आज आपण पाहणार आहोत अशा काही वीरांगणा ज्या हिंदूस्थान मध्ये जन्माला आल्या ज्यांनी ब्रिटीशांच्या विरोधात तलवार हातात घेतली .या वीरांगणा मध्ये पहिलं पुष्प.
"राणी वेलू नचियार "
राणी वेलू नचियार ही पहिली शासक राणी होती जिनं ब्रिटीशांच्या विरोधात रणशिंग फुंकले
"राणी वेलू नचियार "
राणी वेलू नचियार ही पहिली शासक राणी होती जिनं ब्रिटीशांच्या विरोधात रणशिंग फुंकले
अगदी आपल्या राणी लक्ष्मीबाई च्या ही आधी.तामिळ लोक तिला "वीरमंगाई "म्हणतात..म्हणजे " शूर स्री."
सेठपती राजवंशात.. रामानाथ पुरम येथील राजे.येलमुथु विजयरागुणथा सेतुपती.आणि राणी मुथायल नचियार यांच्या पोटी 3 जानेवारी 1730 मध्ये वेलू नचियार चा जन्म झाला.
सेठपती राजवंशात.. रामानाथ पुरम येथील राजे.येलमुथु विजयरागुणथा सेतुपती.आणि राणी मुथायल नचियार यांच्या पोटी 3 जानेवारी 1730 मध्ये वेलू नचियार चा जन्म झाला.
आई वडिलांनी राजकन्येला राजपूत्राप्रमाणं वाढवलं,. लढाई साठी आवश्यक आसणार्या सगळ्या य़ुध्दकला मधे तिला निपुण केलं
वलारी( throwing विळा ) सिलंबम (एक काठी लढाई) घोडेस्वारी,तिरंदाजी मध्ये राणी निपुण होती.राणीला अनेक भाषा ही अवगत होत्या .उदा. फ्रेंच, इंग्रजी ,ऊर्देु.
वलारी( throwing विळा ) सिलंबम (एक काठी लढाई) घोडेस्वारी,तिरंदाजी मध्ये राणी निपुण होती.राणीला अनेक भाषा ही अवगत होत्या .उदा. फ्रेंच, इंग्रजी ,ऊर्देु.
राणीचं लग्न वयाच्या सोऴाव्या वर्षी शिवगंगाई स्टेटचे राजे मुथुवदुगानाथोपरिया. यांच्याशी झाले .त्यांच्यापासून राणीला एक मुलगी झाली(1772) जिचे नाव "वेलाकी "
अरकोट च्या नबाबाचा मुलगा व ब्रिटीशांनी मिळून शिवगंगाई ताब्यात घेतली यात राजे मारले गेले.
अरकोट च्या नबाबाचा मुलगा व ब्रिटीशांनी मिळून शिवगंगाई ताब्यात घेतली यात राजे मारले गेले.
या लढाईला "कलियार कोली वाँर "असं नाव आहे. ऱाणी आणि तिची मुलगी पळून जाण्यात यशस्वी झाले.दिदुगल येथील अभयारण्यातील विरूपची गावात 8 वर्षे राणीनं वास्तव्य केलं .या कामात muruthy brothers नी राणीची मदत केली .या काऴात राणीनं आपली फौज पुन्हा निर्णाण केली.यामध्ये महिलांचे होत्या.
1780 मध्ये म्हैसूर चा सुलतान हैदर अली यांच्याशी ऊर्दू मध्ये संभाषण करत आपल्या अपार धैर्याने,चिकाटीने प्रभावित केले.हैदर अलीने ब्रिटीशांच्या विरोधात राणीला दिलेलं वचन पाऴलं 400 पौंड आणि 5000 घोडदऴ पायदळ राणीला दिलं .पुढे त्याच्या मैत्रिचं प्रतिक म्हणून स्वताच्या
राजवाड्यात मंदिर ही बनविलं .पहिला मानवी आत्मघाती हमला करणारी suicide bomber बनवण्याचे श्रेय राणीला जातं.तशी इतिहासात नोंद आहे.दलित कमांडर इन चीफ."कुईली "हिच्यासह राणीने हमला चढविला .तिला राणीची मानलेली मुलगी असंही म्हणलं जातं
ब्रिटीशांनी ठेवलेली दारोगोळा कोठारांची माहिती राणीच्या हेरांनी काढली .कुईली ने स्व:ता वरती तूप आणि तेल लावून त्या कोठारमध्ये स्व:ताला त्या कोठारांनमध्ये उडवून घेतलं . दुसरीकडे राणीने किल्यावर चढाई केली होती पण दारूगोळा नसल्याने ब्रिटीश हारले.
कुईली मुळे राणीला आपलं राज्य परत घेण्यात मदत झाली.10 वर्षे ब्रिटीशांना ऱोखण्यात ती य़शस्वी ठरली.शिवगंगाई ची पऱत राणी झाली.आपली मुलगी वेलाची हिला गादीवर वारस म्हणून बसवल.राणीने पहिली महिला पलटन (आर्मी ) काढली.आणि उदयाल (udaiyal) या नावांनी.ही पलटन तिनं पहिली मानवी
बाँम्ब बनून राज्य परत मिळवून देण्याच्या कामी धारातीर्थी पडलेल्या commander in chief कुईली च्या स्मरणार्थ.. काढली.25 डिसेंबर 1796 ला वयाच्या 66 व्या वर्षी राणीचे आजारपणाने निधन झाले .जुलै 18,2014 मध्ये तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी
"वीरमंगाई वेलू नचियार मेमोरियल "चे उद्घाटन केले .आणि 3 जानेवारी राणीचा जन्मदिवस दरवर्षी साजरा करण्यात येईल अशी घोषणा केली.