ही थ्रेड आवर्जून वाचा आणि मविआ समर्थकांच्या थोबाडावर फेकून मारा. भलेही तुमच्या नावावर ही थ्रेड खपवा. काहीही अडचण नाही. फक्त जनतेला काही गोष्टी विसरून चालणार नाहीये.. जनतेने ह्या गोष्टी विसरणे जनतेच्या भल्याचे नाही.

माजलेल्या सरकारचे हे एक जुने पाप आहे, जे नवीन स्वरूपात +
आपल्यातल्या बर्याचजणांना भेडसावत आहे..

"जेंव्हा ३५ लाख शेतकऱ्यांना वाढीव बिलं देण्यात आली होती.."

किती? तब्बल ३५ लाख शेतकऱ्यांना...

कोरोनाकाळात सर्वसामान्य जनतेच्या माथी वाढीव बिलं मारून ह्या शासनानं जो काही जिझियाच वसूल करण्याचा सपाटा लावलाय, त्या अनुषंगाने राष्ट्रवादीच्याच +
काळात झालेल्या एक भयंकर घोटाळ्याची आठवण झाली..

निमित्त होतं पवारसाहेबांच्या वाढदिवसाचं..

त्यासाठी महाराष्ट्र भारनियमनमुक्त करायचा होता..

त्यासाठीचा अनुशेष भरून काढणे गरजेचे होते. तोटा कमी झालाय हे दाखवायचं होतं. यासाठी तब्बल ३३ लाख शेतकऱ्यांना वाढीव बिलं पाठवण्यात आली +
होती. ज्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तब्बल ६ हजार कोटींचा फटका बसला.

शहरी भागातील भारनियमन कमी करण्यासाठी एका रात्रीतून शहर पाणी पुरवठ्याची बिलं १४ कोटींनी आणि शहर दिवाबत्तीची बिलं ४० कोटींनी वाढवण्यात आली.

एवढं करून भागेना, म्हणून ह्यांनी मोर्चा शेतकऱ्यांकडे वळवला. +
३ एचपीचा शेतपंप वापरणाऱ्यांना ५ एचपीची, ५ एचपीचा शेतपंप वापरणाऱ्यांना ७.५ एचपीची, ७.५ एचपीचा शेतपंप वापरणाऱ्यांना १० एचपीची वाढीव बिलं देण्यात आली.

एव्हढी भरमसाठ वाढीव बिलं भरून महावितरण सतत तोट्यातच होतं. आणि भारनियमन काही कमी झालं नाही..

वरील बातमीची सविस्तर लिंक.. +
https://marathi.abplive.com/news/maharashtra/incremental-bills-sent-to-33-lakh-farmers-for-load-shedding-free-maharashtra-big-scam-reveals-latest-update-430389

सध्या काय चालूये? स्वतः लाखोंच्या गाड्या घ्यायच्या आणि त्याचा खर्च सामान्यांकडून वसूल करायचा, हाच ह्या राष्ट्रवादीचा डीएनए आहे असं म्हटलं तर त्यात वावगं काय?

आता ह्यावर नंतर आलेल्या युतीच्या सरकारने काय केलं? असा निर्लज्ज प्रश्न विचारणार्या मविआ +
समर्थकांनी आधी हा असा घोटाळा का केला असा प्रश्न त्याच्या शिर्ष नेतृत्वाला विचारावा..

बिलं नं वाढवता युतीच्या शासनानेच भारनियमन कमी करून दाखवलं होतं.. इतकी वर्षे राजकारणाचा अनुभव असणाऱ्या पवारांना हे कळू नये? चुलीत घालायचा का हा अनुभव मग?

हे शासनतर पूर्णपणे जनमताचा अनादर करूनच+
स्थापन केले गेले आहे. तेंव्हा जनतेच्या मताशी ह्यांना काहीही देणेघेणे नाही. किंबहुना बर्याचदा जनतेने ह्यानं बहुमत दिले नाही म्हणून ते जनतेवर सूड तर उगवत नसतील? असाही प्रश्न बर्याचदा मला पडतो..

असहाय जरी असली तरी ही जनता, आपण मांडलेला नंगानाच, उघड्या आणि स्वतःच्याच कोट्यावधी +
डोळ्यांनी पहात आहे..

#सिंहासन_खाली_करो
#जनता_आती_है

- सिंहासन खाली करताना आपल्या सर्वांची जी काही भयंकर भंबेरी उडणार आहे, ती पाहण्यास अत्यंत आसुसलेला एक मराठी माणूस..

- चेतन दीक्षित
You can follow @mechetandixit.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.