नवीन कृषी विधेयकांना विरोध का होतोय ?

१) सरकार : ऐतिहासिक कायदा आहे... शेतकऱ्यांचं नशीब बदलेल.

शेतकरी : बरं... पण कसं?

२) सरकार : शेतकरी कुठेही जाऊन त्याच उत्पादन विकू शकेल.

शेतकरी: ते आम्ही पूर्वीसुद्धा करू शकत होतो. कुठलाही सरकारी नियम आम्हाला तसं करण्यापासून अडवत नाही.
३) सरकार : पुढील वस्तू limitless साठवून ठेवता येतील. बटाटा , कांदा , डाळी , अन्नधान्य , खाद्यतेल बिया.

शेतकरी : याचा फायदा साठेबाजांना होईल. ते या वस्तूंचा साठा करून ठेवतील आणि जेव्हा शेतकरी माल विकायला बाजारात आणतील तेव्हा भाव पडलेले असतील.
४) सरकार : किमान आधारभूत किंमत ( हमीभाव MSP) हटणार नाही , आम्ही आश्वासन देतो.

शेतकरी : आश्वासन नको. विधेयकात तसं लिहा की माल खरेदी करणाऱ्याला तो किमान आधारभूत किमतीच्या खाली विकत घेता येणार नाही.

सरकार : नाही. तसं आम्ही लिहिणार नाही.
५) सरकार : प्रायव्हेट कंपन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर स्वतःच मार्केट लावू शकतील.
जिथे कुठलाही कर (टॅक्स)आकारला जाणार नाही. परिणामी शेतकऱ्यांना जास्त किंमत मिळेल.

शेतकरी : सुरुवातीला या कंपन्या जास्त भाव देतील त्यामुळे शेतकरी त्यांचा माल या प्रायव्हेट कंपन्यांना विकेल
परिणामतः कृषी उत्पन्न बाजार समित्यांची व्यवस्था मोडकळीस येईल. त्या बंद पडतील.
एकदा त्या बंद पडल्या की प्रायव्हेट कंपन्या मालाला योग्य भाव देणार नाहीत. कारण त्यांना हमीभाव बंधनकारक नाही.

६) सरकार : प्रायव्हेट कंपन्या शेतकऱ्यांसोबत करार करू शकतील ज्या अंतर्गत त्यांना
शेतकऱ्याचे पिक घेणं बंधनकारक असेल.

शेतकरी : कृषी उत्पादन आणि वाणिज्य ( संवर्धन व सुविधा ) विधेयक २०२०, भाग २ : ४ (३) अनुसार, अशा करारांतर्गत उत्पादन खरेदी करणाऱ्या खरेदीदाराला जास्तीत जास्त ३ दिवसात शेतकऱ्याचे पैसे द्यावे लागतील.

अशी क्षमता या देशात फक्त काही मोजक्याच
लोकांकडे आहे. त्यामुळे competition आपोआपच कमी होईल ,
परिणामतः भाव कमी मिळेल.

त्यात सुद्धा काही वाद झाला तर ती केस उपविभागीय दंडाधिकारी निवाड्यासाठी conciliation board ( सलोखा समिती म्हणुया ) कडे सोपवतील जिथे कंपन्यांकडून कायदेशीर बाजू समजाऊन सांगायला मोठे मोठे
वकील असतील आणि शेतकरी एकटा असेल. आता सरकारी व्यवस्था कशी हाताळायची हे उद्योगपतींना शिकवण्याची गरज नाही.

आता थोडी क्रोनोलोजी समजुया....

१) कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मधे अन्याय होतोय असं वाटल्यास शेतकरी मार्केटचा रस्ता धरेल. पण इथे सुद्धा हमीभावाचं संरक्षण नसल्यामुळे तो
मिळेल त्या किमतीत उत्पादन विकण्यावाचून त्याच्याकडे पर्याय राहणार नाही.

२) किंमत सुद्धा कमी मिळेल कारण साठेबाजी च्या जोरावर मोठे मोठे उद्योगसमूह भाव कंट्रोल करतील. आणि या गोष्टी उघडकीस येऊ नये म्हणून सरकारनं लोकसभेत संख्येच्या बळावर आणि राज्यसभेत नियम मोडून ,
चर्चेशिवाय हे ३ विधेयक पास करून घेतले.

निव्वळ मच्छर मारल तरी #Masterstroke घोषित करणार हे सरकार एवढा मोठा बदल करून सुद्धा त्याच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचू नये याची setting लावते.. त्यावरून त्यांचा उद्देश कळतो.

१) आवश्यक वस्तू (संशोधन) विधेयक २०२०
२) कृषी उत्पादन व वाणिज्य (संवर्धन व सुविधा) विधेयक २०२०

३) The farmers (empowerment and protection) on price assurance and farm services bill 2020.

हे तीनही विधेयक शेतकऱ्यांच्या मूलभूत समस्यांच समाधान करत नाहीत. तर उलट त्यांना खाजगी कंपन्यांच्या दयेवर सोडण्याचं काम करतात.
शेतकऱ्यांची प्रमुख मागणी किमान आधारभूत किंमतीचा ( Minimum support price ) समावेश विधेयकात करावा अशी आहे. परंतु सरकार शेतकऱ्यांची कुठलीही मागणी मान्य करायला तयार नाही.
उलट या विधेयकाचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना कळू नये म्हणून चर्चेविना हे तीनही विधेयक पास करण्यात आलेत.

#शेतकरीआंदोल
#SupportFarmersProtest
#माहितीअसायलाचहवी
व्हाट्सएपच्या जगातून साभार
You can follow @sujitgr8.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.