काल बिहार मध्ये भाजपाचे सरकार स्थापन झाले , आणि आज पंजाब मध्ये सुद्धा सर्वच्या सर्व म्हणजे 117 जागा भाजपा स्वबळावर लढणार असे जाहीर झाले आहे , ही घोषणा साधी नसून एक प्रचंड मोठी शक्यता निर्माण करणारी आहे ! त्याचाच उहापोह करणार हा शॉर्ट #थ्रेड
मोदी-शहांच्या नेतृत्वात भाजपा प्रचंड घौडदौड करत आहे , 2023 मध्ये वरील चित्रातील शक्यता पूर्ण होऊ शकते ! आणि त्यासाठी भाजपाला अधिकच्या फक्त 114 विधानसभेच्या जागा जिंकायच्या आहेत !
सुरवात करूयात जम्मू-कश्मीर आणि लडाख पासून !
5 ऑगस्ट 2019 ला आर्टिकल 370 काढल्यानंतर , जम्मु-काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेश झाले आहेत ! तिथला कारभार तिथले उपराज्यपाल म्हणजेच अप्रत्यक्षपणे भाजपाचे केंद्र सरकार बघते !
त्यांनतर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा येथे
सध्याच भाजपा सरकार आहे जे मावळण्याची सुतराम देखील शक्यता नाही ! हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड 2022 मध्ये निवडणुका आहेत त्या भाजपा सहजतेने जिंकेल 👍 हरियाणाची पुढील निवडणूक 2024 मध्ये आहे!
आता ईशान्य भारतात या , इकडे दोन मोठी राज्य आहेत , त्यातील अरुणाचल प्रदेशची सत्ता 2024 परेंत भाजपाकडेच आहे, आणि आसाम मध्ये 2021 ला निवडणुका आहेत जिथे सध्याचे बहुमत भाजपाला सहज टिकवता येईल !
आता भारतातील सर्वात मोठे राज्य म्हणजे उत्तरप्रदेशात या , इकडे योगीजी आहेत , त्यामुळे मी पुढे काही बोलायची गरजच नाहीये ! 2022 ला तेच प्रचंड बहुमताने सत्ता टिकवणार 👍
उत्तर प्रदेशाच्या बाजूचे बिहार आत्ताच जिंकले आहे 👍
बिहारच्या बाजूला बंगाल आहे , जिथे दीदी ने उच्छाद मांडला आहे , जनता प्रचंड त्रस्त झालेली असून नवा पर्याय शोधत आहे ,तो सक्षम पर्याय भाजपा आहे ! येणाऱ्या 2021 च्या निवडणुकीत ह्यावर शिक्कामोर्तब होईल, बंगाल मध्ये कमळ फुलेल 👍
आता 2022 मध्ये छत्तीसगड येथे निवडणूक आहे , इकडे सध्या भाजपाच्या 15 जागा असून बहुमताला 46 हव्या आहेत म्हणजेच अधिकच्या 31 जागा भाजपाला कमवाव्या लागतील , गेल्या निवडणुकीत भाजपाच्या 49 होत्या त्यामुळे ह्या अधिकच्या 31 जागा पुन्हा मिळवणे भाजपा साठी जड नाही 👍
महाराष्ट्रात भकास आघाडीने सावळा गोंधळ मांडला असून , शिवसेनेने केलेल्या दगाबाजीचा बदला घेण्यासाठी सामान्य जनता निवडणुकीची आतुरतेने वाट पहात आहे आणि ही संधी 2023 च्या आधीच जनतेला मिळेल आणि पुन्हा एकदा देवेन्द्रजींच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकार स्थापन होईल 👍
मध्यप्रदेश आणि कर्नाटकातील पोटणीवडणुकीतून जनतेचा मूड स्पष्ट झाला असून 2023 परेंत तेथे भाजापाची सत्ता राहील आणि पुढे टिकेल सुद्धा ✌️
शेजारील गुजरात बद्दल चर्चाच करायची गरज नाही तिकडे सुद्धा भाजपाच विजयी होईल 👍
आता फक्त 2 मुख्य राज्य राहतात ते म्हणजे राजस्थान आणि पंजाब ! सचिन पायलटला वापस पाठवून भाजापा ने हे स्पष्ट केले आहे की तिकडे भाजपाला एकहाती सत्ता पाहिजे सध्या भाजपाच्या 73 सीट्स असून अधिकच्या 30 जागा बहुमताचा आकडा पार करायला भाजपाला कमवाव्या लागतील
खरी टफ फाईट ही पंजाब मध्ये होणार असून तिकडे भाजपाच्या सध्या फक्त 3 जागा आहेत बहुमताच्या 56 जागा मिळवण्यासाठी भाजपाला अधिकच्या 53 जागा कमवाव्या लागतील, इकडे ह्याआधी भाजापाची एकहाती सत्ता नसल्याने ,अकाली दलाने साथ सोडल्याने निवडणुक चुरशीची झाली आहे पण शेतकऱ्यांसाठी मोदींजींनी
सुरू केलेल्या अनेक योजनांचा फायदा भाजपाला उचलता येऊ शकतो आणि भाजपा मैदान मारू शकते ! म्हणजेच पंजाब मधील 53 + राजस्थान मधील 30 आणि छत्तीसगढ मधील 31 अश्या अधिकच्या 114 जागा भाजपाने जिंकल्या की भगवामय भारत ही संकल्पना प्रत्यक्षात उतरतांना दिसेल 😍🔥🔥
अशे स्वप्न प्रत्यक्ष साकार झाल्यास भारताची प्रगती प्रचंड वेगाने वाढेल, इतक्या मोठ्या भूभागावर भाजापाची सत्ता आल्यास 5 ट्रीलीयन इकॉनॉमीचे उदिष्ट सहजतेने साकार होईल आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे भारताची सुरक्षा मजबूत होईल
काही फायदे
1- बॉर्डर शेजारील राज्य भाजपाच्या ताब्यात आल्याने पाकिस्तान आणि चीन पुरस्कृत आतंकवादाचा बिमोड होईल
2-जमिनीचे पटापट अधिग्रहण होऊन इन्फ्रास्ट्रक्चर वेगाने डेव्हलप होईल
3-अनेक राज्यातील पॉलिसीतील साम्य असल्याने उद्योजकांचे भले होईल
4-राज्याराज्यातील गुन्हेगारीला आळ बसेल , गुन्हेगार पळून जाऊन दुसऱ्या राज्यात लपून बसू शकणार नाही
5- कर चोरीला चाप बसेल
असे एक ना अनेक फायदे भाजपाच्या एकछत्री शासनात जनतेला मिळतील
त्यामुळे हे स्वप्न सत्यात उतरावे हीच आशा करूयात 😍🔥✌️
You can follow @khadaksingh_.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.