शरद पवार प्रधानमंत्री न होण्याची कारणे :-
मला १९९६ पासूनच्या लोकसभा निवडणुकांचा प्रचार आठवतो. १९९६ ते २०१९ पर्यंतच्या प्रत्येक लोकसभा निवडणूक प्रचारातील एक सामाईक घटक म्हणजे, 'आपले साहेब यंदा पंतप्रधान होणार' हा शरद पवारांच्या समर्थकांना वाटणारा विश्वास.

पवार साहेब हे मुरब्बी राजकारणी आहेत देशातल्या सर्व पक्षामध्ये त्यांचे मित्र आहेत बाळासाहेब ठाकरे - शरद पवार यांच्यात मैत्री होती आणि शरद पवार नरेंद्र मोदीचेही गुरु आहेत असे आणखी बरेच काही सांगत प्रत्येक लोकसभा निवडणुकापूर्वी पवार समर्थक कार्यकर्ते आणि पत्रकार यांच्याकडून वातावरण
निर्मितीचा प्रयत्न केला जातो. याच वातावरण निर्मितीच्या जोरावर शरद पवार यंदा पंतप्रधान होतील अशी खात्री त्यांच्या समर्थकांना लोकसभा निवडणुकीपूर्वी असते.
कार्यकर्त्यांच्या भाबड्या आशावादावर देशाचा पंतप्रधान ठरत नाही. त्यासाठी लोकसभेत तुमच्या पक्षाला बहुमत असणे आवश्यक आहे. शरद पवार
कार्यकर्त्यांच्या भाबड्या आशावादावर देशाचा पंतप्रधान ठरत नाही. त्यासाठी लोकसभेत तुमच्या पक्षाला बहुमत असणे आवश्यक आहे. शरद पवार
१९६७ साली पहिल्यांदा साली आमदार झाले. १९७८ साली राज्यात पुलोदचा प्रयोग करत मुख्यमंत्री झाले. पाच दशकांहून जास्त सक्रीय राजकारणाचा अनुभव असलेल्या देशातील मोजक्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो.
या पाच दशकात देश सोडा महाराष्ट्रातही पवारांना कधी स्वबळावर सत्ता मिळवता आलेली नाही.
या पाच दशकात देश सोडा महाराष्ट्रातही पवारांना कधी स्वबळावर सत्ता मिळवता आलेली नाही.
जनसंघाचे भाजपामध्ये रुपांतर झाल्यानंतर महाराष्ट्रातील पहिली विधानसभा निवडणूक १९८० साली झाली. या निवडणुकीत भाजपला १४ जागा मिळाल्या होत्या. तर शरद पवारांच्या पक्षाला ४७ जागा मिळाल्या होत्या.
( १) २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा १०५ जागांवर पोहचला. शरद पवारांच्या
( १) २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा १०५ जागांवर पोहचला. शरद पवारांच्या
राष्ट्रवादी काँग्रेसची घौडदौड ही ५४ जागांपर्यंतच पोहचू शकली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ पैकी २८ जागा म्हणजे ५० टक्क्यांहून अधिक जागा पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. उर्वरित महाराष्ट्रातील २१८ जागांपैकी राष्ट्रवादीला फक्त २६ जागाच जिंकता आल्या आहेत.
(२) त्यामुळे पाच दशकांहून अधिक महाराष्ट्राचे राजकारण केल्यानंतरही शरद पवार हे संपूर्ण महाराष्ट्राला आपले नेते वाटतात का ? याचा विचार करायला हवा.
काँग्रेस सोडून राजकारणात वेगळी चूल मांडणारे जगनमोहन रेड्डी, ममता बॅनर्जी यासारख्या नेत्यांनी स्वबळावर राज्यात सत्ता स्थापन केली.
काँग्रेस सोडून राजकारणात वेगळी चूल मांडणारे जगनमोहन रेड्डी, ममता बॅनर्जी यासारख्या नेत्यांनी स्वबळावर राज्यात सत्ता स्थापन केली.
ममतांनी तर सलग ३४ वर्षे बंगालमध्ये सत्तेत असलेल्या डाव्या पक्षांना पराभूत केलं. विधानसभा निवडणुकीत आजवर दोनदा एकहाती बहुमत मिळवले. पवारांनी १९७८ मध्ये काँग्रेस सोडून वेगळा पक्ष स्थापन केला तेंव्हा ममता बॅनर्जी राजकारणात आल्या नव्हत्या. जगनमोहन रेड्डी किंवा त्यांचे आंध्रातले
प्रतिस्पर्धी चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाचीही स्थापना झाली नव्हती.
सतत भूमिका बदलणे आणि त्यामुळे स्वत:बद्दल अविश्वास निर्माण करणे हे देखील पवारांच्या राजकारणाचे ठळक वैशिष्ट्य आहे. दोन्ही डगरीवर पाय ठेवण्याची पवारांची सवय त्यांना नेहमीच अडचणीची ठरली आहे.
सतत भूमिका बदलणे आणि त्यामुळे स्वत:बद्दल अविश्वास निर्माण करणे हे देखील पवारांच्या राजकारणाचे ठळक वैशिष्ट्य आहे. दोन्ही डगरीवर पाय ठेवण्याची पवारांची सवय त्यांना नेहमीच अडचणीची ठरली आहे.
पवारांनी इंदिरा गांधी यांच्या घराणेशाही विरोध करुन काँग्रेस सोडली. राजीव गांधींचे 'हात' बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सोनिया गांधींनी काँग्रेसची सूत्रं हाती घ्यावी म्हणून पायघड्या पसरल्या. त्याच सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा पुढे करत राष्ट्रवादी काँग्रेसची
स्थापना केली. विदेशीपणाच्या मुद्यावर स्वाभिमानी बंड केले. त्याच सोनिया गांधींच्या पक्षाशी आधी राज्यात आणि नंतर केंद्रात आघाडी केली. युपीए सरकारमध्ये स्वत: कृषीमंत्रीपद स्विकारले. अजित पवार रात्रीतून बंड करत भाजपच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. शरद पवारांनी काही महिन्यातच
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांना बाजूला सारत अजित पवारांना पुन्हा उपमुख्यमंत्री केले. इतक्या परस्पर विरोधाभासाने भरलेल्या नेत्याच्या बायोडाटावर कोणता राजकीय पक्ष विश्वास ठेवेल ?
(३) ज्या वयात 'सांगेन गोष्टी युक्तीच्या चार' ही वृत्ती ठेवून आपण पाहिलेल्या पावसाळ्यातील अनुभव
(३) ज्या वयात 'सांगेन गोष्टी युक्तीच्या चार' ही वृत्ती ठेवून आपण पाहिलेल्या पावसाळ्यातील अनुभव
तरुणांना सांगायचे त्या वयात शरद पवारांवर पावसात भाषण करण्याची वेळ आली. याची दोन कारणे आहेत.
(अ) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवारांची जागा घेईल असा दुसरा समर्थ नेता नाही
(ब) दुसरा एखादा नेता समर्थपणे पक्ष चालवू शकेल यावर शरद पवारांचा विश्वास नाही. ही दोन्ही कारणे शरद पवारांचेच
(अ) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवारांची जागा घेईल असा दुसरा समर्थ नेता नाही
(ब) दुसरा एखादा नेता समर्थपणे पक्ष चालवू शकेल यावर शरद पवारांचा विश्वास नाही. ही दोन्ही कारणे शरद पवारांचेच
अपयश दाखवतात.
शरद पवारांनी २००४ पासूनच्या सर्व लोकसभा निवडणुका या आघाडी करुनच लढवल्या आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही तशीच शक्यता आहे. आघाडीच्या राजकारणामुळे पवारांना महाराष्ट्रातील ४८ जागाही लढवता येत नाहीत. अगदी स्वबळावर लढले तरी ४८ पैकी किमान ४० जागा जिंकण्याची शक्यता ही

अगदीच कमी आहे. पवारांनी महाराष्ट्रात ४० जागा जिंकल्या आणि त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात आली हे अगदी पवार समर्थकांच्या समजुतीनुसार गृहीत धरु तरीही राहुल गांधींसह किमान अर्धा डझन नेते त्या परिस्थितीमध्ये पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असू शकतात. तसेच शरद पवारांचे २०२४ साली ८४ वय असेल.
हे वय देखील त्यांच्या पंतप्रधानपदाच्या निवडीसाठी अडचणीचे ठरु शकते.
या वरील सर्व कारणांमुळेच शरद पवार आजवर पंतप्रधान झाले नाहीत किंवा २०२४ साली देखील ते होऊ शकणार नाहीत.
माहिती चा स्त्रोत्र :-
१) https://en.m.wikipedia.org/wiki/1980_Maharashtra_Legislative_Assembly_election
२) https://en.m.wikipedia.org/wiki/2019_Maharashtra_Legislative_Assembly_election
लेखक व माहिती :- ओंकार डंगे