'मुलांची अडचण ही आहे की, ते मुलगे आहेत.' एका युरोपियन मानसोपचार तज्ज्ञाचं हे वाक्य आहे.. असो..!
'मी ही तुम्हाला किती शोधलं रे..पण, तुम्ही मला सापडलाच नाही..!'
नटसम्राट चित्रपटात नटसम्राटाची ही खंत अखंड पुरुषांची खंत असेल.
आज इंटरनॅशनल मेन्स डे..!
#थ्रेड #म
'मी ही तुम्हाला किती शोधलं रे..पण, तुम्ही मला सापडलाच नाही..!'
नटसम्राट चित्रपटात नटसम्राटाची ही खंत अखंड पुरुषांची खंत असेल.
आज इंटरनॅशनल मेन्स डे..!

मुलगा आणि पर्यायाने पुरुष यासंबंधी आपल्या समाजात 'अवास्तव आणि अतार्किक' असा एक जड अपेक्षांचा स्वभाव वातावरण व्यापून असतो. त्या अपेक्षांचं ओझं घेऊन मुलं वाढत असतात.. पुढे जाऊन हे अपेक्षांचं ओझं.. अवाजवी मर्दानगीच्या कल्पनेमुळे पुरुषांच्या संवेदनशील मनाची घुसमट करत राहते.
याची सुरवात असते..'ते काय मूलगेच आहेत..त्यांना चालतं.' या वाक्याने..
दुसरीकडे 'मुलगा आहे तो..त्याची चूक पोटात घातली जाते..' हा ही एक अंगवळणी पडलेला वाक्यप्रचार.. याने होतं काय? तर मुलांचे विध्वंसक आणि उद्वेगजनक वर्तन करण्याकडे कल राहतो..हे आपल्याला कळत ही नाही.
दुसरीकडे 'मुलगा आहे तो..त्याची चूक पोटात घातली जाते..' हा ही एक अंगवळणी पडलेला वाक्यप्रचार.. याने होतं काय? तर मुलांचे विध्वंसक आणि उद्वेगजनक वर्तन करण्याकडे कल राहतो..हे आपल्याला कळत ही नाही.
एकीकडे आपलं संवेदनशील मन मोकळं करण्यास अटकाव तर दुसरीकडे त्याच मनावर निगरगट्ट बनण्यासाठीचे बाळकडू संस्कार.. हे काही आजकाल घडतंय असं नाही..अगदी अनादिकालापासून हेच सुरुय.. त्यातून पुरुष कसा असावा..त्याने कस वागावं..त्यानं पुरुषत्व कस गाजवावं.. याविषयी अलिखित संहिता तयार झाली..
त्याच संहितेतून एक अलिखित संदेश पारंपरिक रुढीने रुजवला गेला.. 'मर्द को दर्द नहीं होता..!'
खरंतर पुरुषांचं दुःख समजायला काळीज ही पुरुषांचं असावं लागतं.. आज सामाजिक समस्या म्हणून स्त्री-पुरुष समानतेवर असणारा उपायांचा लंबक आपण थेट दुसऱ्या टोकाला नेला..त्यास आता कितीतरी तप लोटले.
खरंतर पुरुषांचं दुःख समजायला काळीज ही पुरुषांचं असावं लागतं.. आज सामाजिक समस्या म्हणून स्त्री-पुरुष समानतेवर असणारा उपायांचा लंबक आपण थेट दुसऱ्या टोकाला नेला..त्यास आता कितीतरी तप लोटले.
घरगुती अत्याचार हे पुरुषांवर ही होत असतात..हे हा समाज सोयीस्करपणे विसरतोय.समाजाच्या दांभिकतेस साजेसच म्हणा हे.मागे नागपूरच्या भरोसा सेल कडे तक्रारी आल्या होत्या त्यापैकी 20 टक्क्याहून जास्ती तक्रारी या पुरुषांवर होणाऱ्या अत्याचाराच्या होत्या..हे चित्र समाज उघड्या डोळ्यांनी पाहिल?
भारताच्या बाबतीत बोलायचं तर.क्रिकेट आणि राजकारण यात लोकसंख्येइतके तज्ञ आहेत. त्याखालोखाल तज्ञांची संख्या स्त्री अत्याचार आणि स्त्री पुरुष समानता याविषयावर असेल.या तिन्ही तज्ज्ञांच्या मताने ज्या त्या मूळ विषयात तसूभरही फरक पडत नाही ही वस्तुस्थिती आहे.तरीही आपण आपले मत प्रकट करतोच.
ती मूलभूत आणि वैश्विक तत्वज्ञानी मतं अमलात मात्र आपण आणत नाही..त्यामुळे त्या विषयांचा जो विचका अपेक्षित आहे तो भारतीय समाजात होतोच.. वर सांगितलेले तिन्ही प्रांत हे त्या विचक्याची मूर्तिमंत उदाहरणं.. भविष्यातील असा अत्याचारित विचक्याचा विषय म्हणजे.. 'पुरुष आणि त्याची दखल.'
पुरुष आणि त्यांच्या समस्या.. हा भविष्यातील विचक्याचा विषय मी म्हणतो कारण आपण एकाच चष्म्यातून त्या समस्यांकडे पाहतोय.. अगदी आदिम काळापासून पितृसत्ताक संस्कृती रुजली असतानाही काहीएक समस्या पुरुषांना असतील हे अगोदर या समाजाने मान्य करायला हवं. तरच त्यावरील उत्तर या समाजात मिळेल.
'पुरुष आणि मुलांचे उत्तम आरोग्य..' ही थीम आहे यंदाच्या पुरुष दिवसाची.त्याबरहुकूम पुरुषांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं.
असा फक्त दिवस साजरा करून काही होत नाही हे सिद्ध झालंय बऱ्याच डे आणि त्यांची वस्तुस्थिती पाहून.'मेन्स डे' बद्दल ही काही वेगळं घडेल ही सुतराम शक्यता नाही.
असा फक्त दिवस साजरा करून काही होत नाही हे सिद्ध झालंय बऱ्याच डे आणि त्यांची वस्तुस्थिती पाहून.'मेन्स डे' बद्दल ही काही वेगळं घडेल ही सुतराम शक्यता नाही.
'आपल्या समाजात कुटूंब हे जर चाक असेल तर त्या कुटुंबातील कर्ता पुरुष हा त्या चाकाचा कणा असतो.' बाकी काहीही झालं तरी वाटचाल सुरू राहू शकते पण कणा जर मोडला तर सगळा प्रवास धोक्यात येतो..हे महत्व आहे प्रत्येकाच्या जीवनात या पुरुषांचं.
काही पुरुष वेगळे वागत असतील तर ते न्यून ही याच समाजाचं आहे.. समाजाने परिवर्तनाचा वारसा जपून ही कसर भरून काढायला एक पुरुषार्थ हवा असतो..तो पुरुषार्थ ही याच समाजातील स्त्री-पुरुष देतील ही मला खात्री आहे.. सर्वंकष बदल हवा असेल तर सुरवात ही आपल्यापासून व्हायला हवी.
जाताजाता आणखी एक सांगतो.पुरुषांनो आपली पत आपण राखायची असते.तर दुसरीही ती राखत असतात.
'तसं नसतं दिग्या.!'
दुनियादारीत दिग्या आणि त्याची प्रियसी रंगेहाथ सापडल्यानंतर श्रेया हे वाक्य दिग्याला बोलतो.आज माझ्या प्रियसीबद्दल तिच्या वडिलांचं आणि भावाचं असणारं प्रेम याचा आदर व्हायला हवा.
'तसं नसतं दिग्या.!'
दुनियादारीत दिग्या आणि त्याची प्रियसी रंगेहाथ सापडल्यानंतर श्रेया हे वाक्य दिग्याला बोलतो.आज माझ्या प्रियसीबद्दल तिच्या वडिलांचं आणि भावाचं असणारं प्रेम याचा आदर व्हायला हवा.
आज समाजात वावरताना मी माझ्या नातेवाईक महिलांचा आदर ज्या अदबीने करतो..तोच आदर, तीच अदब इतर महिलांसाठीही हवी..त्यातूनच आपला पुरुषार्थ उठून दिसतो..कोणावर मर्दुमकी गाजवून नाही.
पुरुष आणि पुरुषार्थ या दोन्ही व्याख्या बदलणे काळाची गरज आहे..पुरुष ही माणूसच आहेत..हे ओळखायला हवं आतातरी.
पुरुष आणि पुरुषार्थ या दोन्ही व्याख्या बदलणे काळाची गरज आहे..पुरुष ही माणूसच आहेत..हे ओळखायला हवं आतातरी.
पुरुषार्थ हा 'मर्यादेत' असतो.. प्रत्येक गोष्टींची मर्यादा पाळणारा मर्यादापुरुषोत्तम म्हणवला जातो...कळावे...!
माझ्या समस्त पुरुष आप्तांना आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
माझ्या समस्त पुरुष आप्तांना आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.