#Thread

'आम्ही #हिंदुत्व सोडलेलं नाही' हे वाक्य गेल्या काही महिन्यात आपल्याला काही लोकांकडून वारंवार ऐकायला मिळालं आहे आणि ज्यांच्या 'पार्श्वभागाला' 'हिंदुत्व' हे नाव ऐकताच आग लागते ते मात्र या सगळ्या गोष्टीवर काहीही बोलताना दिसत नाहीत !?
(1/9)
नेमकं काय कारण असावं? मध्यंतरी 'विनायक दामोदर सावरकर' या सभागृहातून मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'शिवसेना वार्षिक दसऱ्या मेळावा' निमित्त भाषण दिले.या भाषणातील बहुतांश भाग का भाजप,सोशल मीडिया यूजर,हिंदुत्व आणि rss या बद्दल होता.
(2/9)
आता एका ठिकाणी उद्धव ठाकरे सरळ सरळ म्हणताना दिसले,हिंदुत्व शिकावं ते RSS कडून आणि त्यांचे हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे हिंदुत्व तंतोतंत सारखे आहे.या गोष्टीचा आनंद आहे कि यावर महाविकास आघाडी च्या 'संघोटे,भट बामन' म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला नाही.का घेतील ?
(3/9)
याचं उत्तर पुढे देतो. भाषणात बोलताना त्यांनी 'बाबरी,सावरकर,रस आणि हिंदुत्व या विषयावर भर दिला.आता काँग्रेस जे देशाच्या बहुतांश भागात आणि राष्ट्रवादी जी वाट्टेल तिथे हिंदुत्वाचा,RSS चा आणि सावरकरांचा अपमान वारंवार करत असतात,
(4/9)
त्यांना मात्र आज या तिन्ही शब्दांबद्दल काहीही आक्षेप नव्हता,याचे उत्तर प्रचंड सोपे आहे, सेनेला त्यांचा ढासळत चाललेला हिंदुत्वाचा 'बालेकिल्ला' टिकवायचा आहे आणि या दोघांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी ला त्यांची कुबड्यांच्या आधारावर असलेली सत्ता.
(5/9)
जे जे म्हणून कायमस्वरूपी बाबरी चे नाव ऐकल्यावर 'भारताच्या ऐक्याला धोका आहे',सावरकर ऐकल्यावर 'माफीवीर' आणि 'RSS ' ऐकल्यावर 'संघोटे' म्हणतात त्यांच्या मुखातून या भाषणाबद्दल 'न' आलेली टीका आपल्याला खूप काही सांगून जाते.
(6/9)
हे लोक कोणत्याही विचारधारेशी एकनिष्ठ नसलेले लोक आहेत यांना फक्त आणि फक्त सत्ता हवी आहे मग ती लोकांच्या मनाच्या विरोधात असली तरीही ! सत्तेसाठी नेहरूंवर आणि गांधींवर टीका करायची असेल तरीही ते करतील !
(7/9)
देशातील लिबरल लोकांना सत्ताधारी आणि सत्तेच्या बाहेर असलेले लोक 'किड्यांसारखे' डावलत आहेत हे दुर्दैवाने त्यांच्या लक्षात आले आहे.असो,त्यांची अवस्था तशीच राहणार यात देखील काडीची शंका नाही.
(8/9)
एकंदरीत या वर्षभरात महाराष्ट्रातील घडलेल्या राजकारणावर बोलायला खूप सारे आहे,ज्यावर तज्ज्ञांनी त्यांचे विचार वेळोवेळी मांडले आहे,मी आपला साधा मनुष्य,मनाला जे समजतं ते लिहतो !
(9/9)
You can follow @malhar_pandey.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.