अरुण जेटली यांचा आज जयंती. ह्या माणसाच्या व्यक्तिमत्त्वाने मी खूप प्रभावीत आहे आहे त्यामुळेच मला त्यांच्याविषयी लिहायचा मोह मला आवरला नाही. एक हुशार कायदेपटू आणी संविधानाचं ज्ञान असणारा हिरा.
भारतातल्या सर्वात टॉपच्या १० वकिलांमध्ये त्यांचं नाव होत.क्रिमिनल असो,कॉन्स्टिट्यूशनल असो सर्वावर त्यांच्याकडे हमखास उपाय होते.त्यांनी वित्तमंत्री म्हणून जी पायाभरणी केली त्याबद्दल येणारा भारत कायमस्वरूपी त्यांचा ऋणी राहील.
त्यांनी घेतलेले सर्व निर्णय सांगणं मुश्किल होईल पण सर्वात मुश्किल काम म्हणजे वेगवेगळ्या राज्यांची सरकारे वेगवेगळ्या पक्षांची असताना राज्याकडून जीएसटीसाठी तयारी करून घेतली असेल तर ती अरुण जेटली यांनी जे दुसऱ्या कोणाला शक्य झालं नसतं.
जीएसटी कौन्सिल अध्यक्षपदी राहून सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांना,त्यांच्या प्रश्नांना समजून त्यावर उत्तरं काढून त्यांच्याकडून होकार घेणं किती अवघड ,विचार करा त्यात ममता बॅनर्जी,तेजस्वी यादव आणी काँग्रेसची सरकारे.
त्यांचं मला आवडलेलं भाषण राज्यसभेतलं जम्मू काश्मीरवरील परिस्थितीवर त्यांनी स्वातंत्रपूर्व काळापासून सध्यापर्यंत झालेल्या घटना तारखेसहित प्रस्तुत केल्या होत्या.जणू काही मी जम्मू काश्मीरचा पूर्ण इतिहास त्या भाषणात ऐकत होतो
प्रमोद महाजनांनंतर दिल्लीतल्या कॉर्पोरेट,मीडिया आणी लॉ क्षेत्रात भाजपची जी पकड राहिली ती अरुण जेटलींमुळे.त्यांची इंग्रजीवरच प्रभुत्व अद्भुत होतं आणी ह्याच कारणामुळे ते हिंदी खूप कमी बोलत त्यामुळे कदाचित जनतेपर्यंत त्यांचा आवाज तेवढा पोहोचला नाही नाहीतर ते देखील लोकनेते झाले असते.
२०१९ च्या निवडणुकीत पहिल्यांदा त्यांच्या हिंदीत पत्रकार परिषद पहिल्या पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता पण आपल्या मित्राला पुन्हा पंतप्रधानपदी बसायला मदत केली होती.भारताच्या राजकारणात दोस्ती आणी जोडीची मिसाल द्यायची झाली तर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचं नाव कायम पुढे येत.
पण या दोघांमध्ये तिसऱ्या माणसाची मला कायम कमी जाणवते ती म्हणजे अरुण जेटली. बहुतेकांना हा अतिरेक वाटेल कारण नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे गुजरातपासून सोबत आहेत आणि अरुण जेटली पहिल्यापासून दिल्लीत!
पण नरेंद्र मोदी आणी अमित शाह यांना २००२ पासून जेव्हा मीडिया विरोधात उतरली होती तेव्हा त्यांच्यावर चाललेल्या वेगवेगळ्या केसेस गुजरात, महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये मध्ये वकील म्हणून काम करून त्यांना बाहेर काढलं असेल तर अरुण जेटली यांनी.
मोदींना पक्षांतर्गत दिल्लीचा रस्ता सुखर करून देणारे,मोदी दिल्लीत नवीन असताना दिल्लीची हवा समजून घेण्यासाठी कोणी मदत केली असेल तर ते अरुण जेटली. ह्या तिघांची जोडी म्हणजे त्रिशूल. तिघांची ताकत वेगवेगळी होती पण दुवा एकाच होता दोस्तीचा.
ह्याच उदाहरण म्हणजे बेहरीनमध्ये भाषण देताना मोदी म्हणाले होते ते ऐकून माझ्या डोळ्यातही पाणी आलं होतं. "मै कर्तव्य से बंधा हुआ इन्सान हूं, एक तरफ बेहरीन उत्साह और उमंग से भर हुआ है,देश जन्माष्टमी का,कृष्णजन्म का उत्सव मना रहा है!उस पल मेरे भितर गहरा शोक,एक गहरा दर्द मै दबाये करके
आपके बीच खडा हूं! विद्यार्थी काल से जिस दोस्त के साथ सार्वजनिक जीवन के एक के बाद एक कदम मिल करके चले,राजनीती कि यात्रा साथ साथ चली,हर पल एकदुसरे के साथ जुडे रहना,साथ मिल्के झुजते रहना,सपनो को सजाना,सपनों को निभाना,ऐसी एक लंबी सफर जिस दोस्त के साथ किई वोह दोस्त अरुण जेटली भारत के
पूर्व रक्षामंत्री,वित्तमंत्री आज हि उन्होने अपना देह छोड दिया! मै कल्पना नहीं कर सकता मै इतना दूर यहाँ बैठा हूँ और मेरा एक दोस्त चला गया." अश्या या राजकारणातील एक तेजस्वी हिरा,संकटमोचक, चाणक्य आणी जिगरबाज दोस्ताच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन !
You can follow @pramodnmhatre.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.