प्रकाश गाडेंनी एक पोस्ट लिहिली आहे, त्याचा थ्रेड बनवून टाकत आहे. नक्की वाचा.

फडणवीसांना धक्का कि जनतेला धक्का?

+
१.) आरे कारशेड ला स्थगिती दिली. फडणवीस यांना झटका जसं काही फडणवीस यांनाच फायदा होता. मेट्रोचा सर्वसामान्य मुंबईकरांना नाही. जनतेचे पैसे किती ही गेले तरी चालतील पण फडणवीस यांना धक्का बसला पाहिजे.

+
२.) सारथी संस्था बंद केली. फडणवीसांना जोरदार धक्का.
- फडणवीस यांची पोरं शिकत आहेत दिल्लीत जाऊन सरकारच्या पैशावर? मराठा समाजातील गोरगरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवलं तरी चालेल पण धक्का बसला पाहिजे फडणवीस यांना.

+
३.) जलयुक्त शिवार योजना बंद. देवेंद्र फडणवीस यांना धक्का.
- २०१७ - १८ - १९ सलग तीन वर्षे जलयुक्त शिवारमुळे मराठवाड्यात कित्येक वर्षी कोरड्या पडलेल्या बोअर ला पाणी आले. तीन वर्ष टँकर मुक्त गावे होती. आता टँकर माफियांना सुगीचे दिवस आणून आणि फडणवीस यांना धक्का दिला.

+
४.) नोकरी पोर्टल बंद केलं. फडणवीस यांना धक्का.
- जस काही देवेंद्र फडणवीस हेच नोकरीला लागणार होते. आता भरती ऑफलाईन केली जाणार आहे. ज्यांच्याकडे वशिला आहे त्यांनाच नोकरी मिळणार आहे. पैसेवाले जे असतील त्यांना नोकरी आहे आता.

+
५.) सरपंच पदाची निवड जनतेतून रद्द केली. फडणवीस यांना धक्का.
- सरपंच पदाचा घोडेबाजार होणार, कामे होणार नाहीत. ज्याला पैसे मिळाले नाहीत ते बरोबर वाट लावणार. राज्याच्या सरपंचपरिषेदेचा विरोध असताना देखील निर्णय करण्यात आला. राज्यातील ९ हजार ग्रामपंचायतीने विरोधात ठराव देखील मांडला.
+
६.) कृषिउत्पन्न बाजार पेठ मधून शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार काढून घेतला.फडणवीसांना दे धक्का.
- कृषिउत्पन्न बाजार समित्यात शेतकऱ्यांना बाहेर काढून दलालांना रान मोकळं करून दिलं. आणि देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा धक्का दिला.

+
७.) जिल्हापरिषद शिक्षकांच्या बदल्या आता जिल्हा परिषेदकडे. देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा दे धक्का.
- सगळ्या जिल्हापरिषद सदस्यांना, अध्यक्षांना सर्व जिल्हापरिषद शिक्षक वर्गाला लुटण्यासाठी रान मोकळं करून दिले बदलीच्या नावाखाली. तरीही फडणवीस यांना दे धक्काच.

+
८.) नीरा भाटघर धरणाचे पाणी पुन्हा बारामती वळवले. फडणवीस यांना पुन्हा एकदा दे धक्का.
ज्या दुष्काळी भागाचे हक्काचे पाणी होते त्या भागाला न देता, ते बारामतीच्या कारखानदारीला देण्यात येत आहे. सांगोला दुष्काळग्रस्त यासाठीच असतो. या पाण्यावर फडणवीस यांची हजारो एकर भिजत नव्हती.

+
वरील सार्वजनिक हिताचे, लोकहिताची कामे बंद पाडली गेली कारण काय तर मागच्या सरकार ने घेतलेले निर्णय होते म्हणून. वरील सर्व निर्णय लोकहिताचे, समाजहिताचे व शेतकऱ्यांच्या हिताचे होते.

+
कोणत्याही पठ्यानं सांगवं की वरील देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले निर्णय स्वार्थी वृत्ती ने घेतलेले होते. उघडा डोळे आणि स्वतः बघा.

+
माफियाराज आणि फक्त स्वतः चे आर्थिक हित लक्षात घेऊन सह्याजीराव कडुन कामे करून घेत आहेत. त्याला कुठलं काय कळतं. बस म्हटलं की बसायचं आणि उठ.....

दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आणि दुसरं काय?
- प्रकाश गाडे
Please follow @PrakashGade11
You can follow @swapniltk.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.