्यात आपला ठसा उठवता आला नाही. नुसत्या कसरती व कोलांट्या उड्या मारण्यात पन्नास वर्ष उलटून गेली. आज त्यांचे पावसात भिजणे ज्यांना कौतुकाचे वाटते, त्यांच्या बुद्धीची कीव करावी तितकी थोडी.
(12/14)
(12/14)
१९८० ला ५५ व २०१९ ला ५६ आमदार. एकाच वर्गात मुलगा चाळिस वर्षे बसला व शेजारची मुले मात्र शाळा कॉलेज करून परदेशात पोहोचली. तरी पोराचे गुणगान चालू. पवारांच्या गुणवत्ता व मुरब्बीपणाचे कायम गुणगान करणार्या आणि त्याच पावसात कायम चिंब भिजलेल्यांना यापेक्षा अधिक काय सुचणार आहे?
(13/14)
(13/14)
चाळीस वर्षांनी एक विद्यार्थी कुठे पोहोचला, त्याची कसोटी कशी लावायची असते?
२००२ साली निवडणूकीच्या राजकारणात उतरून 12 वर्षे गुजरातचा मुख्यमंत्री व गेली 6 वर्षे देशाचा पंतप्रधान झालेल्या नरेंद्र मोदींची निंदानालस्ती करण्यात आपली बुद्धी खर्ची घालणारे, म्हणून धन्य आहेत.
(14/14)
२००२ साली निवडणूकीच्या राजकारणात उतरून 12 वर्षे गुजरातचा मुख्यमंत्री व गेली 6 वर्षे देशाचा पंतप्रधान झालेल्या नरेंद्र मोदींची निंदानालस्ती करण्यात आपली बुद्धी खर्ची घालणारे, म्हणून धन्य आहेत.
(14/14)