❝Most Deadliest Species- Humans❞

कोथरूडच्या एक गवा घुसला, लोक त्याच्या मागे धावले, तो गवा धाऊन धाऊन दमला शेवटी त्याच्या हृदयावर ताण येऊन तो मेला.
पण प्राण्यांना संपवणे हे इतिहासात काही पहिल्यांदा झालेलं नाही. मुळात प्राण्यांच्या जमाती संपवणे ही माणसाची सगळ्यात सवय मोठी आहे.
पहिले मानव आफ्रिकेत जन्माला आले आणि वाढले. Cognitive Revolution होईपर्यंत ते आफ्रिका-आशियापर्यंतच मर्यादित होते. त्यांना अमेरिका, न्यूझीलंड किंवा आॅस्ट्रेलियासारख्या दूरवरच्या प्रदेशात जाता आलं नाही. मानव या प्रदेशात पोहोचले नाही यामुळे असंख्य प्राणी या ठिकाणी उत्क्रांत होत गेले.
हजारो वर्षांनंतर मानवाने नौकेचा शोध लावला असावा. त्यामुळे तो आॅस्ट्रेलिया सारख्या बेटांवर पोहोचू शकला. ४५००० वर्षांपूर्वी आफ्रिकेतून निघून आॅस्ट्रेलिया सारख्या कितीतरी लांब बेटावर पोहोचणे ह्या घटनेला कोलंबस अमेरिकेत पोहोचणे किंवा अपोलो ११ यान चंद्रावर पोहोचण्याएवढंच महत्त्व आहे.
Cognitive Revolutionमुळे आफ्रिकेतला मानव उत्क्रांत झालेला होता आणि तो जेव्हा आॅस्ट्रेलियात पोहोचला तेव्हा तिथल्या सगळ्या प्राण्यांपेक्षा तो बुद्धिमान होता. त्यामुळे तो पोहोचताचक्षणी अन्नसाखळीमध्ये सर्वात वरच्या स्तरावर गेला. आणि मग इथून अन्य प्राण्यांच्या विनाशाची खरी सुरवात होते
त्यावेळी आॅस्ट्रेलियात २००-२०० किलो वजनाचे कांगारू, पोटाला कांगारूप्रमाणे मार्सुपिअल सिंह, अवाढव्य कोआला, शहामृगापेक्षा दुप्पट आकाराचे पक्षी, सरडे, ५-६ मीटर लांब साप, डिप्रोटोडोन आणि जवळपास अडीच टन वजनाचे वाॅमबॅट यासारखे लाखो लहानमोठे प्राणी लाखो वर्षांपासून हे तिथे राहत होते.
मानव तिथे पोहोचण्याच्या काही हजारो वर्षांतचं हे अवाढव्य प्राणी नष्ट झाले. ५०टनापेक्षा अधिक वजन असणाऱ्या २४ पैकी २३ जमाती नामशेष झाल्या. लहान प्राणांच्या जमातीही नष्ट झाल्या. अन्नसाखळी तुटली आणि अजून प्राणी नष्ट झाले.
अशाच प्रकारे मानव जेव्हा आर्क्टिक महासागरातल्या रॅंगल बेटावर पोहोचले तेव्हा लाखो वर्षांपासून सुखाने जगात असलेले महाकाय हत्ती काही हजार वर्षांत नष्ट झाले.

आता प्रश्न उरतो तो सेपियन्स एखाद्या ठिकाणी पोहोचल्यामुळे इतर प्राण्यांच्या जमाती कशा नष्ट झाल्या?
याची तीन कारणे आहेत.
१)बुद्धीमत्तेच्या जोरावर सापळे रचून आणि युक्त्या करुन
मोठे प्राणी मारणे
२)आगीचा शोध आफ्रिकेतंच लागल्यामुळे आॅस्ट्रेलियात पोहोचल्यावर अन्नासाठी जास्त भटकावे लागू नये म्हणून संपूर्ण जंगलाला आग लावून देणे.
३)अन्नसाखळी मोडून पडल्याने ती पुन्हा तयार होईपर्यंत तिच्यावर अधिराज्य गाजवणे
सेपियन्स पुढे अमेरिका खंडात पोहोचल्यानंतर दोन हजार वर्षांच्या आत हत्तींच्या ४७ पैकी ३४ जाती नष्ट झाल्या. दक्षिण अमेरिकत ६० पैकी ५० प्राण्यांच्या प्रजाती नष्ट झाल्या. यात हत्ती, घोडे, उंदीर, सिंह, उंट आणि लहान लहान किटक यांच्या प्रजाती होत्या.
यानंतर सेपियन्सचा वरवंटा मादागास्कर, सोलोमन, न्यूझीलंडसारख्या बेटांवर फिरला आणि तिथल्या असंख्य प्रजाती नष्ट झाल्या.

कित्येक वर्षे सेपियन्सनी फक्त जमीनीवरच्या प्राण्यांच्या जमाती संपवल्या. पुढे औद्योगिक क्रांती झाली, सागरी मार्गाचा वापर सुरू झाला आणि पाण्यातले प्राणीही संपू लागले
हा सगळा इतिहास पाहता "आमचे पूर्वज पर्यावरण प्रेमी होते" यासारख्या भंपक कथांवर विश्वास ठेवणे आणि पसरवणे बंद केले पाहिजे.

असंच चालू राहिलं तर काय होईल?
नैसर्गिक स्रोतांच्या अतिवापरामुळे बऱ्याच जाती आधीच नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर आहेत.
आणि याच वेगाने प्राणी नष्ट होत राहिले तर येत्या काळात देवमासे, शार्क, डाॅल्फिनही संपून जातील आणि मग पृथ्वीवर उरेल फक्त मानव आणि गुलामाप्रमाणे वागवले जाणारे प्राळीव प्राणी.

संदर्भ- सेपियन्स, युवाल नोआ हरारी
________

रोहन
You can follow @rohanreplies.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.