काय बोलले आत्ता योगी आदित्यनाथ माहिती का ?
तर ते
-आशिया खंडातील सर्वात मोठे विमानतळ ते बांधत आहेत
-त्या विमानतळा पासून फक्त 6 किलोमीटर अंतरावर 1000 एकर परिसरात नवीन फिल्मसिटी बांधत आहेत
-ह्या फिल्म सिटी मध्ये "वर्ल्ड क्लास" सुविधा देण्यात येणार आहेत !
-जिथे आर्थिक सामाजिक
सुरक्षा पुरवली जाणार आहे ,
-इथून 1 तासावर आग्रा येथील ताजमहाल असणार आहे
-अर्ध्या तासात लखनऊला जाता येईल अशी व्यवस्था असणार आहे
-मोठ्या मोठ्या एक्सप्रेस वे ची सुविधा असणार आहे
-शेजारीच डिफेन्स कॉरिडॉर निर्माण होत आहे जिथे अडाणी डिफेन्स, महिंद्रा डिफेन्स सारख्या मोठ्या
कंपन्या गुंतवणूक करत आहेत
-24 कोटी लोकसंख्या असलेल्या उत्तरप्रदेशात फक्त मनेरगा सारखे कमी दर्जाची कामे निर्माण करायची नसून उलट प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार उच्च दर्जाची कामे मिळावीत ह्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत , आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व्हावी
ह्यासाठी योगीजी अनेक ठिकाणी भेटी देत आहेत, अश्याच एका दौऱ्यात ते मुंबईला आले असून त्यांनी इथे BSE मध्ये म्युनिसीपल बॉण्ड आज जाहीर केले आहेत ! भारतात सर्वात जास्त महानगर पालिका उत्तरप्रदेशात असून , त्यांचे बॉण्ड्स मार्केट मध्ये उतरवून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक निर्माण करायचा
त्यांचा मानस आहे ! जे आहे ते चोरून घेऊन जायची इच्छा नसून उलट नवीन काहीतरी निर्माण करायची योगीजींची इच्छा आहे आणि म्हणूनच बॉलिवूड मधील तज्ञांनसोबत चर्चा करून अजून काय काय नोएडा येथील फिल्मसिटीत करता येईल ह्या उद्देशाने ते आज मुंबईत अनेक बॉलिवूडच्या लोकांना भेटले !
ह्याला म्हणतात व्हिजनरी नेतृत्व ! जे भविष्यातील मोठया निर्माणसाठी आज कष्ट घेत आहे ! गुंतवणूक वाढवण्यासाठी सगळीकडे फिरत आहेत ! उद्योजकांना पोषक असे वातावरण निर्माण करत आहेत ! जनते प्रति आपली जिम्मेदारी ओळखल्यावरच अशी धडाकेबाज कारवाई होते !
नाहीतर आपला घरकोंबडा , दुसरे राज्य सोडा पुण्यातील ,संभाजी नगरातील, नागपुरातील उद्योजकांना देखील भेटत नाही ! फडणवीस साहेबांच्या काळात परदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वात मोठे ठिकाण होते पण आता ,सरकारचे डळमळीत असलेले स्थान , पॉलिसी बाबतीत नसलेलं कोणतेच स्पष्ट धोरण
महाराष्ट्रात गुंतवणूक वाढवत नसून उलट आहे तीच गुंतवणूक जाण्याची शक्यता आहे !
भकास आघाडीच्या नाकर्तेपणाची किंमत येणाऱ्या पिढीला चुकवावी लागेल ! त्यामुळे सावध ऐका पुढल्या हाका !!
You can follow @khadaksingh_.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.