हम कथा सुनाते है...
आपल्याकडे 'लेकराचे पाय पाळण्यात दिसतात' पण आजच्या कथेचा जो नायक आहे त्या लेकराचे पाय त्याने काढलेल्या चित्रांत दिसले होते.
योगायोग म्हणा कोणावर लिहायचं म्हणून विचार करत होतो.. एक नांव क्लिक झालं.. सुरवात केली तेव्हा लक्षात आलं..आज त्याचा वाढदिवस.👇
Joint Commissioner of Excise असणाऱ्या एल.ए.सूर्यनारायण या अधिका-याच्या घरी आज पासुन बरोबर 30 वर्षांपुर्वी जन्म झाला एका मुलाचा.(16/11/1990) नांव ठेवलं तेजस्वी. लक्य सूर्यनारायण तेजस्वी. हे बाळ काय करणार..? हे 1999 मध्ये स्पष्ट झालं. कसं तर असं..👇
श्रीकुमारन चिल्ड्रन्स होममध्ये शिकणारा नऊ वर्षांचा मुलगा आपल्या 17 पेंटिंग्ज विकुन ₹3000 चा चेक शिक्षकाला सोपवतोय कारगिल युद्धातील सैनीकांसाठीच्या फंडमध्ये जमा करण्यासाठी. यावरून आजच्या दक्षिण बंगलोरच्या खासदार तेजस्वी सूर्यांची वैचारिक बैठक काय असेल लक्षात आली असेलच.👇
वडीलांच्या पोस्टनुसार त्यालाही विमानात केक कापुन वाढदिवस साजरा करणे अवघड नव्हते पण 2001 मध्ये राष्ट्रीय बालश्री पुरस्काराने सन्मानित होणं त्याच्या भविष्याच्या वाटचालीचा पाया ठरला. योग्य वेळी संघाचा स्वयंसेवक झाल्यामुळेच की काय नेतृत्व गुणांच्या सुप्त निखा-यास हवा मिळाली आणि..👇
कर्नाटकी संगीताचा आणि कायद्याचा पदवीधर विद्यार्थी असलेला तेजस्वी समाजकार्यासाठी बाहेर पडला. शालेय शिक्षण या विषयावर संशोधनात्मक आणि उत्स्फूर्त काम करणाऱ्या 'अराईज इंडिया' या एनजीओ ची स्थापना व कार्य सुरू केले. पुढचा टप्पा होता अभाविप. सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम सुरू झाले. 👇
अभाविपच्या कामांमधून नेतृत्व घडत गेले आणि कर्नाटक भाजयुमोचे पद मिळाले. वाचनाची आवड. स्वामी विवेकानंद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अरविंदो आणि सावरकरांच्या विचारांनी तयार झालेले नेतृत्व कर्नाटक भाजपाचा प्रखर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून उदयाला येणे क्रमप्राप्त होते. झालेही तसेच. 👇
बरं..सोबत वकीलीच्या अभ्यासातुन मिळालेले ज्ञान व्यवहार्य पद्धतीने वापरतांना अनेक भाजपा च्या जेष्ठ नेत्यांचा संपर्क, त्यांना मदत करणे असेही काम सुरू झाले. सामान्य लोकांपासुन मोठ्या राजकारण्यांपर्यंत स्वतःची व स्वतःच्या ज्ञानाची निरपेक्ष उपलब्धता तेजस्वीला जनमानसातील नेता...👇
बनवण्यासाठी पुरेसे होते. 2014 सालीच्या लोकसभा निवडणूकांच्या प्रचारासाठी डिजीटल कम्युनिकेशन टिम उभारून प्रचार यंत्रणा चालवून यशस्वी करून दाखवली. आजही तेजस्वीला टेक्नोसॅव्ही स्वयंसेवक म्हणून ओळखले जाते. 2018 च्या कर्नाटक विधानसभा निवडणूकीतही तेजस्वीने कमाल करून दाखवली.👇
नेतृत्व तयार करणारा पक्ष अशी ओळख असणारा एकमेव पक्ष म्हणजे भाजपा. याचा अनुभव तेजस्वीकडे बघितल्यानंतर येतो. 1996 पासुन 2018 पर्यंत दक्षिण बंगलोरचे प्रतिनिधीत्व करणारे अनंतकुमार यांच्या आकस्मिक मृत्युने कर्नाटक भाजपात तयार झालेली पोकळी भरण्यासाठी बि.एल.संतोष आणि येदियुरप्पांनी...👇
पक्षश्रेष्ठींकडून तेजस्वीच्या उमेदवारीसाठी पक्षनेतृत्वाला तयार केले आणि दक्षिण बंगलोर मधील कॉंग्रेसचे उमेदवार बी.के.हरीप्रसाद यांना 3,31,192 मतांनी पराभुत करत वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी तेजस्वी सूर्या लोकसभेत तरूण खासदार म्हणून दाखल झाला. ही तर फक्त सुरवात होती. 👇
स्वतःच्या मातृभाषेतुन शपथ घेत पहिलीच लोखसभा अनुभवणा-या तेजस्वीने बैंकेतील नोकरीसाठी स्थानिक भाषेची बंधनकारक असणारी अट काढण्यास लक्षवेधीतुन सांगत.. सबंध सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. बांग्लादेशींच्या लोंढ्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी लवकरात लवकर एनआरसी लागू करण्याची विनंती करणारा.👇
तेजस्वी हा पहिला खासदार.
हिंदुत्ववादी विचारांचा पगडा तयार होण्यासाठी विवेकानंद, अरबिंदो, सावरकर आणि आंबेकरांचे साहित्य हाच आधार असल्याचे तेजस्वी सांगतो.आवश्यक तेथे विनम्रता आणि गरजेनुसार कठोर होण्याचा स्वभाव तेजस्वीला युवकांचा आवडता नेता बनवण्यासाठी पुरेसं होतं. 👇
कुठेही उथळपणा नाही, असंबध्द वायफळ बडबड नाही किंवा कुठल्याही गोष्टींचा गर्व नाही. युवानेता म्हणून भारताच्या स्वास्थ व आरोग्य मंत्रालयास पाठपुरावा करून कठोरपणे
ENDS (Electronic Nicotine Distribute System) बंद करण्यासाठी आवाज उठवणारा तेजस्वीच. 👇
तेजस्वीला,

"सीएए ला विरोध करणारे नेतृत्व हे अशिक्षित पंक्चरवाले आहेत." किंवा..

"नम्बी-पम्बी च्या सेक्यचलरीजमला भारतात स्थान नाही" किंवा..

"नरेंद्र मोदिंच्या विचारांना न मानणारे देशद्रोहीच आहेत."
अशा वक्तव्यांसाठी टिकाही सहन करावी लागली आहे. तेजस्वीच्या लोकप्रियतेला घाबरून👇
कॉंग्रेसवाल्यांनी तेजस्वीच्याच मैत्रिणीस हाताशी धरून 'महिला उत्पीडन' ची केस केली होती ते पण लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर. कोर्टाचे समन जारी होताच मैत्रिणीने समोर येत आरोप कॉंग्रेसकडून राजकीय हेतुने प्रेरित होते हे स्पष्ट केले. 👇
युट्युबवर तेजस्वी सूर्याची अनेक भाषणे पहायला मिळतील पैकी आपले मराठी पत्रकार निखील वागळेंना दाखवलेला आरसा बघण्यासारखं आहे. नक्की बघा. हिंदीत बोलतांना उच्चारांना येणारा कर्नाटकी लहेजा गोडवा वाढवतो.

तेजस्वी बद्दल लिहण्यासारखे भरपुर मटेरिअल भविष्यात उपलब्ध होईल.. त्याहीपेक्षा..
तेजस्वीकडून प्रेरणा घेणारे अनेक युवानेतृत्व आपल्या देशाला मिळतील याची खात्री वाटते. नुकताच भारतीय जनता पार्टीच्या युवामोर्चाचे अध्यक्षपद मिळवणारे तेजस्वी एकदिवस विवेकानंदांचे स्वप्न साकार करतील याबद्दल शंका वाटत नाही.

@Tejasvi_Surya यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

💐💐
You can follow @swami_vachan.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.