भारतीय जनता पार्टीचे आज व मागच्या सहा वर्षापासुनचे मुख्य टार्गेट १७ ते २४ ची तरुण मुले-मुली आहेत. या दरम्यान या तरुणापर्यंत मोठ्या प्रमाणावर whats appच्या माध्यमातुन मुस्लीम द्वेष , काँग्रेसने काहीच केलं नाही, देश लुटला , इ. मोठ्या प्रमाणावर पसरवण्यात येत व ते यात यशस्वी होतात.

या तरुणांचा मेंदू भयकंर हँन्ग करुन ठेवतात त्यामुळे त्यांना विचारही करावासा वाटतं नाही की , ज्या देशात रस्ते नव्हते , मुबलक धान्य नव्हते ,शाळा, काँलेज , कंपन्या , दुरदर्शन, दळणवळण साधणे, कँम्पुटर ,वीज, दवाखाने कित्येक वाड्या वस्तीवर काहीच नव्हते ते निर्माण कसे झाले व कोणी केलं?

या मुलांना विचारही करावासा वाटतं नाही की , आमचे वडील कुठे शिकले व कसे शिकले तेंव्हाची परिस्थिती कशी होती ? तेंव्हा रोजगाराची साधन काय होती ? लोकांना हाताला काम नव्हतं तर लोक कसे जगायचे ? मग हळुहळु प्रगत कशी झाली व कोणी केली ? या मुलांनाकाहीच विचार कसे करावासा वाटतं नाही.

या मुलांना अस वाटतं मोदी आले अन् जगच बदललं. सगळं काही मोदीच करतोय.! अरे मित्रांनो मोदी ही व्यक्ती आयत्या बिळावर बसलेला नागोबा आहे. उलट काँग्रेसने निर्माण केलेल्या सोप्यावर बसला व कित्येक कंपन्या मोदींनी विकल्या. बरं तरुणांनी असा विचार करणे समजु शकतो , तरुणांच वाचन नसेल.
पण,
पण,

कित्येक पावसाळे बघितलेल्या लोकांनाही मुलांसारखं विचार करतांना , प्रश्न निर्माण करतांना प्रचंड वाईट वाटतं. अरे तुमच्या डोळ्यादेखत या देशाने प्रगती केली ना , मग काँग्रेसने काय केलं विचारतांना लाज कशी वाटतं नाही ? बरं चुकत कोण नाही. आधी काही टेक्नाँलाजी नव्हती ,

काँग्रेसने चुका केल्या असतील. काही लोकांनी स्वार्थासाठी चुकीचं केलं असेल पण म्हणुन काँग्रेसने ७० वर्षात काय केलं हे विचारतांना जरा तरी वाटु द्यायला हवी ना. असो भविष्यात जेंव्हा तुमच्या मुलांचे, नातवांचे प्रचंड हाल होतील, काही नैराश्यातुन आत्महत्या करतील तेंव्हा नरकात रडत बसायचं.