ट्विटर वर आल्यापासून कळलेल्या गोष्टी-
1. सर्व बीजेपी विरोधक आपले सहकारी नसतात. बऱ्याच लोकांना संविधानाच्या मूल्यांशी काहीही देणेघेणे नसते.
2. विधायक विचार मांडण्यापेक्षा लोकांना पर्सनल टीकाटिप्पणी करून समोरच्याची टिंगल करायला जास्त आवडते. अशी टिंगल वणव्यासारखी पसरते.-
सगळेच अशा टवाळीमध्ये सहभाग घेतात.
3. दर काही काळानंतर आरक्षण, फेमिनिझम, हिंदुत्व, शिवाजी महाराज, वगैरे विषय ट्रेंडिंग होतात. त्यात पुन्हा तेचतेच मुद्दे मांडले जातात.नवीन गोष्टी काहीच शिकायला मिळत नाहीत.दोन्हीकडचे भांडणारे लोक बिलकुल वाचून आलेले नसतात.कोणालाच कन्सेप्ट शिकून घेऊन-
भांडणाची मजा फक्त घ्यायची असते.
4. जातियवाद व स्त्रीवाद बहुतेक लोकांना समजून घ्यायचा नसतो.या दोन्ही कन्सेप्ट वर सर्वात जास्त चर्चा ट्विटर वर होऊनही सर्वात कमी कळलेले हे विषय आहेत.स्वतःचे प्रिव्हिलेज लोकांना समजून घ्यायचे नसते.फक्त आदळआपट करून,वैयक्तिक चिखलफेक करून भांडायचे असते.-
5. काहीवेळा लाईक, rt,(फॉलोबकच्या राजकारणाविषयी न बोललेले बरे)या गोष्टी वैयक्तिक हितसंबंध वाढीसाठी केल्या जातात. यातून गृपिझमचा उदय होतो. मग ट्विटचे स्क्रीनशॉट ग्रुपमध्ये फिरवणे, एकाच व्यक्तीला अनेकांनी टार्गेटेड हरासमेंट करणे, असे प्रकार घडतात. या झुंडशाहीत मूळ विचार हरवून जातो.-
कदाचित या गोष्टी अनेक समाजमाध्यमांवर घडत असतील. आणि खऱ्या सामाजिक आयुष्यातही असाच प्रकार असतो त्यामुळे इकडे माणूस काय वेगळा वागणार म्हणा.
इथून पुढे तुम्हालाही या गोष्टी जाणवल्या तर नक्की काहीतरी चिंतन होईल, म्हणून या गोष्टी लिहिल्या.
बाकी याचाही विपर्यास होईल हे महितीचेय.
(-)
You can follow @arvindgj.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.