खाली काही फोटोज आहेत, ते नीट पहा, निरखून पहा, पुन्हा पून्हा पहा ! आणि विषय नीट समजून घ्या ...

यातला पाहिला फोटो आहे चेन्नईचा ... तामिळनाडू आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये गेली अनेक वर्षे कावेरी खोऱ्यातील पाण्याच्या वाटपावरून वाद पेटलेला आहे. 👇🏽
कावेरी पाणी व्यवस्थापन मंडळ स्थापनेची मागणी करत सुपरस्टार रजनीकांत, कमल हसन, संगीत दिग्दर्शक इलाई राजा, धनुष, सूर्या , नासेर यांच्यासह अनेक मोठी नावं 'एक ठोस भूमिका' घेत आंदोलनात उतरली .👇🏽
दुसरा फोटो - मुद्दा तोच - कावेरी पाणी वाटपाचा , स्थळ - बंगळूर, राज्य - कर्नाटक ! कन्नड चित्रपट सृष्टीतले पुनिथ राजकुमार, शिवराजकुमार, दर्शन, रचिता राम, गणेश, उपेंद्र यांसारखे 'स्टार्स' आंदोलनात उतरले . 👇🏽
फोटो तिसरा - आधी ट्विटरवर अभिनेत्री कंगना रणौतला फैलावर घेणाऱ्या दिलजीत दोसांज या 'स्टार'ने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत थेट आंदोलन स्थळ गाठलं ! 👇🏽
फोटो चौथा आणि पाचवा - बॉलिवूड पासून थेट हॉलिवूड पर्यंत नाव असणाऱ्या अभिनेत्री प्रियांका चोपडाच्या ट्विट चा स्क्रीनशॉट आहे. 👇🏽
"शेतकरी भारताला अन्न धान्य पुरवणारे सैनिक आहेत. त्यांची भीती कमी करण्याची गरज आहे. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे आवश्यक आहे. एक मजबूत लोकशाही म्हणून आपण आपलं कर्तव्य आहे की लवकरात लवकर हे संकट दूर होईल" इतक्या स्पष्ट शब्दात तिने भूमिका घेतली. 👇🏽
पंतप्रधान मोदी माझ्या लग्नाला आले होते, मग मी कशाला संबंध बिघडवू ? हा विचार न करता प्रियंका ने ही भूमिका घेतली हे महत्वाचं !

आता माझा मुद्दा :-

मराठी कलाकार कुठे आहेत ?

बेळगाव मुद्द्यावर गेल्या काही वर्षात किती मराठी कलाकारांनी आंदोलनं केलीत ?

👇🏽
किती दिलजीत इतक्या उघडपणे कोणाच्या विरोधात बोलले ?

शेतकरी कायद्या बाबत पंजाबी कलाकार एक ठोस भूमिका घेताना दिसतात.

👇🏽
मराठी कलाकारांनी 'अमुक'च भूमिका घ्यावी असं माझं मत नाही, कोणाचंही नसावं! पण भूमिका घ्यावी! भलेही कृषी कायद्याला समर्थन असेल,तर करावं! राजकीय- सामाजिक विश्व कला-साहित्य विश्वापासून वेगळं असू शकत नाही. हे परस्परांशी निगडीत आहेत, यातूनच त्या-त्या क्षेत्राची संस्कृती वृद्धिंगत होते👇🏽
ज्या भूमीचे लोक आपल्यावर प्रेम करतात त्यांचे आपणही देणं लागतो हे त्यांनी लक्षात घ्यावं. इकडची किंवा तिकडची , कुठली का असेना भूमिका असावी ... ते जिवंतपणाचं लक्षण असतं ! ~ कमलेश सुतार
You can follow @praveengavit10.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.