

संगीतातले फारसे कळत नसलेला माणूसपण गप्पा न च्या ओघात राग मालकंस चे नाव घेऊन मोकळा होतो.सहज महिती घेतली तर माझी आवडती गाणी राग मालकंस वर आधारीतच निघाली मला जे आवडले ते शेयर करतो आहे .चित्रपट बैजू बावरा 1952 त्यातले मन तडपत हरी दर्शन को आज हे भजनरुपी गाणे ,याचे 1/2
विशेष म्हणजे गीतकार शकील बदायुनि जन्म 1916 बदायुन / गायक रफी जन्म 1924 पूर्व पाकिस्तान / संगीत नौशाद जन्म 1919 लखनौ तिघेही पारंपरिक मुस्लिम घरात जन्म झालेले .समवयस्क म्हणून तिघेही जिगरी दोस्त .त्यात शकील बदायुनि आणि रफी अल्पायुषी ठरलेत शकील भाई 52 व्या वर्षी TB ने तर रफी 1/3
55 वयात हृदयविकाराने गेलेत.नौशाद 75 वय होऊन वार्धक्य पाहून गेलेत .तिन्ही ही मित्रां चे मुंबईतच निधन झाले .शकील भाई आणि रफी ची जोडी "ओ दुनियाके रखवाले सुनो दर्द भरे / सुहानी रात ढल चुकी ना जाणे तुम कब आओगे या सारखी गाजलेली गाणी देत असतानाच नियतीने या दोघा तिघांना दूर केले आणि 1/4
रसिकांना चांगल्या गाण्यांना मुकावे लागले .भजन म्हणतांना रफी च्या आवाजात एक आर्तता असायची ,आळवणी असायची ,त्याचे भजन म्हणजे प्रार्थना असायची म्हणून ती वेगळ्या उंचीवर गेलीत जसे की "सुख के सब साथी दुःख मे ना कोई " अगदी मराठील ले "शोधिसी मानवा राऊळी मंदिरी "हेआठवा रफी शिवाय दुसरा 1/5
कोणी आपल्याला या गाण्याचा गोडवा देऊच शकणार नाही .शकील बदायुनि ,रफी ,नौशाद यांनी फाळणीचा रक्तरंजित इतिहास डोळ्यांनी पहिला अनुभवला पण तो आपल्या संगीतात जाणवू दिला नाही आणि भजनात तर नाहीच नाही .मागच्या दोन वर्षांपूर्वी जुहू च्या कब्रस्तानात जागा कमी म्हणून काही भाग खोदण्यात आला 1/6
त्यात रफी आणि मधुबाला यांच्या कबरी नकळत जमीनदोस्त झाल्यात तिथे त्यांची आठवण म्हणून नारळाचे झाड लावण्यात आले आहे.गाण्याच्या शेवटच्या कडव्यात "मोहें दर्शन भिक्षा दे दो आज " म्हणणारा रफी त्या झाडाखाली बसलेला असेल का ? मला आज कोणी विचारले तुझे आवडते गाणे कोणते तर मी नकीयच हक्काने 1/7
सांगेल की मला आवडतो तो रफी ने गायलेला ,
मालकंस 


