महाराष्ट्रात भाजप समर्थक, काॅंग्रेस समर्थक, राष्ट्रवादी समर्थक किंवा शिवसेना समर्थक सोडले तर उरलेली जनता ही अराजकीय आहे. त्या अराजकीय जनतेपैकी सुद्धा बऱ्याचशा जनतेला सत्तेच्या जवळ राहणे सोईचे वाटते. मग सरकार कोणाचेही असो.
ही सत्तेच्या जवळ राहणारी जनता पाच वर्षांत बंड करत नाही.
उलट जे चालू आहे ते बरं चालू आहे अशाचं विचारांची असते. या जनतेने बंड करण्यासाठी सरकारने खूप मोठी चूक करणे गरजेचे असते. तशी काही चूक मागच्या एक वर्षात महाविकास आघाडी सरकारकडून झालेली नाही. उलट महाराष्ट्र भाजपच्या उत्तर भारत स्टाईल राजकारणावर ही जनता नाराज आहे.
सुशांत सिंग राजपूत प्रकरण असू देत नाहीतर Covid प्रकरणात रोज उठून केंद्राची बाजू घेणं असू देत. महाराष्ट्र भाजप यात बदनामंच होत आहे.
दर आठ दिवसाला हे सरकार पडणार अशी आवई भाजपवाले उठवत असतात आणि पुन्हा पुन्हा तोंडावर पडतात. याने फक्त भाजपवाल्यांचं हसू होतं याउपर काही होत नाही.
भाजपचे दुसऱ्या राज्यातले मंत्री-संत्री इथल्या मविआ सरकारला शिव्या देता देता कधी महाराष्ट्राला शिव्या द्यायला लागतात हे त्याचं त्यांनाही कळत नाही. गोदी मिडिया हे सगळं कव्हर करते, भाजपचा अजेंडा चालवते तो भाग सोडला तर महाराष्ट्र भाजप ही Anti-Maharashtra आहे हा संदेश
उद्धव ठाकरे शांतपणे खालपर्यंत penetrate करत आहेत आणि हे लोकांना कमी अधिक प्रमाणात का होईना पण पटत आहे. मागच्या एका वर्षांत मविआ सरकारच्या काही चूका झाल्या असतील तरी राज्यातल्या अराजकीय जनतेत त्याबद्दल रोष अजून तरी दिसत नाही. आता हे असंच चालू राहिलं आणि
महाविकास आघाडी अशाच लहान मोठ्या निवडणूक जिंकत राहिली तर २०१९ मध्ये भाजपमध्ये आलेल्या महाभरतीला महाओहोटी लागणं अटळ आहे. सत्तेसाठी तिकडे गेलेली जनता ही माघारी फिरणार नाही याची गॅरेंटी स्वतः भाजपवाले सुद्धा देऊ शकत नाहीत.
बाकी हे सरकार आठ दिवसांत पडणार आहे असं आज कोणी बोललं की नाही?
You can follow @rohanreplies.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.