#Thread : ताज महाल भारताची ओळख ?!

जगातील 7 आश्चर्‍यांमध्ये आपल्या भारतातील 'ताज महाल' येतो, पण मला कधीही हि वास्तू या यादी मध्ये असावी असं वाटलं नाही !माझ्या या विचाराला अनेक पैलू आहेत,जे मी एक एक करत इथे स्पष्ट करू इछितो! कृपया करून शेवट पर्यन्त वाचा आणि अभिप्राय कळवा!
(1/18)
आता अनेकांना वाटलं असेल कि हि इस्लामिक वास्तू आहे म्हणून मल्हार च्या मनात या जागेबद्दल असा विचार आला असेल,अनेक हे खरं असलं तरी याला इतर कारणं आहेत. आता ताजमहाल मुळात मुमताज महाल ची कब्र आहे, जे शहाजहान ने तिच्या प्रेमाखातर बांधले आहे अशी आख्यायिका आहे.
(2/18)
'सिम्बॉल ऑफ लव्ह म्हणून या जागेला उगाचच लोकांनी नावाजले, पण या मागे डाव्या विचारसरणीच्या आणि हिंदुद्वेषी लोकांचे मोठे षडयंत्र आहे.आता भारताला परिभाषित करण्यासाठी म्हणून एखाद्या इस्लामिक वास्तूची आवश्यकता
(3/18)
का पडते का प्रश्न सगळ्यात पहिल्यांदा एका सुजाण आणि विचार करणाऱ्या व्यक्तीला पडलाच पाहिजे.म्हणजे भारताच्या कान्याकोपऱ्यात इस्लामिक हल्ले होण्याआधी इतक्या वास्तू आहेत ज्या इतक्या भयानक हल्ल्यानंतर सुद्धा आखीव रेखीव दिसतात त्यांचे नाव या यादीत का नाही ?
(4/18)
आणि हा प्रश्न जेव्हा तुम्ही विचाराल आणि त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल कि स्वातंत्र्यकाळानंतर शिक्षणपद्धती मुले सामान्य जनतेच्या मनात हेच बिंबवले गेले आहे कि
(5/18)
हिंदू संस्कृती बाद आहे आहे आणि इस्लामिक संस्कृतीनेच आपल्याला अश्या सुंदर वास्तू,खाद्यपदार्थ आणि अन्य गोष्टी दिल्या.

जे कोणी यादी तयार करतात त्यांनी एकदा का होईना पण अजंता लेण्यांना भेट द्यावी आणि तिथले कैलास मंदिर पाहावे.
(6/18)
कित्येक हजार वर्षांपूर्वी बांधलेले हे मंदिर पाहून ,नाही ते चाट पडले तर बघा ! एका दगडात कोरलेले हे मंदिर आणि तेही वरून खाली,म्हणजे कळसापासून ते पायथ्यापर्यंत आणि तेही इतक्या बारकाईने,
(7/18)
हे सगळं पाहून हि वास्तू त्या यादीत असलीच पाहिजे होती. परंतु का नाही ? याचे उत्तर स्वतःच शोध !अजंता पासून काहीच अंतरावर 'घृष्णेश्वराचे' मंदिर आहे,त्या मंदिराच्या भिंतींवर केलेले कोरीव काम आणि तिथल्या अन्य गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला तर लक्षात येईल कि
(8/18)
भारतीय वास्तुकला हि कधीही इस्लामिक वास्तुकले पेक्षा कैकपटीने सरस आहे. आणि एवढेच नाही हो,या जागांना अध्यात्मिक महत्व देखील आहे.
(9/18)
मंदिरे काय कोणतीही जागा पाहून उभी नाही केली,त्याला उभे करायला वेगवेगळ्या पद्धतीच्या गणना कराव्या लागल्या,या जागा योग्य आहेत का ते पाहाव्या लागल्या, आणि मग जेव्हा अनेक पैलूंचा विचार केला गेला तेव्हाच या वास्तू बांधल्या गेल्या,
(10/18)
म्हणजे इतक्या विचाराने बांधलेल्या या वास्तूना भारताचे प्रतीक म्हणून पुढे का नेले नाही हा प्रश्न आहेच.दक्षिणेतील मंदिरे तर इतकी आखीव रेखीव आहे कि ताज महाल या मंदिरांच्या समोर नतमस्तक होईल.पद्मनाभस्वामी मंदिरामधील वेगवेगळ्या खोल्या
(11/18)
आणि इतर सूर्य किरण जिथून दिसते त्या खिडक्या इतक्या अचूक पद्धतीने बांधल्या गेल्या आहेत कि मनात विचार येतो कि एवढी कला त्या वेळच्या लोकांकडे अली कशी ? कोणते शिक्षण घेतले आणि कुठून ?
(12/18)
दक्षिणेत अशी हजारो मंदिरे आहेत जी या सात आश्चर्यांपेक्षा हजारपटीने सुंदर आहेत,पण दुर्दैवाने आपल्या देशातील डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांनी,संशोधकांनी,वास्तुकलाकारांनी आणि तत्कालीन सरकारनी या वास्तूना जागतिक दर्जावर नेण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत,
(13/18)
या उलट वाळवंटातून उगम पावलेल्या लोकांची कला या भूमीतील लोकांच्या कलेपेक्षा कशी सुंदर हे दाखवण्यात ते मग्न होते.
ओरिसा मधील कोणार्क मंदिर असो किंवा उत्तराखंडातील केदारनाथ,महाराष्ट्राच्या अंगाखांद्यावर वसलेले बलाढ्य किल्ले असो किंवा राजस्थानच्या राजपुतांच्या हवेली असो
(14/18)
,या एवढ्या सगळ्या सुंदर जागा सोडून 'ताज महालच' का या यादीत आहे हा प्रश्न तुम्ही वारंवार विचारलाच पाहिजे ! भारताची ओळख कोणत्याही रूपाने इस्लामिक वास्तुकलेच्या होऊ शकत नाही हे आधी डोक्यात 'फिट्ट' करून घ्या !

(15/18)
आणि या वास्तुकलेपेक्षा कैकपटीने सुंदर असलेले मंदिर,किल्ले,हवेल्या,समाध्या या भारताच्या भूमीत आहेत हे विसरू नका,एक सजग नागरिक आणि भारताच्या इतिहासाबद्दल प्रेम असलेला व्यक्ती म्हणून तुम्ही देशातील सरकार ला आणि पर्यटन मंत्र्यांना एक पत्र लिहा,
(16/18)
ज्यात 'ताज महाल' ला या यादीतून काढून,इतर कोणतेही अगदी बौद्ध,जैन,हिंदू, शीख वास्तू जी प्रचंड सुंदर आहे ती या ७ आश्चर्यांच्या यादीत यावी अशी मागणी करा !इतर कोण करतं आहे का ?
(17/18)
याचा विचार करण्याच्या पेक्षा तुम्ही ते करत आहेत यानेच मोठा बदल घडेल हा विचार मनात येउदेत आणि या कामाला लवकरात लवकर लागा ! ताजमहाल हि भारताची ओळख नाही हे जगाला पटवून देण्यासाठी आपल्याला थोडेफार तरी कष्ट घ्यावे लागणार आहेत !
(18/18)
You can follow @malhar_pandey.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.