❝ एडवर्ड जेन्नर आणि देवी रोग (Small Pox)❞

१७७०च्या आसपास उत्तर अमेरिकेत, ब्रिटिश सैन्य आणि रेड इंडियन्स याच्यांत युद्ध चालू होतं. बरेच प्रयत्न केल्यानंतरही ब्रिटिश सैन्याला काही यश मिळेना. याचदरम्यान त्या भागात देवीच्या रोगाची (smallpox) साथ पसरली होती आणि ब्रिटिश सैनिकांनाही
ह्या देवीची लागण झाली. ब्रिटिशांकडे या रोगावर प्राथमिक स्वरूपाचे उपचार उपलब्ध होते पण देवीच्या रोगापासून बरे होण्यासाठी थोडा वेळ तर लागायचा. याच काळात ब्रिटिशांच्या अधिकाऱ्याला एक युक्ती सुचली. या महाशयांचं नाव 'सर जेफ्री अ‍ॅमरेस्ट'. आपल्या सैन्यातल्या देवीची लग्न झालेल्या
सैनिकांचे हात रुमाल पांघरून त्यांनी सांभाळून ठेवले. आधी हा रोग पसरू नये म्हणून ह्या वस्तू जाळल्या जायच्या.
एके दिवशी अ‍ॅमरेस्ट यांनी तिथल्या रेड इंडियन्स जनतेला एका समारंभासाठी आमंत्रित केलं आणि त्यांना भेटवस्तू म्हणून बाधित सैनिकांचे हातरुमाल आणि ब्लॅंकेट भेट म्हणून दिले.
याचा व्हायचा तो परिणाम झाला आणि रेड इंडियन्स समूहात देवीची साथ पसरली. बघता-बघता ही साथ संपूर्ण अमेरिकेत पसरली.
याच काळात इंग्लंडच्या बर्कले गावात एडवर्ड जेन्नर नावाचा एक तरुण राहायचा. शालेय शिक्षण झाल्यानंतर एडवर्डने गावातल्या एका डॉक्टरकडे हेल्पर म्हणून काम चालू केले.
पुढे जाऊन त्याने इंग्लंडच्या बऱ्याच हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्याने काम केले.
१७९०च्या आसपास इंग्लंडच्या ग्लुश्टरशायर या भागात देवीची साथ आली. यात हजारो लोक मारले गेले. मारले गेलेल्यात समाजातील सगळ्याच वर्गातले लोक होते अपवाद फक्त दूध विकणाऱ्या गवळी समाजाचा
देवीच्या भीतीने सगळ्यांनीच स्वतःला घरात कोंडून घेतले पण दूध विकणारे गवळी या काळातही निवांत आपला उद्योगधंदा करायचे. एडवर्डकडे येणाऱ्या गवळीला एडवर्डने याचं कारण विचारल्यावर गवळी म्हटला की, 'आम्हा गवळ्यांना देवाचं वरदान आहे त्यामुळे आम्हाला काही होत नाही.'
आता हे कारण अठराव्या शतकात बहुसंख्य जनतेला पटणार असलं तरी एडवर्ड सारख्या व्यक्तीला पटणे शक्य नव्हते. एखाद्याला देवीची लागन झाल्यावर त्याच्या शरीरावर पुरळ उठते ते पिकतात त्यात पू होतो आणि बर झाल्यावर त्याचे काळे डाग शरीरावर तसेच राहतात.
एक दिवस एडवर्ड त्या गवळ्याच्या घरी जाऊन
पोहोचला आणि गवळ्याची गाय ज्या गोठ्यात होती तिथे त्याला एक एक वेगळी गोष्ट जाणवली.
गोठ्यातल्या गाईच्या अंगावर सुद्धा एडवर्डला एका प्रकारचे पुरळ दिसले.‌ तसेच पुरळ गवळ्यांच्याही हातावर होते. ते पुरळ होते Cow Poxचे. त्यावेळी एडवर्डच्या मनात विचार आला की काउपॉक्सच्या संपर्कात आल्यामुळे
शरीरात देवीच्या रोगाशी लढण्यासाठी एक रोगप्रतिकारक शक्ती शरीरात तयार होत असावी.
हा फक्त एक अनुमान होता आणि हे सिद्ध करणं मोठं निर्वाणीचं काम होतं. आता हे सिद्ध करायचं असेल तर "एखाद्याच्या शरीरात आधी काउपॉक्सचे जंतू घुसवायचे, त्याला आधी काउपॉक्सची लागण होऊ द्यायची आणि नंतर त्याच्या
शरीरात स्मॉलपॉक्सचे जंतू सोडायचे आणि त्यानंतर त्याला स्मॉलपॉक्स म्हणजे देवीची लागण झाली नाही तर एड्वर्डचा अनुमान बरोबर सिद्ध होणार होता."
आता हे ऐकायला जेवढं साधं सरळ वाटतं असलं तरी ते प्रत्यक्षात करणे हे कितीतरी पटीने अवघड आणि धोकादायक होतं.
म्हणजे एखाद्या स्वस्थ व्यक्तीला आधी काऊपॉक्सने बाधित करायचं, त्यानंतर त्याच्या शरीरात स्मॉल्पॉक्सचे जंतू सोडायचे. आणि यात जर का तो मेला तर जंतू सोडणाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊन आयुष्यभर तुरुंगात खितपत पडण्याची वेळ येणार होती.
एडवर्ड ही जोखीम घेण्यास तयार होता पण जंतू स्वतःच्या शरीरात घुसवून घेण्यास कोण तयार होईल?

एक दिवस एक शेतकरी आपल्या मुलावर हा प्रयोग करण्यासाठी तयार झाला. तारीख होती १४ मे १७९६.
त्याच काळात एका गवळ्याच्या मुलीच्या अंगावर काउपॉक्सचे फोड आले होते. एडवर्डने ते फोडून त्यातला पू काढला
आणि त्या शेतकऱ्याच्या मुलाच्या पायावर जखम करून त्यात तो पू भरला आणि मलमपट्टी केली.

काही दिवसांतचं त्या मुलाला ताप आला, अशक्तपणा आला, कणकण जाणवायला लागली. पण तो काही दिवसांनी बरा झाला. एडवर्ड ला हवं तसंच झालं. प्रयोगाचा पहिला टप्पा पूर्ण झाला होता.
पण आता एडवर्डची खरी कसोटी लागणार होती. कारण आता त्याला त्या मुलाच्या अंगात देवीचे जंतू सोडायचे होते. काउपॉक्सचे जंतू ज्या पद्धतीने त्या मुलाच्या शरीरात सोडले होते त्याच पद्धतीने स्मॉल्पॉक्सचेही जंतू त्याच्या शरीरात एडवर्डने सोडले.
काही दिवसातच त्या मुलाला ताप आला, कणकण जाणवायला
लागली, अंगावर पुरण उठली पण त्या पुरळाचं काही देवीच्या रोगात रूपांतर झालं नाही आणि काही दिवसांनी तो मुलगा बरा झाला. 'याचा अर्थ एडवर्ड जेन्नरचा अनुमान बरोबर ठरला होता.'

आपल्या या प्रयोगाचे सगळे डिटेल्स एडवर्डने 'रॉयल सोसायटीला' कळवले. रॉयल सोसायटीने याकडे दुर्लक्ष केले
तरीपण एडवर्डने आपलं काम चालू ठेवलं. जवळपास 23 जणांवर एडवर्डने हा प्रयोग यशस्वीपणे केला आणि रॉयल सोसायटीला आपले निष्कर्ष पाठवत राहिला. नंतर रॉयल सोसायटीने याची दखल घेतली. ब्रिटिश सरकारनेही एडवर्डच्या निष्कर्षांची दखल घेऊन पुढील संशोधनासाठी एडवर्डला तीस हजार पाऊंडसचा निधी पुरवला.
कोरोना महामारीच्या काळात आपल्याला relate करता येईल अशी एक गोष्ट एडवर्ड जेन्नरशी जाऊन मिळते. लॅटिन भाषेत गाईला Vacca आणि काउपॉक्सला Vaccinia म्हणतात. या दोघांच्या संगमातून एडवर्डने एक शब्द तयार केला त्याचं नाव Vaccine.
त्यानंतर एडवर्डने आपल्या लसीचे नमुने युरोपच्या बऱ्याच भागात पाठवले. अमेरिका खंडातही त्यांनी ही लस पाठवली. एडवर्डने स्वतःचं घर बांधलं .तिथे गरीब जनतेला मोफत लस टोचली जायची. त्या घराचं नाव होतं House of Vaccine.
एडवर्ड जेन्नरच्या या ऐतिहासिक कार्याचा गौरव म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांच्या नावाने वस्तुसंग्रहालय उभारलं, लंडनमध्ये पुतळा उभारला.

देवी रोगाला संपवण्यासाठी १७९६साली सुरू झालेला हा प्रवास १९८०ला जाऊन थांबला. एडवर्ड जेन्नरच्या या महान कार्यामुळे दोनशे वर्षात देवीच्या रोगाचा समूळ
नायनाट झाला पण देवीच्या नायनाटाची शेवटची खून माझ्यासारख्या Millennialsच्या उजव्या हाताच्या दंडावर आजही कायम आहे.

संदर्भ - गिरिश कुबेर, "युद्ध जिवांचे"
_______

रोहन
You can follow @rohanreplies.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.