केलाडी चेन्नम्मा
ही एक अशी राणी होती .जीने अनेक शत्रूंना धूळ चारली. पण लवकरच तिला मोठ्या धोक्याचा सामना करावा लागला .औरंगजेब त्यावेळी मुघल सम्राट होता.'आलमगीर'हे त्याचं शीर्षक होत.आलमगीर म्हणजे संपूर्ण जगावर विजय मिळवणारा.
औरंगजेबानं उत्तर भारतातली बरीच राज्य मिऴवली.आणि त्यांन त्याची नजर दक्षिणेकडे वऴवली.त्यात ही या केलाडी सारख्या छोट्या राज्यावर. कारण ही तसचं होत.छ.शिवाजी महाराजांच्या मुलाला राणीने आश्रय दिला.पण राणी घाबरली नाही.शूर स्त्रीनं हल्लयाचा सामना केला.
ही राणी म्हणजे वीर आणि उदात्त स्री केलडीची राणी चेन्नम्मा .या राणीनं पंचवीस वर्ष राज्य केलं
चमकदार डोळे आणि विस्तृत कपाळ,आणि मोत्याचा रंग ,लांब नाक आणि कुरळे केस.हे रूपविशेष एखाद्या शाही स्री ला लागू पडतात ते सगळे तिच्याकडे होते.
सुमारे 1645 मध्ये सक्षम राजा शिवाप्पा नायक गादीवर आले.प्रशासकीय सुधारनानमुळे हा राजा एक महान शासक म्हणून प्रसिध्द झाला .शासन आणि करवसुली शिस्तबध्द केली गेली की त्याला 'शिस्तिना शिवप्पा ' नायका म्हणून ओळखलं जाऊ लागलं .या राजाचा लहान मुलगा ,सोमशेखर नायक.
1664 मध्ये राजा झाला,सोमशेखर नायक हा कुशल राजा होता पण धार्मिक मनाचा होता.याने अनेक वर्षे लग्न केलं नाही.अत्यंत देखणे,सदगुणी आणि शूर म्हणून प्रसिध्द असलेल्या या राजाला अनेक राजे जावई करून घेण्यास उत्सुक होते.+
एकदा राजे ,रामेश्र्वरा जत्रेत गेले होते.तेथे त्यांना एक सुंदर मुलगी दिसली. ती चेन्नम्मा होती.काळजीपूर्वक एखाद्या कारागिरांने रेखीव बाहुली बनवावी तशी सुंदर.राजा पहाताक्षणी निश्चय केला लग्न करीन तर हिच्याशीच.आपल्या हेरांनकरवी त्यांनी माहिती काढली
दुसर्या दिवशी त्यांना मुंख्यमंत्र्यांना बोलावलं ,सगळी हकिकत सांगितली. मुंख्यमंत्र्यानी उत्तर दिलं ..हे प्रभू आतापर्यंत केलडीच्या सर्व राजांनी फक्त रक्तानी राजकन्या असलेल्या मुलीशींच लग्न केलं आहे. पण राजा ऐकायला तयार नव्हते.नाईलाज झाला मंत्र्यांचा.
मंत्री कोटापूर ला गेले .'राजाला तुमची मुलगी चेन्नम्मा सोबत लग्न करायचं आहे ' या शब्दांवर सिध्दाप्पा शेट्टी चकित झाले.त्यांचा कानावर विश्वास बसेना .पण आनंदानी ते तयार झाले.राजधानी बिदानूर येथील राजवाड्यातील भव्य दरबारात शाही इंतमामात लग्नसोहऴा पार पडला.
चेन्नम्मा केलडी राज्याची आणि सोमशेखर नायकांच्या मनाची राणी बनली.सोमशेखर आणि राणी चेन्नम्मा यांचे वैवाहिक आयुष्य दूध आणि मध एकत्र ठेवण्यासारखं होत.हुशार राणी अल्पावधित राजकारण आणि शस्र विद्येत पारंगत झाली.संगीत शिकली,साहित्यात प्रभुत्व मिळवलं .
राणी स्वताच्या मुलाप्रमाने प्रजेची आणि राजवाड्यातील कर्मचारांची काऴजी घेत होती दृष्टांना शिक्षा आणि संदगुणाचे रक्षण या तिच्या विशेष गुंणानमुळे लोक तिला देवी मानू लागले. विजयनगर राजांच्या काऴात दसरा मोठा उत्साही राष्ट्रीय उत्सव होता .केलडीच्या राजांनी ती परंपरा ठेवली.
या 'नादहब्बा ' च्या दिवसात अनेक नर्तन व संगीताचे कार्यक्रम होत.जांबुखडीची प्रख्यात नर्तकी कलावती हीने या उत्सवा दरम्यान राजावर मोहिनी घातली.तिचे पालक भारमे मावुत काळ्या विद्या आणि गुप्त औषधांचे जाणकार होते.यांचा वापर करून त्यानी सोमशेखर वर नियंत्रण मिळवलं
चेन्नम्माला खूप वाईट वाटलं.राज्यात अराजकता पसरली.राजाला मूलबाऴ नव्हत्.अन्क लोक कट रचू लागले..राणीने या सगळ्याचा विचार करून आपला स्वाभिमान बाजूला ठेवून,त्या नर्तकीच्या घरी राजाला आणण्यासाठी गेली.राजा निस्तेज झाला होता.राणीनं विनवणी केली.तुमचे वडील वीर शिवप्पा नायक
यांचे राज्य उधवस्त होत आहे ,तेव्हा राजवाड्यात चला.वैद्य तुमच्यावर उपचार करतील..पण राजा नर्तकीच्या अमंलाखाली होता.राजाने नकार दिला. राणी ने मग एक निर्णय घेतला . तिने बासप्पा नायक नावाच्या मुलाला दत्तक घेतले जेणेकरून राज्य टिकू शकेल.
पण या निर्णयाने अनेक मंत्री नाराज झाले.विजापूरचा सुलतान केलडीचे राज्य घेण्यास आसुसला होता..राणीने प्रजेला आवाहन केलं .हे कन्नड भूमीवरील माझ्या महान योध्यांनो राज्याला तुमची गरज आहे जिंकलात तर प्रत्येकांचा योग्य सन्मान केला जाईल.तिच्या शब्दांनी प्रेरित होऊन .
प्रजेने राणीला साथ दिली.यात दरम्यान नर्तकीचे वडीलांनी राजा सोमशेखर याचा खून केला.आपल्या नवर्याचा मु्त्यू नैसर्गिक नाही हे राणीला कऴलं याच दरम्यान विजापूर सैन्याने बिदानूर च्या किल्लयाला घेरलं .राणीच्या हितचितंकानी आणि वडीलांनी राणीला समजावलं
जरी आपण सर्व शक्तिनीशी लढा दिला तरी पराभव अटळ आहे.तेव्हा सद्य परिस्थितीत बिदनूर सोडा .भुवनगिरी येथील दाट जंगलातील वाज्यात राणी निघून गेली. मुख्यमंत्री थिम्मना नायक दत्तक घेण्याच्या वादातून राणीशी झालेल्या वादामुळे निघून गेले होते
राणीची अवस्था आणि देशप्रेमी असवेले थिमन्ना राणीला जाऊन भेटले.राणीने मोठ्या मनानी त्यांना माफ केलं त्यांनी केलदीच्या सर्वभागातील सरदार आणि सैन्यांना एकत्र करून बिदानूरच्या दिशेन कूच केलं याची धुरा प्रत्यक्ष राणीनं वाहिली.
केलदी ताब्यात घेतली परत.तेथील लोकांनी राणीला शासक म्हणून स्विकारलं .आपल्या पतीच्या खुन्यांना राणीनं ठार केलं.तिनं 'अग्रहरा'नामक एक वास्तू बांधली जिथे राज्यांतील विविध विषयातील अभ्यांसकाना राहण्यास आमंत्रित केलं
एकदा नेहमीप्रमाने राणी दानधर्म करात असताना चार जंगमार (भिक्षू )राणीला दिसले .ते खूप तेजस्वी होते .राणीच्या नजरेनं हेरलं ,हे भिक्षू नसावेत.राणी त्या भिक्षूना म्हणाली .महोदय.मी तुमच्यासाठी कायकरू शकते. तुम्ही कुठून आलात हे सांगाल का..त्याव र ते भिक्षू म्हणाले
राणी मी संन्याशी नाही,मी छत्रपती शिवाजी महारांजाचा मुलगा राजाराम आहे .राणी चकित झाली.तुम्ही दक्षिण हिंदूस्थानात हिंदूत्व वाचवण्यासाठी संघर्ष करणारे महान पुरूष छत्रपती शिवाजी यांचे पुत्र आहात? .राणीनं नमस्कार करून योग्य पाहुणचार केला व येण्याचे कारण विचारलं
राजाराम महाराज म्हणाले, हे आई, माझे भाऊ संभाजीची औरंगजेबाने हत्या केली आणि आता मला मारण्यासाठी सैन्य पाठवलं आहे .मी पकडलो गेलो तर संपूर्ण राज्य जाईल.म्हणून मी असा चकवा देत फिरत आहे.पाणीनं प्रश्न केला .हिंदू राजे तुमचे रक्षण करण्यास सहमत नव्हते का? राजेंनी उत्तर दिलं
औरंगजेबाशी वैर घ्यायला कुणी तयार नाही.राणी बोलली ,राजकुमार राजाराम हे अविश्वसनीय आहे,हिंदूत्व वाचविण्यासाठी लढवय्ये ठरलेल्या महाराजांच्या मुलाला आश्रय देण प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि मी माझ कर्तव्य म्हणून तुम्हाला साथ देणार आहे
तरीही राजाराम महाराज बोलले,राणी माझ्यामुळे तुम्हाला त्रास होईल औरंगजेबाचा.राणी आपल्या मतावर ठाम राहिली..राणीनं राजापाम महाराजांना जिंजी ला पोचवण्याची जबाबदारी घेतली .राजाराम महारांजानी राणीला नमस्कार करून बोलले . अनेक मोठणोठ्या राजांनी नकार दिला असताना एका महिलेने असं धाडस
दाखवणे .माझाा मुजरा स्विकारावा..मंत्री थिमन्ना बोलले ,ही अहंकारी औरंगजेबाची फौज महारांजाचा पाछलाग करत आहेय.रायगड ,पन्हाळगड इतर किल्ले केव्हाच ताब्यात घेतले आहेत.औरंगदेबालाजर कऴलं आपण मदत केली तर आपला अंत अटळ आहे
राणी आपल्या मतावर ठाम राहिली,औरंगजेबाला ही बातमी कळाली त्याचा मुलगा अलमथ आरा आक्रमण करून आला.उत्तरेकडच्या कोरड्या वातावरणाची सवय असलेल्या मुघल सैन्याला ,माईनाड सारख्या अतिवृष्टि असलेला जगंलात युध्द करणं जड गेलं .कर्नाटक च्या नायकांनी मुघल सैन्याची तुफान कत्तल केली.
समोर अश्वारूढ राणी चेन्नम्मा हातातलतलवार घेवून उभी होती..असमथ आरा बुचकाळ्यात पडला की समोर लढायला गेलो तर पराभव निश्चित आहे आणि तो ही एका स्री च्या हातून तेवढ्यात त्याच्या हेरांनी बातमी दिली.की राजाराम महाराज जिंजीला पोहचले आहेत तेव्हा केलाडी सोडून जिंजीला जावं
औरंगजेबा बरोबरच्या युध्दात निर्णायक विजयाचा मोठा सन्मान कर्नाटकातील नायिका बहादूर चेन्नम्मा चा आहे.जिंजीला पोचलेल्या राजाराम महारांजानी पत्र लिहलं.
जेव्हा मोठ्या राज्यांनी मदत करण्यास नकार दिला ..हे आई तू धैर्याने मला आश्रय दिला .तुझे हे शौर्य आणि औदार्य मी कधीही
विसरणार नाही. देवी भवानी तुम्हाला सर्व सुख प्रदान करो .राणीनं ह्यात असेपर्यंत हिँदू धर्माचं रक्षण केलं मंदिर बांधली मठाना दानधर्म केला..मृत्यू शय्येवर असताना आपल्या दत्तक मुलास सांगितलं.केलदीच्या राज्यांचं रक्षण करा .संताच्या म्हण्ण्यानुसार आचरण ठेवा
आपलं भाषण नेहमी मोत्याच्या तारे प्रमाणे असू द्या. अशा या धार्मिक सदगुणी शूर राणीने हिंदू धर्माच्या पवित्र महिना श्रावण .या महिन्यात शेवटचा श्वास घेतला. कर्नाटक आणि हिंदूस्थानाच्या इतिहासात केलदीच्या शूर राणीचे नाव सूवर्ण अक्षरांनी लिहलं आहे
ज्यांना धैर्य ,स्वराज्यआणि कुलीनपणा आवडतो त्यांच्यासाठी राणीचे जीवन प्रेरणादायी आहे.
वरील माहिती मी शांतादेवी मालवाड यांच्या पुस्तकातून घेतली आहे..
जय हिंद .🚩🙏
You can follow @real_amruta.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.